Maharashtra Politics: 'शिवतीर्थावर काँग्रेसची सभा, हा शिवसैनिकांसाठी काळा दिवस', राहुल गांधींच्या सभेवर मुख्यमंत्री शिंदेंची टीका

CM Eknath Shinde: ''ज्या शिवतीर्थावर बाळासाहेब यांचे विचार ऐकण्यासाठी शिवसैनिक यायचे, त्या ठिकाणी काँग्रेसची सभा होत असून त्या ठिकाणी काही लोकं भाषण करतील, हा शिवसैनिकांसाठी काळा दिवस'', असं शिंदे म्हणाले.
CM Eknath Shinde criticized Rahul Gandhi
CM Eknath Shinde criticized Rahul Gandhi Saam Tv

CM Eknath Shinde criticized Rahul Gandhi and Uddhav Thackeray:

''आज ज्या शिवतीर्थावर बाळासाहेब यांचे विचार ऐकण्यासाठी शिवसैनिक यायचे, त्या ठिकाणी काँग्रेसची सभा होत असून त्या ठिकाणी काही लोकं भाषण करतील, हा शिवसैनिकांसाठी काळा दिवस आहे'', असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. आज ठाकरे गटाचे आमदार आमश्या पाडवी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे असं म्हणाले आहेत.

ते म्हणाले आहेत की, ''ज्या राहुल गांधी यांनी सावरकर यांचा अपमान केला, त्यांच्या मांडीला मांडी लावून काही जणं बसलेत. त्या सर्वांनी आधी राहुल गांधींना सावकरांच्या स्मारकाजवळ नतमस्तक करायला हवं होतं.''  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

CM Eknath Shinde criticized Rahul Gandhi
Lok Sabha Election 2024: अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या मतमोजणीच्या तारखांमध्ये बदल, 2 जूनला जाहीर होणार निकाल; काय आहे कारण?

आमदार आमश्या पाडवी यांच्या पक्षप्रवेशाबद्दल बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ''आमश्या पाडवींचं मी मनापासून स्वागत करतो. पाडवी हा वेगळा नाही, तो आमचा माणूस आहे. जाता जाता आम्ही त्याला मतदान करून गेलो. काही जण म्हणत होते, जाता जाता एकाचा तरी कार्यक्रम करू, नंतर म्हटलं जाऊदे.''  (Latest Marathi News)

उद्धव ठाकरे याना लक्ष्य करत ते म्हणाले, ''ज्या पक्षाकडे शिवसैनिकच नसतील तर ती कसली शिवसेना. शेकडो लाखो हजरो शिवसैनिकसोबत येत आहे. मग खऱ्याअर्थाने चुकीचा निर्णय कोणी घेतला, हे लक्षात येत आहे. ज्या काँग्रेससोबत इतकी वर्ष लढलो, त्यांच्यासोबत कसं बसायचं. आपण युतीत लोकसभा व विधानसभा लढलो. मग सरकार कोणाचं स्थापन व्हायला हवं होतं. पण निवडणुका होताच वरिष्ठ म्हणायला लागले की, आपल्याला सगळे दरवाजे उघडे आहेत. तेव्हा समजलं दाल मे कुछ काला है.''

CM Eknath Shinde criticized Rahul Gandhi
Electoral Bond: निवडणूक आयोगाने इलेक्टोरल बाँड्सचा नवीन डेटा केला जाहीर, कोणत्या पक्षाला किती मिळाली देणगी?

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, ''राजकारणात हे चालत नाही, विचारधारा पाळाव्या लागतात. स्वत:च्या खुर्चीसाठी मोहापोटी काहीजण वेगळा विचार करू लागले. अन्याय सहन करायचा नाही, हे बाळासाहेब बोलायचे. मग अन्याय जास्त होऊ लागल्यानंतर आम्ही पाऊल उचलले.''

दरम्यान, आज शिवाजी पार्कवर काँग्रेसची जाहीर सभा होणार आहे.या सभेने राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सभेला खूप महत्त्व प्राप्त झालं आहे. कारण निवडणूक जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच इंडिया आघाडीतील प्रमुख पक्षाचे नेते एकाच मंचावर दिसणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com