Manikrao Kokate : मोठी बातमी! मंत्री माणिकराव कोकाटेंना अटक होणार, वॉरंट निघाले

Manikrao Kokate arrest warrant issued by court : महायुती सरकारमधील मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी झाले असून त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
Minister Manikrao Kokate
Minister Manikrao KokateSaam TV marathi News
Published On

Arrest Warrant Issued Against MahaYuti Minister Manikrao Kokate : महायुती सरकारमधील मंत्री माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. १९९५ मधील प्रकरणात कोकाटे दोषी आढळल्याचे कोर्टाने सांगत दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. आता त्यांच्याविरोधात कोर्टाने अटक वॉरंट जारी केले आहे. त्यांना पोलिसांकडून कोणत्याही क्षणी अटक केली जाऊ शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, माणिकराव कोकाटे सध्या रूग्णालयात उपचार घेत आहेत. ते हायकोर्टात जामीनासाठी अर्ज करू शकतात. पण जर त्यांनी कोर्टात धाव घेतली नाही अथवा कोर्टाने त्यांची मागणी फेटाळली तर अटक निश्चित मानली जातेय.

माणिकराव कोकाटे सध्या सरकारी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती मनोज पिंगळे यांनी युक्तीवाद करताना दिली. कोकाटे रुग्णालयात ऍडमिट आहेत, माणुसकीच्या दृष्टीने त्यांना सरेंडर करण्यासाठी ४ दिवसांचा वेळ द्यावा, असा युक्तिवाद करताना कोर्टात सांगितले. माणिकराव कोकाटे यांच्यासाठी मनोज पिंगळे यांनी कोर्टात युक्तिवाद केला.

Minister Manikrao Kokate
मोठी बातमी! महायुतीच्या मंत्र्याला कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता, अटक वॉरंटबाबत अपडेट आली समोर

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे हे सध्या महायुती सरकारमध्ये क्रीडा मंत्री आहेत. कोकाटे यांचे मंत्रिपद अन् आमदारकी धोक्यात आली आहे. कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. १९९५ साली मुख्यमंत्री कोट्यातून कमी आर्थिक उत्पन्न दाखवून याच सदनिका लाटल्याप्रकरणी कोकाटे यांना शिक्षा झाली आहे. कोकाटे सध्या रूग्णालयात उपचार घेत आहेत. कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर ते नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. अजित पवार यांनी या प्रकऱणात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

Minister Manikrao Kokate
CM फडणवीसांच्या सभेआधी गोळीबार, भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर ४ राऊंड फायर, CCTV व्हिडिओ व्हायरल

नेमकं प्रकरण काय आहे?

१९९५ मधील प्रकरणामुळे कोकाटे अन् त्यांचे बंधू अडचणीत आले आहेत. नाशिकमध्ये शासकीय कोट्यातून गरीबांसाठी (अल्प उत्पन्न गट) सदनिका मिळवण्यासाठी त्यांनी आणि त्यांच्या भावाने बनावट कागदपत्रे दाखवली, असा आरोप आहे. त्यात त्यांनी आपले उत्पन्न कमी दाखवले आणि सदनिका बळकावल्याचाही आरोप आहे. हे प्रकरण माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी उघड केले होते. फेब्रुवारी २०२५ मध्ये नाशिकच्या प्रथम वर्ग न्यायालयाने कोकाटे आणि त्यांच्या भावाला दोन वर्ष तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा दिली. त्यावर अपील केले होते. आता १६ डिसेंबर २०२५ रोजी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली आहे. आता कोर्टाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलेय.

Minister Manikrao Kokate
Manikrao Kokate : मोठी बातमी! मंत्री माणिकराव कोकाटेंना अटक होणार, वॉरंट निघाले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com