

बुलढाणा–मलकापूर महामार्गावरील राजूर घाट परिसरात भीषण वनवा लागून अजिंठा पर्वतरांगेतील खैरखेड–खामखेड शिवारातील जंगलाला आग लागली आहे. आगीने विक्राळ रूप धारण केले असून परिस्थिती गंभीर बनली आहे. मोताळा वनपरिक्षेत्राचे कर्मचारी व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन युद्धपातळीवर आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आग वेगाने पसरत असल्याने अद्याप पूर्णपणे नियंत्रण मिळवता आलेले नाही. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
शिर्डी पोलिसांचे पथक उद्या सकाळी नाशिककडे रवाना होणार...
राहाता न्यायालयाचे समन्स घेऊन शिर्डी पोलिस नाशिकला जाणार...
SIT च्या ताब्यात असलेल्या खरात याचा ताबा मिळवण्यासाठी नाशिक न्यायालयात करणार अर्ज दाखल..
टिटवाळा उड्डाणपुलावर आणखी एक जीवघेणा अपघात
अपघातामध्ये तरुण गंभीर जखमी
टिटवाळा उड्डाणपूल बनतोय अपघातांचा सापळा
या मार्गावरील वाढत्या दुर्घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला
पुणे -
नवले पुलावर चारचाकी वाहनाला आग
अचानक चारचाकीने घेतला पेट
आगीच्या घटनेमुळे नवले पूल परिसरात वाहतूक कोंडी
आगीचे कारण समजू शकलेले नसले तरी सुद्धा पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक बंद
पुणे -
बारामती पोटनिवडणुकीच्या मतदानाचा निकाल सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार
बारामती येथील वखार महामंडळाच्या गोडाऊन मध्ये मतमोजणीला होणार सुरुवात
२३ एप्रिल रोजी बारामती मध्ये ५८.२७ टक्के झालं मतदान
ईव्हीएम मशीनच्या मतमोजणीसाठी २० टेबल, तर पोस्टल मतपत्रिकांच्या मतमोजणीसाठी ६ टेबलांची व्यवस्था
या प्रक्रियेसाठी ३० सूक्ष्म निरीक्षक, ३० मतमोजणी पर्यवेक्षक, ३० मतमोजणी सहायक तसेच इतर कर्मचारी व अधिकारी मिळून सुमारे ३०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती
नाशिक
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा झाला गुप्त नाशिक दौरा
- भाजपा आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या लग्नाला लावली हजेरी
- नाशिकच्या गंगापूर येथील एका रिसॉर्टमध्ये करण्यात आला होता विवाह सोहळा आयोजित
- मुख्यमंत्र्यांसह अनेक नेते मंडळींनी लावली लग्न सोहळ्याला हजेरी
कुर्ला (पश्चिम) येथील बेस्ट बस आगारात रविवारी दुपारी एका उभ्या असलेल्या बसला अचानक भीषण आग लागली. बसचे सर्व्हिसिंग सुरू असताना ही दुर्घटना घडली. सुदैवाने, बसमध्ये प्रवासी नसल्याने आणि अग्निशमन दलाने वेळीच धाव घेतल्याने मोठी दुर्घटना टळली असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
अँकर : सध्या लग्नसराई आणि सुट्ट्यांमुळे बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे...आणि याच गर्दीचा फायदा घेत एका चोरट्याने बसमध्ये चढत असताना लहान मुलाच्या हातातील कडे चोरण्याचा प्रयत्न करत असताना महिलांच्या लक्षात येताच तिथेच दोन महिलांनी चोरट्याला लगेच चोप दिलाय... हा सर्व प्रकार वाशिमच्या मंगरूळपीर बस स्थानकावर घडलाय... महिलांनी तुरट्याला झोप देताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती दरम्यान नागरिकांनी तात्काळ चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात दिले..... गर्दीच्या वेळेस बस स्थानकावर पोलीस असणे गरजेचे असते मात्र यावेळी कोणताही पोलीस कर्मचारी बस स्थानकावर हजर नसल्यामुळे संताप व्यक्त होत होता...
