Maharashtra Live News Update: गणेशोत्सव पार पडल्यानंतर मत्स्य खवय्यांची मासे खरेदीसाठी बाजारात गर्दी

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज रविवार, दिनांक ०७ सप्टेंबर २०२५, लालबागचा राजा विसर्जन, ओबीसी आरक्षण वाद, मनोज जरांगे पाटील, मराठा आरक्षण जीआर, लक्ष्मण हाके, महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

ओमराजे निंबाळकर व भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील आमने सामने

गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवसेना उबाठा गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर व भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील आमने सामने

गणेश उत्सव मिरवणुकीत मल्हार पाटील समर्थकांच्या गराड्यात, समर्थकांकडून दंड थोपटून गाण्याच्या तालावर खासदार ओमराजेना आव्हान

नादी नको लागू माझ्या तुला चांगलाच रडविन,ढोलकीला बांधून तुला बदाबदा बडविल गाण्यावर मल्हार पाटलांचे रील व्हायरल

स्मित हास्य करत खासदार ओमराजे निंबाळकरून भाजप कार्यकर्त्यांना प्रतिसाद

Shirdi: साई मंदिरातील आरतीच्या वेळेत बदल

चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर आज आरतीच्या वेळेत बदल...

दररोज रात्री 10:30 वाजता होणारी शेजारती आज रात्री 9:15 मिनिटांनी होणार...

आरतीनंतर साई मंदिर होणार बंद...

आरतीची वेळ ग्रहण काळात असल्याने आजच्या आरती वेळेत करण्यात आलाय बदल.

Maharashtra Live News: धारूर तालुक्याच्या वतीने भोगलवाडी येथे महा एल्गार सभा

ओबीसींचे हक्क, अधिकार आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यभरात आंदोलन करणारे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आपली संघर्ष यात्रा 2.0 सुरू ठेवली आहे.

या यात्रेदरम्यान गावागावांत जाऊन ते जनजागृती सभा घेत आहेत. यापूर्वी ही त्यांच्यावर 8 वेळा काही समाजकंटकांनी जीवघेणे हल्ले झाले.

तरीही, हाके यांनी न घाबरता बीड जिल्ह्यातील गेवराई, केज आणि धारूर येथील दौरे सुरू ठेवले आहेत.

धारूर तालुक्याच्या वतीने भोगलवाडी येथे ‘महा एल्गार सभा’चे आयोजन करण्यात आले आहे.

Maharashtra Live News: गणेशोत्सव पार पडल्या नंतर मत्स्य खवय्यांची मासे खरेदीसाठी बाजारात गर्दी

श्रावण आणि गणेशोत्सव यामुळे ओस पडलेले मच्छी बाजार आज पुन्हा गजबजले आहेत.

गेल्या काही दिवसात मासे बाजारात मत्स्य खवयांनी पाठ फिरविली होती.

मात्र काल गणपती विसर्जन झाल्यानंतर आणि आज पहीलाच रविवार आल्यामुळे मासे बाजारात प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. माशांचे दरही त्यामुळे वधारले होते.

पापलेट सोळाशे रुपये किलो, सुरमई तेराशे रुपये, मोरी मासा सहाशे ते आठशे रूपये किलो तर बांगडे तीनशे ते चारशे रुपये किलो अशा दराने विकले गेले.

माशांचे दर वाढलेले असूनही खवय्यानी ते खरेदी केल्याचे पाहायला मिळत होते.

Maharashtra Live News: गेल्या २४ तासांपासून पुण्यात सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुका सुरूच

अलका टॉकीज चौकात भाविकांची गर्दी

डीजे ने अलका चौक दणाणला

आता पर्यंत १२० मंडळ अलका चौकातून विसर्जनाला गेले..

कुमठेकर रोड, लक्ष्मी रोड वरून अजून ही मंडळ सुरू

विसर्जन मिरवणूक सुरू होऊन झाले २४ तास

अनेक मंडळांचे विसर्जन अजून बाकी

यंदाही पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला विलंब होण्याची शक्यता

काल बरोबर ९.३० वाजता पुण्याचा मानाचा पहिला कसबा गणपतीची विसर्जन मिरवणुक झाली होती सुरू

Maharashtra Live News: गणपती विसर्जनानंतर चाकरमानी परतीच्या प्रवासाला रेल्वे स्टेशनवर तुडुंब गर्दी

अनंत चतुर्दशी दिवशी गणपती विसर्जन केल्यानंतर कोकणवासीय चाकरमानी आता मुंबईकडे रवाना व्हायला सुरुवात झाली आहे. कोकणातली सर्वच रेल्वे स्टेशन गर्दीने फुलून गेली आहेत. अनेक प्रवाशांना तिकीट न मिळाल्याने दुप्पट तिप्पट दराने तिकीट घ्यावी लागली आहेत.

पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला २३ तास पूर्ण

कालपासून अलका टॉकीज चौकातून १०० मंडळाच्या गणपतींचे विसर्जन

काल सकाळी ९.३० वाजता झाली होती पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

अजूनही अनेक मंडळ त्यांच्या गणरायाचे विसर्जन करण्यासाठी या विसर्जन मिरवणुकीत सहभागी

शेलोडीच्या जिल्हा परिषद शाळेत आगळा वेगळा शिक्षक दीन साजरा

शिक्षक दीन सर्वत्र साजर होत असताना बुलढाणा जिल्ह्याच्या शेलोडीच्या जिल्हा परिषद शाळेत आगळा वेगळा शिक्षक दीन साजरा करण्यात आलाय. .

शाळेतील शिक्षकांची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आलीय ..

दरम्यान ग्रामस्थांसह विद्यार्थ्याच्या शिक्षकांवर पुष्पवृष्टी सुद्धा केलीय. .

यावेळी शिक्षकांचा शाल श्रीफळ हार घालून सन्मान ही केलाय .

एकीकडे सरकारी शाळा ओस पडत असताना चिखली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शेलोडी येथील शाळेत 2009 पासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव अग्रेसर असणारी, नाविन्यपूर्ण उपक्रमशील शाळा ठरलेली आहे..

तुळजाभवानी मातेला आज चंद्रग्रहनावेळी सोवळ्यात ठेवणार

चंद्रग्रहनाच्या पाश्र्वभूमीवर आज तुळजाभवानी मातेचा धार्मिक विधीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

तसेच राञी ९.५७ ते १.३० या ग्रहण कालावधीत तुळजाभवानी मातेला शुभ्र श्वेत सोवळ्यात ठेवण्यात येणार आहे.

शिवाय ग्रहनकालावधीत देवीच्या नित्योपचार धार्मिक पुजा विधीत बदल करण्यात आला आहे.

तसेच ग्रहण सुटल्यानंतर सोमवारी पहाटे १.३० वाजता पंचामृत स्नान , शुद्ध स्नान आरती व धुपारती होईल. तर सोमवारी सकाळी सहा वाजल्यापासून नित्याची पूजा होईल.

बाप्पाला निरोप देताना धाय मोकलून रडली चिमुकली; जड अंतःकरणाने चिमुकलीने दिला बाप्पाला भावनिक निरोप

दहा दिवस गणरायाची मनोभावे पूजा, आरती केल्यानंतर अखेर बाप्पाला निरोप द्यावा लागतो. मात्र बाप्पाला निरोप देताना अनेकांना असह्य वेदना होत असतात. अशातच बाप्पाला निरोप देतं असतांना एक चिमुकली धाय मोकलून रडत असल्याचं दिसून आले आहे. अमरावतीच्या विद्यापीठ परिसरातील दत्तविहार कॉलनीतील श्रीजा थोरात हिचा हा व्हिडिओ असून सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे या चिमुकलीची बाप्पांवर असलेली आस्था आणि निरागसता पाहायला मिळत आहे. दरम्यान थोरात कुटुंबियांनी आपल्या घरीच एका टब मध्ये बाप्पाचे विसर्जन केले आहे. बाप्पा विसर्जित झाल्यानंतर त्याच मातीत थोरात कुटुंब एक झाड लावणार आहे. त्यामुळे त्यांच्या इको फ्रेंडली निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

धाराशिव जिल्ह्यात ढोल ताशाच्या निनादात गणपती बाप्पाला निरोप

धाराशिव शहरासह जिल्ह्याभर गेली दहा दिवसाच्या भक्तीमय गणेशोत्सानंतर मोठ्या भक्तिभावाने गणपती बाप्पाला निरोप देण्यात आलाय.सजवलेल्या वाहनातून बाप्पांची मिरवणूक काढण्यात आली यामध्ये काही मंडळानी पर्यावरण संवर्धनाचे संदेश देणारे देखावे उभे केले,काहीनी ऐतिहासिक गोष्टींना उजाळा दिला ढोल ताशा व लेझीम पथक पारंपरिक खेळाचे सादरीकरण हे पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

विसर्जन मिरवणुकीत तालावर मनसोक्त थिरकले भाजप आ डॉ. संजय कुटे

गणेशोत्सव म्हटलं की तो चिमुकल्यांसाठी आनंदाचा, उत्साहाचा आणि थिरकण्याचा खास सोहळाच असतो.

