देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेले औंढा नागनाथ मंदिर पुढील एक महिना दर्शनासाठी बंद राहणार आहे, पुरातत्त्व विभागाने मंदिराच्या गाभाऱ्यातील दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केल्यामुळे हे मंदिर दर्शनासाठी बंद राहील यासंदर्भात मंदिर समितीच्या वतीने प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आले आहे तर भाविकांना दर्शनासाठी बाहेरून दर्शन घेता येईल अशी माहिती देण्यात आली आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी महाराष्ट्रातील देवस्थानाचा विकास करण्यासाठी मागील वर्षी घोषणा केली होती त्यामध्ये औंढा नागनाथ चा देखील समावेश होता दरम्यान या विकास कामांना आता प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याने हे मंदिर बंद करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे
प्रदीप पुर्णेकर यांच्या कार्यालय जवळून अगदी दोन पावलांवर उभे होते पप्प्या शिंदे याचे दुचाकी वाहन. पोलिसांनी हे वाहन ताब्यात घेत त्याचा पंचनामा केला आहे.वयात पोलिसांनी दुचाकी वाहन घटनास्थळी तपासून पंचनामा करत ताब्यात घेतले आहे.
मानखुर्द येथे खाली झालेली अंदाजे १४ एकर शासकीय जमीन बाह्य चित्रीकरणासाठी देण्यास महसूल विभागाची मंजुरी
सांस्कृतिक कार्य विभागाला ही जमीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय
बुडालेल्या दोन तरुणांचा शोध मोहीम सुरू; घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी.
अमरावती शहराच्या परिसरातील आठ तरुण या भागात फिरण्यासाठी आले होते त्यापैकी दोन तरुण बुडाल्याची प्राथमिक माहिती
पुर्णेकर कुटुंबीयांचे सांत्वन करण्याकरिता गणेश नाईक आले असताना पुर्णेकर कुटुंबीयांच्या घरी अज्ञात महिला शिरून फोटो व्हिडिओ काढत होती.. आणि व्हॉइस कॉल द्वारे संवाद साधत होती. संबंधित महिलेला तिचे नाव आणि पत्ता विचारला असता उलट तिने घरातल्यांना त्यांचे ओळख आणि आधार कार्ड विचारले आहे.
केंद्र सरकारची मंजुरी; मराठीचा ऐतिहासिक सन्मान
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून 'अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्रा'ला मंजुरी
मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी मानले केंद्र सरकारचे आभार
केंद्र पुण्यातील ऐतिहासिक डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेत (मानिव अभिमत विद्यापीठ) स्थापन होणार
तज्ज्ञांमार्फत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार; लवकरच सादर होणार
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि विविध प्रकल्पांसाठी केंद्राकडून मोठा निधी मिळणार
अभिजात मराठी भाषा सन्मान दिनाच्या (३ ऑक्टोबर) पूर्वसंध्येला मोठी घोषणा
जगभरातील मराठी भाषिकांसाठी आनंदाची बातमी
दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज विरोधात CJP चा आक्रमक पवित्रा
जंतरमंतर मध्ये पुन्हा मोठा आंदोलन उभारण्याची घोषणा.
लवकरच CJP चे सर्व समन्वयक आणि विद्यार्थी हे दिल्ली येथील जंतरमंतर येथे आंदोलनासाठी रवाना होणार.
कार्यालयाची पोलिसांकडून तपासणी सुरू
पुण्यात दोन ठिकाणी एमपीएससी आंदोलन सुरू आहेत.