मिसिंग लिंकच्या केबल पुलावर थांबुन फोटो, सेल्फी काढणाऱ्या प्रवाशांवर महामार्ग पोलिसांनी कारवाया सुरु झाल्या आहेत. मुबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंकच्या केबल पुलाचे सर्वच प्रवाशांना आकर्षण असून अनेक प्रवाशांना फोटो आणि सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही. केबल पुलावर थांबून फोटो, सेल्फी काढणाऱ्या प्रवाशांवर महामार्ग पोलिसांमार्फत कारवाईचे सत्र सुरु करण्यात आले आहे. केबल ब्रिज आणि आजूबाजूला असलेली खोल दरी डोंगर ही मनमोहक दृश्य प्रवाशांना भुरळ घालत आहेत. मात्र या वेगवान मार्गावर वाहन थांबल्याने अपघात होण्याचा शक्यता आहे. अशा वाहन चालकांवर महामार्ग पोलीसांमार्फत नो पार्किंगच्या दंड आकारणीची कारवाई केली जात आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज MIDC परिसरातील ए.एस. क्लब चौकाजवळील म्हाडा कॉलनी परिसरात आज दुपारी साडेतीनच्या सुमारास भीषण आग लागली. मोकळ्या जागेत ठेवलेल्या वायर बंडलला लागलेली ही आग काही वेळातच भडकली आणि रौद्र रूप धारण केले. आग इतकी प्रचंड होती की परिसरात धुराचे मोठे लोट पसरले, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच वाळूज MIDC अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, या भीषण आगीत लाखों रुपयांचे वायर बंडल जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. ही घटना तिसगाव गट क्रमांक १०४/३ येथे घडली असून, आगीत विद्युत डीपीसह मोठ्या प्रमाणात विद्युत साहित्यही जळाले आहे. संबंधित ठिकाण हे खाजगी गोडाऊन असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, संबंधित यंत्रणेकडून पुढील तपास सुरू आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संगमनेरमध्ये आगमन...
मुख्यमंत्र्यांसोबत पालकमंत्री विखे पाटील यांचे हेलिकॉप्टरने आगमन...
मुख्यमंत्री विवाह स्थळाकडे रवाना...
इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा आज विवाह सोहळा...
मुख्यमंत्री इंदोरीकरांची भेट घेऊन देणार शुभेछा...
हेलिपॅडवर आमदार सत्यजित तांबे आणि माजी खासदार सुजय विखे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचे स्वागत...
संगमनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मैथिली तांबे आणि सर्व नगरसेवकांनी केले मुख्यमंत्र्यांचे स्वागत...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संगमनेरमध्ये आगमन...
शिंदे हेलिकॉप्टरने संगमनेरमध्ये दाखल...
अपक्ष आमदार सत्यजित तांबे आणि शिंदे सेनेचे आमदार अमोल खताळ दोघेही उपमुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी उपस्थित...
शिंदेंच्या स्वागतवेळी हेलिपॅडवर हायहॉल्टेज ड्रामा...
स्वागतासाठी तांबे आणि खताळ यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ...
कार्यकर्त्यांना रोखल्याने आमदार अमोल खताळ पोलिस अधिकाऱ्यांवर संतापले
० अलिबाग वडखळ मार्गावर वाहतुक कोंडी
० सुट्टीची मौजमजा लुटून मुंबई पुण्याकडे परत निघालेले पर्यटक वाहतुक कोंडीत आडकले
० अलिबाग वडखळ मार्गावरील कार्लेखिंड ते पोयनाड परिसर पर्यंत चार किमीपर्यंत वाहनांच्या रांगा
० अरुंद घाट रस्ता, वेडी वाकडी वळण यामुळे वाहनांचा वेग मंदावला आणि लागल्या वाहनांच्या रांगा
नाशिकच्या मालेगाव शहरातील जुन्या आग्रा महामार्गावरील खड्डा जीन परिसरातील ओस्तवाल ग्रुपच्या आवारात असलेल्या प्लास्टिक पाईच्या गोडाऊनला दुपारच्या सुमारास मोठी आग लागल्याची घटना घडली. ओस्तवाल ग्रुपच्या बाजूल असलेल्या ऑईल मिल मध्ये ही आग लागली मात्र वा-यामुळे तसेच कच-या मुळे आग पसरल्याने ती ओस्तवाल ग्रुपच्या प्लास्टिक गोडाऊन मध्ये पसरल्याने पाहता पाहता आगीने रौद्र रुप धारण केले.
