Maharashtra Lok Sabha Election : मोहिते पाटील यांची नाराजी भाजपला परवडणारी नाही; मंत्री गिरीश महाजन यांचं मोठं वक्तव्य

Lok Sabha Election 2024 : अकलूज येथील मोहिते पाटील‌ यांची नाराजी भाजपला परवडणारी नाही असं मोठं वक्तव्य ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज केले. त्यांच्या वक्तव्यामुळे उमेदवारीत बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Maharashtra Lok Sabha Election
Maharashtra Lok Sabha ElectionSaam Digital
Published On

Maharashtra Lok Sabha Election

अकलूज येथील मोहिते पाटील‌ यांची नाराजी भाजपला परवडणारी नाही असं मोठं वक्तव्य ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज केले. त्यांच्या वक्तव्यामुळे उमेदवारीत बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी नाकारली. त्यानंतर नाराज माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते यांची समजूत काढण्यासाठी भाजपचे संकट मोचक समजले जाणारे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आज अकलूजला आले होते. यावेळी त्यांनी सुमारे दोन तास बंद दाराआड त्यांच्याशी चर्चा केली. मात्र सकारात्मक तोडगा निघाला नाही.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते यांची नाराजी भाजपला परवडणारी नाही. त्यामुळेच पक्ष श्रेष्ठीनी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाठवल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले. आमच्यातील झालेल्या चर्चेचा तपशील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देणार आहे. यावर पक्ष श्रेष्ठी अंतिम निर्णय घेतील. मोहिते पाटील यांचे राजकीय वजन व भाजपातील स्थान मोठं आहे. त्यांच्या नाराजीवर सकारात्मक तोडगा निघेल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.

Maharashtra Lok Sabha Election
Maharashtra Politics: 'शिवतीर्थावर काँग्रेसची सभा, हा शिवसैनिकांसाठी काळा दिवस', राहुल गांधींच्या सभेवर मुख्यमंत्री शिंदेंची टीका

राज्यातील महायुतीमध्ये जागा वाटपावरुन मित्रपक्षांमध्ये कलगितुरा पाहायला मिळत आहे. एकीकडे जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी बैठकांचा धडाका सुरू असतानाच माढ्यामध्ये रणजितसिंह निंबाळकरच्या उमेदवारीला राष्ट्रवादीच्या नेत्यांचा विरोध पाहायला मिळत असून निंबाळकर यांच्या विरोधात एक गट एकवटल्याचे दिसत आहे.

माढा लोकसभेत विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (RanjitSinh Naik Nimbalkar) यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर त्यांच्याविरोधात नाराज गटाच्या बैठकांना वेग आलेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शिवरत्न या निवासस्थानी या सर्व विरोधकांची बैठक पार पडली.

या बैठकीला विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर त्यांचे बंधू संजीव राजे नाईक निंबाळकर रघुनाथ राजे नाईक निंबाळकर, सातारा डीसीसीचे व्हाईस चेअरमन अनिल देसाई शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील शेकाप नेते डॉ .बाबासाहेब देशमुख, आमदार दीपक चव्हाण आदी नेते उपस्थित होते. आता या बैठकीत काय चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Lok Sabha Election
Maharashtra Lok Sabha Election : अखेर चंद्रहार पाटील या पक्षाकडून लढणार निवडणूक? सांगलीच्या जागेवर हे दोन पक्ष होते आग्रही

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com