धनंजय मुंडे यांचा विद्यार्थ्यांशी संवाद
मी आज इथं आलोय तुमचा आंदोलन पाहिला नाही तुमच्यासोबत आंदोलनात लढण्यासाठी आलो आहे
हजारो विद्यार्थी रस्त्यावर आले आहे
परीक्षेतील पारदर्शकता असेल औषध निरीक्षक घोटाळा असेल अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहेत
हे सर्वात मोठे आंदोलन आहे
मुख्यमंत्र्यांना फोनवरून तुमच्या मागण्यात सांगितलेले आहे
संपूर्ण माहिती सी एम सरांना दिलेल्या आहेत
सचिव यांनी राजीनामा द्यावा ही मागणी आहे, रखडलेल्या निकाल लावा
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑब्जेक्टिव नसल्याने विद्यार्थी यांना निर्माण झाले आहे
मी जाईल एकदा उतरलो की मी माघार घेणार नाही
सी एम यांनी फोनवरून शब्द दिला आहे येणाऱ्या परीक्षेत ऑब्जेक्टिव्ह असेल असा दिला आहे
पुढच्या आठवड्यात आपल्या विद्यार्थी सोबत बैठक घेऊन आपले सर्व प्रश्न मुख्यमंत्री यांच्याकडून मान्य करून घेऊ,नाही मागण्या मान्य नाही झाल्या तर मी इथ येऊन आंदोलन करणार
मुख्यमंत्री यांना माझ्या स्वभाव माहिती आहे मी मागे हटत नाही,एक बैठक शिष्टमंडळ तिकडे येईन पूर्ण करू..
मुख्यमंत्री आपल्या सर्व मागणी पूर्ण करतील
या आंदोलनात आण एकजण उतरला आहे तो मी आहे.
मुख्यमंत्री यांना सोमवार किंवा मंगळवार वेळ घेऊन भेटू
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार सुनावणी घेऊन अन्न व औषध प्रशासनाचा निर्णय
सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्सेस लि.च्या वडकी, पुणे येथील सी अँड एफ गोदामाचे घाऊक औषध विक्री परवाने रद्द
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नियमानुसार कारवाई
‘Reactin Plus’ या Schedule H औषधाच्या वेष्टनावरील जाहिराती व दाव्यांबाबत नियमांचे उल्लंघन झाल्याचे तपासणीत निष्पन्न
औषधाच्या पॅकेजिंगवर डोकेदुखी, स्नायुदुखी, पाठदुखी, सांधेदुखी आणि दातदुखीपासून त्वरित आराम मिळण्याचे दावे
औषधाच्या कार्टनवर मानवी आकृती दाखवून स्नायुदुखी कमी होत असल्याचे चित्रण
गोदामात औषधांचे बॉक्स जमिनीवर, साठ्यावर धूळ आणि स्वच्छतेबाबत त्रुटी आढळल्या
मुदतबाह्य औषधांच्या साठवणुकीसाठी स्वतंत्र व्यवस्था, विल्हेवाटीची कार्यपद्धती आणि आवश्यक अभिलेखांमध्ये त्रुटी
संगणकीय नोंदी आणि प्रत्यक्ष औषधसाठ्यात तफावत; प्रतिजैविक औषधांचाही समावेश
कंपनीचे लेखी उत्तर आणि वैयक्तिक सुनावणीतील म्हणणे विचारात घेऊन परवाना प्राधिकाऱ्याचा सकारण आदेश
४ सप्टेंबरला सुधारित कारणे दाखवा नोटीस, ११ सप्टेंबरला कंपनीचे उत्तर आणि २१ सप्टेंबरला वैयक्तिक सुनावणी
१ ऑक्टोबर २०२६ रोजी औषध विक्री परवाने रद्द करण्याचा आदेश; २ ऑक्टोबरला FDA कडून प्रसिद्धीपत्रक
- SIT पथकाने केलेल्या दोन आरोपींना पोलिस कोठडी
- आरोपी शुटर निखिल यादव आणि कोत्याने हल्ला करणारा आरोपी नितेश पवार यांना पोलिस कोठडी
- ठाणे न्यायालयातील न्यायाधीश यांनी दिली पोलिस कोठडी
- ८ ॲाक्टोबर पर्यंत दिली पोलिस कोठडी
- नवापूर शहरातील सार्वजनिक मराठी हायस्कूलमध्ये महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंतीचा कार्यक्रम सुरू असताना एका माकडाने अचानक शाळेत शिरकाव केला.यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये मोठी घबराट उडाली. या माकडाने दोन विद्यार्थ्यांवर थेट हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रसंगावधान राखून विद्यार्थी खाली बसल्याने ते थोडक्यात बचावले. माकड परिसरात सैरावैरा फिरत असल्याने काही काळ भीतीचे वातावरण होते. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.शहरात मोकाट माकडांचा वावर वाढला असून, विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये यासाठी वनविभागाने तातडीने या माकडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शाळेतील शिक्षकांनी केली आहे.