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरालगत असलेल्या काळंबा शिवारात एका बिबट्याच्या बछड्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. येथील शेतकरी जितेंद्र गुरव यांच्या शेतात सुमारे 5 ते 7 महिने वयाचा हा बछडा मृतावस्थेत आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सध्याच्या कडक उन्हामुळे उष्माघाताने या बछड्याचा मृत्यू झाला असावा,असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
पतसंस्थेचे संस्थापक काका कोयटे यांना 10 मे पर्यंत चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश...
ED कडून काका कोयटे यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश.
समता पतसंस्थेत अशोक खरात नॉमिनी असलेली 100 बनावट खाती.
अवर्षणग्रस्त म्हणून ओळख असलेल्या मोताळा तालुक्यातील सिंदखेड लपाली गाव शिवारात राबविण्यात येत असलेल्या मियावाकी पद्धतीच्या हरित उपक्रमाला आज दुपारी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. गेल्या पाच वर्षांपासून ग्रामस्थांच्या सहभागातून उभा राहिलेला हा प्रकल्प काही क्षणांत आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. सिंदखेड लपालीचे सरपंच प्रवीण कदम यांनी ग्रामस्थांच्या मदतीने सुमारे 20 ते 25 एकर क्षेत्रात चर खोदून हजारो वृक्षांची लागवड केली होती.
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील प्रस्तावित असलेल्या काळू धरणाच्या कामाला गती दिली असून बाधित शेतकऱ्याना विश्वासात घेऊन त्यांचे सहकार्य मिळत असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र दिनी जिल्हा मुख्यालयी मार्गदर्शन करताना केलं. या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी परिसरातील सर्व स्थानिक शेतकरी यांनी एकत्र येत धरणाला ठाम विरोध करण्याचा निर्धार केला. यावेळी बाधित क्षेत्रातील शेतकरी निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
कल्याण पूर्वेतील नांदिवली तर्फ परिसरात मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत असताना एका वाहतूक पोलिसाला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली होता. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाळांना सुट्टया पडल्या आहेत आणि उन्हाळी सुट्टी सुरु झाली आहे. उन्हाळी सुट्टीत मौजमजा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक रायगडमध्ये दाखल झाले आहे. पर्यटकांची पहिली पसंती रायगडचे समुद्र किनारे ठरले असून रायगडमधील अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, दिवेआगार, काशिद, नागावसह सर्वच समुद्र किनारी पर्यटकांनी गजबजून गेले आहेत. समुद्राच्या लाटांमध्ये डुंबताना, वॉटर स्पोर्टस् चा आनंद लुटताना पर्यटक दिसत आहेत.
नवी मुंबईच्या वाशी येथे पार्किंग येथे दुचाकीची बॅटरी गरम झाली. त्यामुळे दुचाकीने पेट घेतला. मात्र नागरिकांनी धावत जात पाणी टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच बॅटरीमधील वायर काढण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला. त्यामुळे प्रसंगवताने त्यामुळे गाडीचे नुकसान झाले नाही
नसरापूर प्रकरणी पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली आहे. नसरापूर प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेच्या घरावर नोटीस लावण्यात आली आहे.
अभिनेता रितेश देशमुख यांनी आज पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतलं. यावेळी बोलताना नसरापूर घटनेचा निषेध व्यक्त केला. छत्रपकी शिवाजी महाराज यांच्या काळातील चौरंग करण्याची शिक्षा आरोपीला मिळावी अशी अपेक्षा त्यांनी वर्तवली.
विदर्भात सूर्य सध्या आग ओकतोय... वाशिम जिल्ह्यातही पार 40 पार गेला आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आपली फळबाग उन्हापासून वाचवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत,असाच वेगळा प्रयत्न वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील दस्तापुर येथील शेतकरी तुषार हिप्परकर यांनी केलाय.
महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनची कार्यकारणीची बैठक व सर्वसाधारण सभा मा.श्री संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेखाली शिवछत्रपती स्टेडीयम बालेवाडी येथे संपन्न झाली...या बैठकीमध्ये केंद्रीय राज्य मंत्री श्री मुरलीधर मोहोळ यांची सर्वानुमते महाराष्ट्र ऑलिंपिक असोससिएशनचे अध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली
सध्या यवतमाळ जिल्ह्यात उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कडक उन्हाच्या झळांनी माणूसच नव्हे तर पशुपक्षी देखील त्रस्त झाले आहेत. नैसर्गिक जलस्रोत आटल्याने पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या पक्षांची अवस्था दयनीय झाली आहे.
अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे नगरपरिषदेच्या वतीने साकारण्यात आलेल्या अत्याधुनिक ई-लायब्ररीचे उद्घाटन भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या ई लायब्ररीला न्यायमूर्ती भूषण गवई नाव देण्यात आले.
नसरापूर प्रकरणावरुन पुण्यात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचे आनंदोलन सुरु झाले आहे. पुण्यातील अलका टॉकीज चौकात शिवसेनेतील महिला कार्यकर्त्यां आंदोलन करत आहेत.
दीर शंकर उर्फ पप्पू मस्के याच्यासह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल
संपत्तीच्या वादातूनच हे तिहेरी हत्याकांड झाल्याची नातेवाईकांची तक्रार
मृत गायत्री मस्के ही संपत्तीतील वाटा तसेच आरोपी शंकर मस्के याला हात उसने दिलेले 25 लाख रुपयांसाठी तगादा लावला होता.
त्यातूनच आरोपीने हे हत्याकांड केल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या 5 संशयित पोलिसांच्या ताब्यात असून मुख्य आरोपीच्या शोधासाठी 3 पथके रवाना केली आहेत
बीएनएस कलम 103 (अ), 351(2), 3, 5 यासह शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल
गुहागर समुद्रात बुडणा-या दोन पर्यटकांना वाचवण्यात आलेय. हे दोन्ही पर्यटक सांगलीतील आहेत पर्यटनासाठी ते गुहागरमधे आले होते. समुद्र पर्यटनास आलेल्या पर्यटकांनीच बुडणा-या तरुणांना वाचविले .गुहागर मधील खालचापाट येथील किस्मत हॉटेलच्या मागील किनारी ही घटना घडली असून समुद्राच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे दोन्ही पर्यटक बुडत असताना बघता क्षणी जवळील पर्यटकांनी आणि पोलीस कर्मचा-यांनी त्यांना वाचविले.
हिंगोलीच्या वसमत शहरात डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. नागरिकांनी डिझेल मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात रांगा लावल्याचं वसमत शहरात पाहायला मिळाला आहे. तर जिल्ह्यात मात्र इतर ठिकाणी पेट्रोल डिझेलचा साठा मुबलक असल्याची माहिती पेट्रोल असोसिएशन कडून देण्यात आली आहे पेट्रोल डिझेल कंपन्यांकडून वसमत मध्ये गेल्या दोन दिवसापासून कमी प्रमाणात डिझेलचा साठा पुरवठा करण्यात येत आहे डिझेल सोबत अतिरिक्त पेट्रोल घेण्याचं पेट्रोल कंपन्या सांगत असल्याचं पेट्रोल व्यावसायिक यांनी म्हटले आहे
व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात अचानक मोठी वाढ झाल्याने शहरातील छोटे हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. सरकारने सुमारे 933 रुपयांनी दरवाढ केल्यामुळे त्यांच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे.हॉटेल चालकांच्या मते, गॅस दरवाढीमुळे उत्पादन खर्च वाढत असल्याने ग्राहकांकडून दरवाढ करावी लागणार असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले
पुसद-अमरावती मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावर नागरिकांची कोंडी
दोन जड वाहन एकाच वेळी मार्गक्रमण करताना मोठी कसरत
मला डॉक्टर व्हायचं होतं,पण मार्ग कमी पडले म्हणून ऍडमिशन घेतले नाही
प्रीतम ताईंना वकील व्हायचं होतं पण त्या डॉक्टर झाल्या आणि येशू ताई वकील झाल्या
धनु भाऊ मात्र भाग्यवान आहेत त्यांना राजकारणी व्हायचं होतं ते राजकारणी झाले
नवापूरात बर्ड फ्लूचा शिरकवमुळे दोन दिवसांत 44 हजार पक्षी कलिंग ऑपरेशन....
