Narhari Zirwal: मंत्री नरहरी झिरवाळ पुन्हा अडचणीत, तृतीय पंथीयासोबतचा आक्षेपार्ह VIDEO व्हायरल; राजीनाम्याची मागणी

Minister Narhari Zirwal Viral Video: मंत्री नरहरी झिरवाळ यांचा सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे झिरवाळ पुन्हा अडचणीत आले आहेत. तृतीय पंथीयासोबतचा या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे खळबळ उडाली आहे.
Narhari Zirwal: मंत्री नरहरी झिरवाळ पुन्हा अडचणीत, तृतीय पंथीयासोबतचा आक्षेपार्ह VIDEO व्हायरल; राजीनाम्याची मागणी
Minister Narhari ZirwalSaam tv
Published On

Summary -

  • नरहरी झिरवाळ यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला

  • व्हिडीओमध्ये तृतीयपंथी पवन यादव असल्याचा दावा

  • विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी

  • या व्हिडीओनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ

राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ पुन्हा अडचणीत आले आहेत. नरहरी झिरवाळ यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये झिरवाळ यांच्यासोबत एक तृतीयपंथी व्यक्ती असल्याचा दावा त्या व्यक्तीच्या भावाने पत्रकार परिषद घेत केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली असून आता पुन्हा राजकारण तापले आहे. हा संपूर्ण प्रकार मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

नरहरी झिरवाळ यांच्या या व्हिडिओनंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. २ महिन्यापूर्वी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकाला ३५ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलं होतं. यावेळी विरोधकांनी राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र आता पुन्हा एकदा आक्षेपार्ह व्हिडीओमुळे झिरवाळ अडचणीत आलेत. पुन्हा त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. तृतीयपंथी पवन यादव हा मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत या आक्षेपार्ह स्थितीत दिसत आहे. पवन यादववर मुंबईतल्या कुरार पोलिस ठाण्यामध्ये खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल आहे.

Narhari Zirwal: मंत्री नरहरी झिरवाळ पुन्हा अडचणीत, तृतीय पंथीयासोबतचा आक्षेपार्ह VIDEO व्हायरल; राजीनाम्याची मागणी
Narhari Zirwal: नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील स्टिंग ऑपरेशन समोर, लाच घेतानाच्या VIDEO ने उडवली खळबळ

नरहरी झिरवाळ आणि पवन यादव यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ सात महिन्यांपूर्वीचा आहे. या व्हिडीओमध्ये शासकीय निवासस्थानी पवन यादव आणि मंत्री नरहरी झिरवाळ हे दोघे बेडवर असून त्यांच्याजवळ दारू आणि खाद्यपदार्थ आहेत. या व्हिडीओने पुन्हा राजकारणात खळबळ उडाली आहे. आता नरहरी झिरवाळ यांच्यावर काय कारवाई केली जात आहे. हे पाहणं महत्वाचे राहिल. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मंगळवारी झिरवाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. नरहरी झिरवाळ हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत.

Narhari Zirwal: मंत्री नरहरी झिरवाळ पुन्हा अडचणीत, तृतीय पंथीयासोबतचा आक्षेपार्ह VIDEO व्हायरल; राजीनाम्याची मागणी
Narhari Zirwal: ...तर मी राजीनामा देईन, कार्यालयावर ACB च्या छाप्यानंतर नरहरी झिरवाळ यांची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नरहरी झिरवाळ यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले की, 'राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होणे ही केवळ एक घटना नसून, महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अध:पतनाचे ज्वलंत उदाहरण आहे. एक जबाबदार लोकप्रतिनिधी, ज्याच्यावर जनतेचा विश्वास आणि करदात्यांच्या पैशांची जबाबदारी आहे, त्याच्याकडून अशा प्रकारचे अश्लील आणि अनैतिक वर्तन होणे अत्यंत संतापजनक आणि निषेधार्ह आहे. हा प्रकार केवळ व्यक्तीगत मर्यादांचा भंग नाही, तर सार्वजनिक जीवनातील नैतिकतेलाच काळिमा फासणारा आहे.जनतेच्या विश्वासावर निवडून आलेल्या मंत्र्याने किमान नैतिकतेची चौकट तरी पाळावी, ही साधी अपेक्षा असते. मात्र, हा व्हिडिओ पाहता त्या अपेक्षांचा पूर्णपणे भंग झाल्याचे स्पष्ट होते.या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्र्यांनी कोणतीही विलंब न लावता नरहरी झिरवाळ यांची मंत्रीपदावरून तात्काळ हकालपट्टी करावी.'

Narhari Zirwal: मंत्री नरहरी झिरवाळ पुन्हा अडचणीत, तृतीय पंथीयासोबतचा आक्षेपार्ह VIDEO व्हायरल; राजीनाम्याची मागणी
Narhari Zirwal : मंत्रालयातील लाच प्रकरणात महत्त्वाची अपडेट, झिरवाळांच्या अडचणी वाढल्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com