शरद पवार यांच्या पुरंदर तालुक्यातील दुष्काळ पाहणी दौऱ्यादरम्यान गर्दीचा फायदा घेत चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरी करताना काही युवकांना उपस्थितांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती आहे.
या युवकांकडून चोरीचा प्रयत्न नेमका कशासाठी करण्यात आला, तसेच त्यांच्याकडून काही मुद्देमाल जप्त झाला आहे का, याबाबत पोलिसांकडून अधिक माहिती घेण्यात येत आहे. घटनेमुळे दौऱ्याच्या ठिकाणी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
गुन्हे शाखा, घटक-१ ठाणे पोलिसांनी कळवा परिसरात कारवाई करत तब्बल २०४ ग्रॅम मेफेड्रोन अर्थात MD अंमली पदार्थ जप्त केला आहे. या MD ची किंमत तब्बल ६ लाख १२ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावरून खारेगाव टोलनाक्याच्या दिशेने मुंब्राकडे जाणाऱ्या मार्गावर पोलिसांनी सापळा रचून आसिफ नविन पोके उर्फ शोएब, वय ३७ वर्षे, याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २०४ ग्रॅम MD जप्त करण्यात आले.
या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५७१/२०२६ अंतर्गत NDPS कायद्याच्या कलम ८(सी), २२(सी) आणि २९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखा घटक-१ चे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिरसाठ करत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
पुण्यातील शास्त्री रोडवर एक ठिकाणी आंदोलन सुरू या आंदोलनाला काही वेळा धनंजय मुंडे भेट देणार.. तर दुसऱ्या आंदोलन एसएम जोशी पुलावर काल रात्रीपासून सुरू.. परीक्षा पद्धती पूर्वीप्रमाणे ऑब्जेक्टिव्ह असावी.. ग्रामीण भागात दुष्काळ असल्यामुळे सरकारने विशेष मत द्यावी..
दिवेआगर समुद्र दुर्घटना अत्यंत दुर्दैवी; समुद्रकिनाऱ्यांवर सुरक्षाव्यवस्था वाढवण्याची गरज
समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षेसाठी रायगडमध्येही उपाययोजना करण्याचा पाठपुरावा करणार; भास्कर जाधव
दिवेआगर समुद्रकिनारी आठ मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असल्याची भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया.
बाहेरून येणारे पर्यटक समुद्राचे विहंगम दृश्य पाहून आकर्षित होतात आणि अनेकदा लाटांमध्ये खेळण्याचा प्रयत्न करतात, असे जाधव यांनी सांगितले.
समुद्रकिनाऱ्यावर जिथे आपण उभे असतो तिथे अचानक खड्डा पडतो आणि लाटा आत ओढतात, त्यामुळे अशी दुर्घटना घडू शकते, असा इशारा.
रत्नागिरीचा पालकमंत्री असताना रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर सुरक्षेसाठी गार्डची व्यवस्था करण्यात आल्याचे जाधव यांनी सांगितले.
SIR प्रक्रियेबाबत उपस्थित केलेल्या आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर चिपळूणमध्ये ७ ऑक्टोबरला इंडिया आघाडीतर्फे विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चा चिंचनाका मार्गे प्रांताधिकारी कार्यालयावर नेण्यात येईल. येथे निवेदन देण्यात येणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासह उत्तर रत्नागिरीतील तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी करण्यात येणार आहे. युवा आणि ‘जेन झी’ पिढीनेही सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार भास्कर जाधव यांनी केले आहे.
दिवेआगर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आळंदी नगरपरिषदेकडून शहरातील कोचिंग क्लासेस आणि आस्थापनांची पाहणी सुरू आहे. यावेळी विनर्स अकॅडमीकडे आवश्यक व्यवसाय परवाना आणि ना-हरकत प्रमाणपत्र नसल्याचं नगरपरिषदेच्या अभिलेखातून समोर आलं. मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या आदेशानुसार कर विभाग प्रमुख सीमा चारवे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अकॅडमीची मिळकत सील केली. या कारवाईवेळी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
मुंबईतील दादर परिसरात सुरू असलेल्या सीजेपी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भवन ते शिवाजी पार्ककडे जाणारा रस्ता पोलिसांनी बंद केला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव या मार्गावरून कोणतेही वाहन शिवाजी पार्क परिसरात सोडले जात नाही. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला असून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.