20 हजार अंडी आणि 44 टन पशुखाद्य नष्ट करण्यात आल्याने पोल्ट्री व्यवसाय त्याला आर्थिक फटका...
50 कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून दीड लाख कोंबड्यांच्या कलिंग प्रक्रिया सुरू
नांदेड जिल्ह्याचा तापमान 43° अंश डिग्री सेल्सिअसवर.
मेंटनस टाळण्यासाठी तसेच तापमान स्थिर ठेवण्यासाठी महावितरण कंपनीने लावले ट्रान्सफॉर्मरला कुलर.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन
नसरापूर घटनेच्या विरोधात गुडलक चौकात आंदोलन
आंदोलनातून आरोपीला फाशी देण्याची मागणी
नांदूरबरातील शेतकऱ्यांच्या हक्काची ओळख असलेल्या शेतकी संघाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते उत्साहात पार पडले
अनेक पेट्रोल पंप पेट्रोल डिझेल नसल्याने बंद, शेती मशागतीची काम ठप्प
दररोज दैनंदिन कामालाही मोठा फटका, पेट्रोल डिझेल मिळत नसल्याने नागरिक संतप्त
बीड जिल्ह्यातून पेट्रोल डिझेल घेण्यासाठी वाहन चालक धाराशिव मध्ये
बीडच्या केज परिसरातून मोठ्या प्रमाणात लोक धाराशिव मध्ये पेट्रोल डिझेल घेण्यासाठी
नवी मुंबईतील जुईनगर हायवेवर सुरू असलेल्या तुर्भे-खारघर टनलच्या बांधकामादरम्यान गंभीर निष्काळजीपणाचा प्रकार समोर आला आहे. पृथ्वी कंपनीकडून सुरू असलेल्या या कामात हायड्रा मशीनच्या चुकीमुळे एमआयडीसी आणि महापालिकेची मुख्य जलवाहिनी तुटली आहे.
लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी येथे, तापमानाचा पारा 43 अंश सेल्सिअस च्या पुढे गेलाय, रणरणत्या उन्हाचा फटका आता मुक्या प्राण्यांनाही बसताना पाहायला मिळतोय,सावरी येथील शेतकरी मदन भंडारे यांची दीड लाखाची बैल जोडी "हिट स्ट्रोकने" दगावली आहे, दिवसभर शेत मेहनतीचे काम करून सायंकाळी पाणी पाजून बैल दावणीला बांधले होते ,मात्र दोन्हीही बैल मृत अवस्थेत दिसल्याने एकच खळबळ उडाली, वैद्यकीय माहितीनुसार बैलांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने हिट-स्ट्रोकचा बैल जोडीला फटका बसून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर शेतकरी भंडारे यांच तब्बल दीड लाख रुपयांचे नुकसान झाल आहे, जिल्ह्यात आत्तापर्यंत उष्माघाताने तीन मानवी मृत्यू झाले आहेत.