जळगावजामोद शहरातील विविध गणेश विसर्जन मिरवणुकांना भेटी देत असताना, चिमुकल्यांच्या आग्रहास्तव जळगावजामोद मतदार संघाचे भाजपा आमदार डॉ. संजय कुटे हे त्यांच्या तालावर मनसोक्त थिरकले

आणि त्यांच्या निरागस आनंदात सहभागी होऊन तो क्षण द्विगुणित केला.

मिरवणुकीदरम्यान लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण थिरकत होते.

डॉ. संजय कुटे सुद्धा चिमुकल्यासह थिरकण्याचा मोह आवरू शकले नाही आणि त्या क्षणी बाप्पाच्या आनंदमय ऊर्जा सगळीकडे जाणवली.

गोविंद कोमकर खून प्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडूअण्णा आंदेकर याच्यावर गुन्हा दाखल

जी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा गोविंद उर्फ आयुष याचा शुक्रवारी सायंकाळी नाना पेठेत गोळीबार करून खून करण्यात आला

गोविंद उर्फ आयुष गणेश कोमकर असे खून झालेल्याचे नाव

या प्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडूअण्णा आंदेकर, त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर, पुतण्या शिवम आंदेकर, नातू स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर, अभिषेक आंदेकर, शिवराज आंदेकर, वृंदावनी वाडेकर, लक्ष्मी आंदेकर, अमन युसुफ पठाण उर्फ खान, यश सिद्धेश्वर पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला

लातूर जिल्ह्यात पारंपारिक वाद्याच्या गजरात, लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप

लातूर जिल्ह्यात सर्वत्र गणेश विसर्जनाचा उत्साह पाहायला मिळाला, जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात हलकीचा ठेका, आणि सुरसनई ,लेझीमच्या तालावर लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला आहे.,

तर सकाळपासून शहरात मानाच्या गणरायांची मिरवणूक निघाली होती.,

तर यंदा जिल्ह्यात डॉल्बी मुक्त मिरवणुका काढल्याने, ढोल ताशा यांच्या पथकाने संपूर्ण शहर दुमदुमले होते.

फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल ताशाचा गजर करत आपल्या लाडक्या बाप्पाला लातूरकरांनी अगदी मनापासून निरोप दिलाय..

रात्री उशिरा रायगडमध्ये विसर्जन मिरवणुकांनी गणेशोत्सवाची सांगता

11 दिवस विधीवत पुजा आर्चा केल्यानंतर रात्री उशिरा रायगडकरांनी आपल्या बाप्पाला भावपुर्ण निरोप दिला.

पारंपारीक खालू वाद्यावर लेझिम नाचत या मिरवणुका विसर्जन ठिकाणी रात्री उशिरा पोहचल्या.

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशी आर्त साद घालत गणेश मुर्तींच विसर्जन करण्यात आल.

रायगडमध्ये 169 सार्वजनिक तर 18 हजार 42 खाजगी गणपतींना निरोप देण्यात आला. रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणूका सुरू होत्या.

Lalbaugcha raja Visarjan : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल

गेल्या महिन्यात २७ ऑगस्ट रोजी आपल्या लाडक्या गणरायच आगमन झालं. आणि अखेर आज त्याच्या निरोपाची वेळ आली.

काल अनंत चतुर्दशीला मंडळांच्या ११ दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले.

मात्र सर्वांचा लाडका लालबागचा राजा आता गिरगाव चौपाटीवर दाखल झाला आहे.

थोड्याच वेळात त्याचे विसर्जन होणार आहे.

Yavtmal News : यवतमाळ जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी संकटात

यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय.

मुसळधार पावसामुळे शेतातील कपाशी पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कपाशीवर करपा, मावा व पान खाणारी अळी व कीडरोग डोके वर काढत आहेत.

Yavtmal News : भरधाव ट्रकने चौघांना चिरडले, ट्रकचालक प्रसार

भरधाव जाणाऱ्या एका केटीएस ट्रक चालकाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चौघांना चिरडले यामध्ये एक वयोवृद्धाचा जागीच मृत्यू झाला. तर पती-पत्नीसह मुलगा गंभीर जखमी झाले.

ही दुर्दैवी घटना यवतमाळच्या पुसद तालुक्यातील मारवाडी ते सत्तरमाळ मार्गावर घडली.

घटनेनंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला. श्रीराम राठोड वय 70 वर्ष राहणार मारवाडी खुर्द असे मृत झालेल्या वयोवृद्धाचे नाव आहे.

Ganpati Visarjan : पुण्यातील शनिपार मंडळाने विसर्जन मिरवणुकीसाठी साकारला ३५ फूट "देवमासा"

भव्य विसर्जन देखाव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शनिपार मंडळाने यंदा बाप्पाला निरोप देण्यासाठी तब्बल ३५ फुट उंच देवमासा साकारला.

या अतिदिव्य अशा देवमासाच्या प्रतिकृतीवर गणरायाची मूर्ती विराजमान करण्यात आली होती.

गेल्या अनेक वर्षांपासून शनिपार मंडळाकडून विसर्जन मिरवणुकीसाठी मोठे मोठे देखावे तयार करण्यात येतात.

यवतमाळात आज पासून रामकथा पर्व

मोरारी बापू यांचा रामकथा पर्व सोहळवा यवतमाळ येथील चिंतामणी मार्केट यार्ड लोहारा इथे आज पासून आयोजित करण्यात आलाय. या कथा पर्व सोहळ्यासाठी नागरिकांना उपस्थित राहता यावे यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने सात ते 14 सप्टेंबर या कालावधीत यवतमाळ शहरातील विविध 18 ठिकाणाहून विशेष बस फेऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

विसर्जन मिरवणुकीत भाजपमधील कलह चव्हाट्यावर

विघ्नहर्त्याचे विसर्जन चंद्रपूर भाजपात विघ्न निर्माण करणारा ठरला. विसर्जनाच्या निमित्ताने भाजपमधील दोन दुफळी पुन्हा एकदा समोर आली.

चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गावरून बाप्पाची विसर्जन मिरवणूक निघते.

हजारो लोक यात सहभागी होतात. बाप्पाला शेवटचा निरोप देण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे मंडप रस्त्याशेजारी लागतात. हा दरवर्षीचा शिरस्ता आहे.

आजवर भाजपतर्फे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचाच मंडप राहायचा. मात्र, भाजपचे स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी आपला वेगळा मंडप उभारला.

त्यामुळे मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातील संघर्ष चव्हाट्यावर आल्याचे यानिमित्ताने दिसून आले. आजपर्यंत जिल्ह्यातील भाजप मुनगंटीवार यांच्याभोवती केंद्रित होती.

भाजपचे विशाल परब यांनी रत्नागिरी राजाचं घेतलं दर्शन

रत्नागिरीतील प्रसिद्ध श्री रत्नागिरीचा राजा या गणपतीच आज विसर्जन होणार आहे.

रत्नागिरीचा राजाच्या प्रतिष्ठापना झालेल्या गणरायाचे भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी दर्शन घेतलं.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या बाबतीमध्ये वरिष्ठ निर्णय घेतील.

युती संदर्भातील निर्णय घेण्याचा अधिकार भाजपच्या वरिष्ठांना.

त्यामुळे या संदर्भातील लवकरच गोड बातमी कोकणवासी यांना मिळेल अशी अपेक्षा भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केली

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या संकल्पनेतून साजरा झाला सामाजिक भान जपणारा गणेशोत्सव

क्रांतिकारी गणेशोत्सव मंडळाचा विसर्जन सोहळा आज उत्साहात पार पडला. गणरायाच्या आरत्या, डफडे व डि जे चा गजर आणि भावनिक वातावरणात गणपती बाप्पांना साश्रूनयनांनी निरोप देण्यात आला.

यावेळी तरूणांनी विशेष गर्दी केली होती. परिसरातील नागरिक व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. डफड्यांच्या तालावर रविकांत तुपकर यांच्या परीवारातील सर्वांनी. चौकट डान्स केला .

यावेळी महीला भगीनी पण थिरकल्या रविकांत तुपकर व सौ शर्वरीताई तुपकर यांनी फुगडी खेळत आनंद द्विगुणित केला.

विसर्जना वेळी गणपती बाप्पां चं ट्रैक्टर चालवत रविकांत तुपकर यांनी स्वतः सारथ्य केले गणपती विसर्जनाच्या वेळी वाजत-गाजत, डफडे व डि जे च्या गजरात भावपूर्ण वातावरणात बाप्पांना निरोप देण्यात आला.

पैनगंगा नदी मध्ये बाप्पांचं विसर्जन केले गेले.उत्साह आणि ओढीबरोबरच डोळ्यांत पाणी आणणारा हा निरोपाचा क्षण सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला.

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या घोषणांनी आसमंत दणाणून गेला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com