दिवेआगर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आळंदी नगरपरिषदेकडून शहरातील कोचिंग क्लासेस आणि आस्थापनांची पाहणी सुरू आहे. यावेळी विनर्स अकॅडमीकडे आवश्यक व्यवसाय परवाना आणि ना-हरकत प्रमाणपत्र नसल्याचं नगरपरिषदेच्या अभिलेखातून समोर आलं. मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या आदेशानुसार कर विभाग प्रमुख सीमा चारवे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अकॅडमीची मिळकत सील केली. या कारवाईवेळी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
विविध मागण्यांसाठी आज पंढरपुरात लोहार समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सकाळी मोर्चाला सुरुवात झाली.
लोहार समाजातील मुलांना व्यवसायासाठी बिनव्याजी 10 लाख रुपयांचे कर्ज द्यावे, त्याचबरोबर राजकीय प्रतिनिधित्व द्यावे इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.
नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाअभावी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असतानाही रब्बी कांदा लागवडीला सुरुवात झाली आहे. नद्या-नाले, विहिरी आणि बोअरवेलमध्ये पाणीसाठा अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांसमोर पिकाला पाणी देण्याचे मोठे आव्हान आहे. भविष्यात पाऊस पडेल, या आशेवर काही शेतकरी उपलब्ध पाण्याचा वापर करत तर काहीजण विकत पाणी घेऊन कांदा जगवण्याची धडपड करत आहेत.
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात जेव्हीएम बिल्डरचे बिल्डर जितेंद्र मेहता यांना क्राइम ब्रांचने चौकशीसाठी बोलावलं आहे. पूर्णेकर कुटुंबीयांनी जेव्हीएम बिल्डरविरोधात आरोप केले असून, या पार्श्वभूमीवर चौकशी महत्त्वाची मानली जात आहे. जेव्हीएम बिल्डिंगच्या बाजूला असलेल्या अनधिकृत लोखंडी पार्किंगविरोधात प्रदीप पूर्णेकर आंदोलन करणार होते.
मंगळवेढा तालुक्यात दुष्काळामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. आमदार समाधान आवताडे यांनी हुन्नूर, ममदाबाद, लोणार, पडळकरवाडी, रेवेवाडी, मानेवाडी आदी गावांचा दौरा करून परिस्थितीची पाहणी केली.
महाराष्ट्रातील रिपब्लिकन ऐक्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असून, इतर रिपब्लिकन पक्षांनीही पुढाकार घ्यावा, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं. नगरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश करून अध्यक्षपद भूषवावे, अशी भूमिका मांडली.
पवना धरणग्रस्तांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी पवना धरण परिसरात दाखल झाले. यावेळी धरणग्रस्त शेतकऱ्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले, तसेच २०११ मधील पोलिस गोळीबारात शहीद झालेल्या तीन शेतकऱ्यांच्या हुतात्मा स्मारकाला त्यांनी अभिवादन केले. धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसाठी होणाऱ्या जलसमाधी आंदोलनाला मुख्यमंत्री कार्यालयाकडून १५ दिवसांत चर्चेतून तोडगा काढण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर तूर्तास स्थगिती देण्यात आली.
गांधी जयंतीचे औचित्य साधून कोपरगाव शहरात आज व्यापाऱ्यांकडून ‘नो UPI डे’ आंदोलन करण्यात आले. UPI व्यवहारांवर MDR शुल्क आकारण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ व्यापारी वर्गाने गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलन केले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.
आदिवासी विद्यार्थ्यांचा उलगुलान मोर्चा नाशिकहून मुंबईच्या दिशेने रवाना झाला असून आज मोर्चाचा पाचवा दिवस आहे. गेल्या चार दिवसांच्या तुलनेत आज मोर्चेकऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मुंबईच्या दिशेने मोर्चाची वाटचाल सुरू असताना विद्यार्थ्यांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे. मोर्चाला मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादामुळे मुंबईकडे जाणाऱ्या या आंदोलनाची व्याप्तीही वाढताना दिसत आहे.
