Maratha Reservation: भाजपला मोठा धक्का; मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बड्या नेत्याने ठोकला पक्षाला राम राम

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पश्चिम महाराष्ट्रातील बड्या भाजप नेत्याने पक्षाला राम राम ठोकला आहे.
Maratha Reservation
Maratha ReservationSaam tv
Published On

Maratha Reservation:

मराठा आरक्षणावरून राज्याचं राजकारण तापलं आहे. मराठा आरक्षणावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. मनोज जरांगे यांच्या भूमिकेचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटू लागले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून मराठा आरक्षणावर तोडगा निघाला नसल्याचे दिसून येत आहे. याच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपच्या बड्या नेत्याने पक्षाला राम राम ठोकला आहे. (Latest Marathi News)

मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतरही मराठा आरक्षणावर तोडगा न निघाल्याने राजकीय वर्तुळातील वातावरण ढवळून निघालं आहे. यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांनी भाजपला राम राम ठोकला आहे. (सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा)

Maratha Reservation
Sharad Pawar : ज्यांना पक्ष उमेदवारीसाठी लायक समजत नाही, त्यांनी बारामतीची चर्चा करून नये - पवारांचा बावनकुळेंना टोला

'राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मराठा समाजाचे नेते आहेत. तरीही मराठा समाजाला आरक्षणासाठी लढा द्यावा लागतो ही बाब दुर्दैवी आहे. सरकार मराठा आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यासाठी वेळकाढूपणा करत असल्याचा गंभीर आरोप करत भाजपचे प्रदेश प्रवक्ते तसेच पिंपरी चिंचवड शहरातील सभागृह नेते एकनाथ पवार यांनी केला आहे.

एकनाथ पवार यांचा राजीनामा भाजपला धक्का मानला जात आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षण आंदोलनाचा पहिला फटकाही मानला जात आहे. आरक्षण मिळेपर्यंत आपण आपल्या भूमिकेवर ठाम असून शेकडो कार्यकर्ते देखील आपल्या भूमिकेच्या समर्थनार्थ सोबत आहे, असा दावा एकनाथ पवार यांनी केला आहे.

Maratha Reservation
Sharad Pawar : ज्यांना पक्ष उमेदवारीसाठी लायक समजत नाही, त्यांनी बारामतीची चर्चा करून नये - पवारांचा बावनकुळेंना टोला

दरम्यान, दसऱ्याच्या दिवशी आपण आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचंही पवार म्हणाले. त्यामुळे एकनाथ पवार यांच्या भूमिकेविषयी भाजप काय स्पष्टीकरण देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Maratha Reservation
Ajit Pawar Speech: शाळेला 'अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल' नाव आहे, कोणी कमी पडलं तर....'; अजित पवार स्पष्टच बोलले

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com