- नागपूर शहरात विविध पोलीस स्टेशन हद्दीत तिघांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा संशय
- सदर परिसरात 58 वर्षीय,यशोधरानगर परिसरात 60, आणि गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आस्था निवारा येथे वास्तव्यास असलेल्या 65 वर्षीय पुरुष बेशुद्धावस्थेत आढळले
- तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले,मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले
- हे तीनही मृत्यू उष्माघाताने झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे,मात्र मृत्यूचे नेमके कारण पोस्ट मॉर्टम नंतरच स्पष्ट होणार
आज जिल्ह्यात नीट युजी 2026 करिता परीक्षा पार पडणार आहे, जिल्ह्यात एकूण 34 केंद्रांवर जवळपास 16, हजार 300 विद्यार्थी परीक्षेला समोर जाणार आहेत. तर उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन परीक्षा केंद्रावर विशेष उपाययोजना देखील करण्यात आल्या आहेत, प्रत्येक परीक्षा केंद्रावर कर्तव्यद दंडाधिकारी ,डॉक्टर, आरोग्य पथक तैनात करण्यात आले आहेत.,तर उष्माघातावरील उपचारासाठी आवश्यक औषधे ,मुबलक प्रमाणात पाणी तसेच वैद्यकीय अधिकारी यांची व्यवस्था करण्यात आली आहे. दुपारी 2ते 5 या वेळेत ही परीक्षा पार पडणार आहे, या काळात शहरातील काही भागात वाहतुकीत देखील बदल करण्यात आला आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाकडून नसरापूर घटनेचा "सु मोटो कॉग्निजन्स"
राष्ट्रीय महिला आयोगाने पुण्यातील घटनेची घेतली दखल
नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स यांना या प्रकरणाची दखल घेऊन तपासावर देखरेख ठेवण्याचे आणि दोषींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याचे आयोगाकडून आवाहन
पीडित कुटुंबाला तातडीने मदत व नुकसानभरपाई देण्यासाठी आयोगाकडून प्रयत्न
वेळेत आरोपपत्र दाखल करणे आणि फास्ट ट्रॅक न्यायालयात जलद सुनावणी सुनिश्चित करण्यावरही आयोगाकडून भर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेतलेली बारावीची परीक्षा १४ लाख ३३ हजार ५७ विद्यार्थ्यांनी दिली
त्यातील १२ लाख ८६ हजार ८४३ म्हणजेच तब्बल ८९.७९ टक्के विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात २.०९ टक्क्यांनी घट
राज्यात कोकण विभागाचा निकाल ९४.१४ टक्के असा सर्वाधिक असून लातूर विभागाचा ८४.१४ टक्के असा सर्वात कमी निकाल
उत्तीर्ण मुलींच्या निकालाची टक्केवारी ९३.१५ टक्के असून मुलांचा निकाल ८६.८० टक्के
चिमुरडीवरील अन्यायाविरोधात आज संपूर्ण भोर, राजगड तालुका बंद ची हाक देण्यात आली आहे
नराधमाला फाशी द्या, या मागणीसाठी सर्व स्तरांतून नागरिक रस्त्यावर उतरले असून व्यापारी आणि दुकानदारांनीही आपली दुकाने बंद ठेवून या निषेधात सहभाग नोंदवण्याचे आवाहन
हवेली, भोर वेल्हा मधील आंबेडकरी संघटनांच्या वतीने खेड शिवापूर टोल नाका बंदची हाक
आरोपीला कायद्याच्या चौकटीत जास्तीत जास्त शिक्षा मिळावी यासाठी आयोग राज्य शासनाला महत्त्वपूर्ण शिफारशी करणार
या प्रकरणात न्यायप्रक्रिया जलदगतीने पार पडावी यासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याची शिफारस
तसेच हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्याची शिफारस करण्यात येणार, राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांची माहिती
नागरिकांमध्ये निर्माण झालेला संताप समजण्यासारखा असला तरी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनी शांतता राखावी, आयोगाचे आवाहन
नवी मुंबईमध्ये सिडकोने १६,८७६ घरांची लॉटरी जाहीर केली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने सिडकोच्या २६ हजार घरांच्या लॉटरीमधील अल्प उत्पन्न गटातील (LIG) घरांच्या वाटपाला स्थगिती दिली आहे.
यामुळे १६,८७६ घरांची ही सोडत लांबणीवर पडली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून अर्जदारांनी सिडकोचे फॉर्म भरण्यासाठी ७५ हजार ते दीड लाख रुपयांपर्यंतची रक्कम सिडकोकडे जमा केली आहे. मात्र, अद्याप ही लॉटरी काढण्यात न आल्यामुळे सर्वसामान्यांचे पैसे सिडकोकडेच अडकून पडले आहेत. सोडत लांबणीवर गेल्यामुळे सर्वसामान्य अर्जदारांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे.
नसरापूर प्रकरणातील पीडित चिमुरडीवर रात्री उशिरा अंत्यसंस्कार
पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत करण्यात आले अंत्यविधी
वैकुंठ स्मशानभूमीत मोठ्या पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार
नराधमाला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, कुटुंबीयांची मागणी
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.