आज गांधी जयंतीनिमित्त देशभर स्वच्छतेचा संदेश दिला जातोय.
मात्र वारकऱ्यांची माउली असलेली आळंदीची इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या विळख्यात असताना, नदी स्वच्छतेसाठी तरुणाई पुढे सरसावली आहे.
४ तारखेच्या मोर्चा बाबत राज ठाकरेंनी बोलवली नेत्यांची बैठक
मोर्चाच्या मारतहाबाबत अजूनही साशंकता कायम
मोर्चाच्या मार्गाबाबत चर्चा करण्यासाठी राज ठाकरे आणि नेत्यांमध्ये होणार बैठक
कृषिमंत्र्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्या मांडणार
शरद पवार आज दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौऱ्यावर आहेत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धारावीत
धारावी पुनर्विकास प्रकल्पाची पाहणी करणार
धारावीच्या एक्सपिरियन्स सेंटरला भेट देत जुनी धारावी आणि पुनर्विकासानंतरची धारावी या मॉडेल्सची मुख्यमंत्री पाहणी करणार
दिवेआगर दुर्घटनेत आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर आळंदी आणि पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.
विनर्स अकॅडमीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नगराध्यक्ष प्रशांत कु-हाडे यांनी केलीय
- विलास घुले खून प्रकरणात सौरव सोनवणेंवर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली जात होती.
- मात्र दोषारोप पत्रात कुठेही सौरव सोनवणेंचे नाव नाही तसेच तपासात देखील त्यांचा कुठेही सहभाग आढळलेला नाही अशी सुत्रांची माहिती आहे.
विनर्स ॲकॅडमीवर नगरपरिषदेची कारवाई होणार
पोलिसांच्या मदतीने क्लास सील करणार
अहिल्यानगर -
पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट
प्लॉट विक्रीचे पैसे घेऊन जाताना दुचाकीस्वारांचा दीपक येळाई यांच्यावर हल्ला करून नऊ लाख रुपये नेले लुटून
दिवसाढवळ्या पाथर्डी शहरातील पेठ परिसरात भर बाजारात घडली घटना
या झटापटीत येळाई जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले
छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्याची नासाडी कराल तर गुन्हा दाखल होऊ शकतो
दुष्काळी परिस्थितीमध्ये छत्रपती संभाजीनगर शहरात पाण्याचा योग्य वापर व्हावा, यासाठी महापालिकेनेही आता कंबर कसली आहे.
यापुढे छत्रपती संभाजीनगरात पाण्याची नासाडी कराल तर महापालिका आर्थिक दंड लावणार आहे, गरज पडली तर गुन्हेही दाखल केली जाणार आहेत.
शहरात आता पहिल्यांदा पाण्याची नासाडी करताना आढळल्यास पाच रुपये दंड, दुसऱ्या वेळेस वीस हजार तर तिसऱ्या वेळेस पंचवीस आजाराचा दंड लावला जाणार आहे.
शेवटी चौथा वेळेस थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा महापालिका आयुक्ताने दिलाय. त्यामुळे छत्रपती संभाजी नगरकर पाण्याची नासाडी करत असाल तर सावधान कारण महापालिकेचं तुमच्यावर लक्ष असणार आहे.
वर्धा -
- समृद्धी महामार्ग अपघात प्रकरण
- गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी घेतली जखमीची भेट
- सावंगी रुग्णालयात जखमीची भेट घेत केली विचारपूस
- जखमीची विचारपूस करत डॉक्टरांना दिले निर्देश
- पालकमंत्री पंकज भोयर यांच्यासह माजी खासदार रामदास तडस उपस्थित
लातूर जिल्ह्यातील नदी-नाले कोरडे, घरणी नदीपात्राने गाठला तळ
अनेक गावांवर भीषण पाणीटंचाईचे संकट
लातूर जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने नदी-नाले कोरडे पडले आहेत.
चाकूर तालुक्यातून वाहणाऱ्या घरणी नदीपात्रातही पाण्याचा थेंब नसल्याच चित्र पाहायला मिळत आहे.
