Ajit Pawar Speech: शाळेला 'अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल' नाव आहे, कोणी कमी पडलं तर....'; अजित पवार स्पष्टच बोलले

Ajit Pawar Speech: या कार्यक्रमात अजित पवार यांनी 'आदरणीय शरद पवार' असं म्हणत भाषणाला सुरुवात केली.
Ajit pawar News
Ajit pawar NewsSaam tv
Published On

Ajit Pawar News:

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर विद्या प्रतिष्ठानच्या 'अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल'च्या नवीन वास्तूच्या उद्घाटन कार्यक्रमानिमित्त पवार कुटुंबीय पहिल्यांदा एकत्र आले. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील 'अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल'च्या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित केले. या कार्यक्रमात अजित पवार यांनी 'आदरणीय शरद पवार' असं म्हणत भाषणाला सुरुवात केली. तसेच चांगलं शिक्षण द्यावं, अशी विनंती देखील अजित पवार यांनी शाळेतील कर्मचाऱ्यांना केली. (Latest Marathi News)

अजित पवार म्हणाले, 'नवरात्री सुरु असून २४ ऑक्टोबर रोजी दसरा आहे. यानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो. १९७२ मध्ये पवार साहेबांनी विद्या प्रतिष्ठानची स्थापना केली. तेव्हा दुष्काळातून बाहेर काढण्याचे काम वसंतराव नाईक यांनी केले. अनेक जणांनी ही शिक्षण संस्था पुढे आणण्याचा प्रयत्न केला'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ajit pawar News
Sushma Andhare On Beed Incident: महाराष्ट्राचा मणिपूर करायचा आहे का? महिला निर्वस्त्र प्रकरणावरून अंधारेंचा फडणवीसांना सवाल

'बघता-बघता या संस्थेचं २२ लाख स्क्वेर फूटचं काम करण्यात आलं. दौंडलाही या शाळेची शाखा काढायची आहे. साहेबांची इच्छा आहे की, दौंडमध्येही शिक्षणाचं दालन उभं करायचं आहे. या शिक्षण संस्थेने ५१ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. या शाळेने कर्तृत्ववान मुलं तयार करण्याचं काम या शिक्षण संस्थेने केलं. या संस्थेचे काही कामे राहिली आहेत, असे अजित पवार पुढे म्हणाले.

'आपण विविध सुविधा देण्याचे काम या विद्या प्रतिष्ठानतर्फे करत आहोत. खेळाचे मैदान तसेच विविध खेळांचे प्रकार आणि त्याच्या सुविधा देण्यात येणार आहोत. या भागात पाण्याची थोडी कमतरता आहे, पण या भागात राहुल कुल आणि दत्ता भरणे आमदार आहेत. मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून याकडे लक्ष देतो आहे. संस्थेने २५ कोटी रुपये खर्च आतापर्यंत केलेला आहे. दर्जेदार शिक्षण मिळेल अशी सोय आपण दिली आहे , असेही ते म्हणाले.

'अतिशय शून्यातून हे विश्व निर्माण केलं आहे. विद्या प्रतिष्ठानचा देशभर लौकीक वाढला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे लक्ष असतं. जिद्द आणि चिकाटी ठेवलं तर येथील इमारत पाहून समजू शकतं. शिक्षणासाठी पूर्वीच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख, महात्मा फुले आणि कर्वे यांनी काम केलं, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

Ajit pawar News
Rohit Pawar News: अजितदादांच्या खात्यावर फडणवीसांचा अंकुश; संमतीशिवाय निधी न देण्याच्या सुचना... रोहित पवारांचा गंभीर आरोप

अजित पवार यांनी भरसभेत शाळेतील कर्मचाऱ्यांना विनंती केली. ' स्टाफला सांगतो, शाळेला 'अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल' हे नाव दिलं आहे. त्याच्या नावाला साजेसं शिक्षण मिळालं पाहिजे. कोणी कमी पडलं तर माझ्याशी गाठ आहे, इथं येणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शिक्षण घेतल्यानंतर लाथ मारेल,तिकडं पाणी काढलं पाहिजे, अशी धमक त्यांच्या निर्माण झाली पाहिजे, असेही ते म्हणले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com