नदीकाठच्या अनेक गावांमध्ये आगामी काळात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
ठाणे-
- प्रदिप पुर्णेकर हत्या प्रकरण
- दोन आरोपींना अटक
- नितेश पवार आणि निखिल यादव यांना अटक
- ठाणे क्राईम ब्रांचने केली अटक...
Maharashtra : राज्यातील धरणात जलतुटवडा, राज्यातील धरणात ७५ टक्केच जलसाठा
राज्यातील धरणात जलतुटवडा
राज्यातील धरणात ७५ टक्केच जलसाठा
मराठवाड्यात भीषण पाणी टंचाई
मराठवाड्यातील मध्यम, लहान प्रकल्पही कोरडे
मराठवाड्यातील सर्व प्रकारच्या धरणात ४४.९२ टक्के पाणीसाठा
मागील वर्षीच्या तुलनेत ३७.८३ टक्के कमी पाणीसाठा
बुलडाणा -
जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा
2 ऑक्टोबर पासून काम बंद आंदोलन
नागपूर -
- नागपूर रेल्वे स्थानकावर सव्वा किलो अमली पदार्थ जप्त, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर प्रादेशिक पथकाची मोठी कारवाई
- डीआरआयच्या पथकांकडून तीन ठिकाणी छापे टाकत....अॅम्फेटामाईनसह बिबट्याची कातडी मिळून आली...
- डीआरआयकडून तीन दिवस अत्यंत गोपनीय पद्धतीने छापेमारी....मध्य रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने डीआरआयची कारवाई
- हजरत निजामुद्दीन-केएसआर बंगळुरू राजधानी एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या महिलेची झडती
- महिलेच्या सुटकेसच्या चोर कप्प्यात अमली पदार्थ लपवल्याचे आढळले
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार याआज दुष्काळ पाहणी दौऱ्याला सुरुवात करणार आहेत.
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातून शरद पवारांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्याला सुरुवात होणार आहे.
सकाळी साडेदहा वाजता पुरंदर तालुक्यातील परिंचे गावात शरद पवार शेतकऱ्यांशी संवाद साधतील त्यानंतर वीर येथील पाहणी करून लपतळवाडी पाझर तलावाची ते पाहणी करतील.
साडेअकराच्या सुमारास मांडकी येथे ते शेतकऱ्यांशी संवाद साधतील त्यानंतर वाल्हे,वाघदळवाडी, बाळाजीचीवाडी, राख,गुळूंचे आणि निरा कॉर्नर या ठिकाणी ते शेतकऱ्यांशी संवाद साधतील.
पुणे -
राज्यातील साखर कारखाने कमी दिवस चालत असल्याने आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर साखर उद्योगासाठी नवे आर्थिक मॉडेल तयार करण्यात येणार आहे. साखर आयुक्त, सहकार विभाग आणि राज्य सहकारी बँकेला महिनाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच जैवइंधन व जैवऊर्जा धोरण, गूळ उद्योगासाठी कायदा आणि इथेनॉलच्या दरवाढीबाबतही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
पुणे -
बँकिंग क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक अनास्कर यांच्या 'बँकांविषयी सर्वकाही' पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
बँकिंग क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक तथा महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी लिहिलेल्या 'बँकांविषयी सर्वकाही' या पुस्तकाच्या तीन भागांचे प्रकाशन मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले
याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते
मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनास्कर यांच्या गेल्या ३८ वर्षांच्या बँकिंग साक्षरतेच्या अविरत कार्याचा गौरव केला
मुंबई -
चहाच्या बहाण्याने अभिजीत दिपके यांना ताब्यात घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न?
आज दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे कॉक्रोज जनता पार्टीचे आंदोलन होणार.
आंदोलनापूर्वी अभिजीत दिपके मुंबईत दाखल.
पत्रकार परिषदेनंतर अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबईत फेरफटका मारला.
सायंकाळी उशिरा मरीन ड्राइव्ह परिसरात फेरफटका मारत असताना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलीस ठाण्यात नेले.
डिटेन करणार असाल तर तस अधिकृत सांगा,- अभिजित दीपके यांचा पोलिसांना सवाल
मात्र चहा पिण्यासाठी तुम्हाला बोलावत असल्याचे पोलिसांचे म्हणणे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.