पुण्यातील चतु:र्श्रुंगी पोलीस स्टेशन मध्ये अमित ठाकरे यांच्यासह मन विषयाच्या 20 ते 25 कार्यकर्त्यांवर करण्यात आला आहे गुन्हा दाखल
या प्रकरणी अटकेत असलेल्या 2 जणांना 3 दिवसांची पोलीस कोठडी
प्रशांत कनोजिया आणि विक्रांत भिलारे या दोन मनसेच्या कार्यकर्त्यांना गुन्हा दाखल झाल्यानंतर काल मध्यरात्री पुणे पोलिसांनी केली होती अटक
आज दुपारी दोघांना पुणे पोलिसांनी कोर्टात केलं होतं हजर
केडीएमसीच्या सत्तेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बाहेर काढावे, असा अल्टिमेटम भाजपकडून शिवसेना शिंदे गटाला देण्यात आल्यानंतर आता शिंदे गटाने भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘भाजपने आम्हाला अल्टिमेटम देऊ नये,’ असा थेट इशारा शिंदे गटाचे नेते राजेश कदम यांनी दिला आहे.
जेवणात पाल पडून शिजवल्यामुळे आश्रमशाळेतील ३१ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील नगराळा येथील अंब्रू नाईक माध्यमिक आश्रमशाळेत घडली. या घटनेने पालक आणि स्थानिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
अण्णा हजारे यांची प्रकृती सध्या स्थिर असून काळजी करण्याचे कारण नसल्याचे डॉक्टरांनी केलं स्पष्ट
अण्णा हजारे यांच्यावर उपचार सुरू
अण्णा यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ गौतम भन्साळी यांनी दिली माहिती
अण्णांचे वय 91 वर्षे असल्याने काही प्रमाणात विस्मरणाचा त्रास जाणवू शकतो, अशी माहितीही डॉ. गौतम भन्साळी यांनी दिली
उपचारांना चांगला प्रतिसाद मिळाल्यास पुढील तीन-चार दिवसांत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता
गडचिरोली पोलीस दलाच्या 'प्रोजेक्ट संजीवनी'चा उपक्रम
गडचिरोलीत माओवाद संपुष्टात - 819 माओवाद्यांचे आतापर्यंत आत्मसमर्पण
आत्मसमर्पितांना मिळाला हक्काचा निवारा - 14 जणांना भुखंड आणि पुनर्वसन निधी
आत्मसमर्पितांच्या मुलांना सायकल, शैक्षणिक साहित्य आणि वाहन परवान्यांचे वाटप
गडचिरोलीच्या चामोर्शीमध्ये एसटी बसच्या अनियमिततेविरोधात विद्यार्थ्यांनी आज चक्का जाम केला.
गणपूर-जयरामपूर मार्गावरील एसटी बस वेळेवर येत नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी चामोर्शी बसस्थानकावर अर्धा तास रास्ता रोको केला.
दररोज सकाळी सहा वाजता शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी साडेबारा आणि दोन वाजताची बस वेळेवर मिळत नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. बससाठी ताटकळत बसावे लागत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी होती.
आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक ढाकणे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि तात्काळ बस उपलब्ध करून दिली, त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
ग्रामीण भागात एसटी हीच विद्यार्थ्यांसाठी जीवनवाहिनी आहे, त्यामुळे बससेवा नियमित करावी अशी मागणी आता पालकांमधून होत आहे.
नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसी परिसरातील साधना एंटरप्राइज या कंपनीवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. कंपनीवर छापा टाकून तब्बल ४ हजार ९४२ कार्टन माल जप्त करण्यात आला असून, या मालाची बाजारातील किंमत सुमारे ७५ लाख २१ हजार रुपये असल्याची माहिती आहे.
- आदिवासी आयुक्त लीना बनसोड यांचं आंदोलक विद्यार्थ्यांना आश्वासन
मागण्या पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नाही - आंदोलक
थेट शंभुराजे देसाई यांना कॉल करून प्रकृती बघवत नसल्याचं म्हटलं...
चाकण औद्योगिक क्षेत्रात महिंद्रा कंपनीजवळ मालवाहू छोट्या टेम्पोला अचानक आग लागली. CNG लिकेज झाल्याने आग लागल्याचा अंदाज असून अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले. चाकण औद्योगिक क्षेत्रातील महिंद्रा कंपनीजवळ मालवाहू छोट्या टेम्पोला आग लागल्याची घटना घडली. CNG लिकेज झाल्याने आग लागल्याचा अंदाज अग्निशामक दलाच्या जवानांनी व्यक्त केला आहे. आग लागल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतूककोंडी झाली.
पावसाने दीड महिन्यापासून पाठ फिरवल्याने शिंदखेडा तालुक्यासह धुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. वरझडी येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे शानाभाऊ सोनवणे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली, पावसाअभावी पिकांची वाढ खुंटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
नांदेड जिल्ह्यात काही दिवसात ऊस गळीत हंगाम सुरू होणार आहे. मात्र हंगाम सुरू होण्याआधीच शेतकऱ्यांनी कारखानदारांविरोधात एल्गार पुकारला आहे. कारखानदारांनी शेतकऱ्यांसमक्ष जिल्हाधिकाऱ्यांसमोर बैठक घेऊन उसाला पहिली उचल चार हजार रुपये आणि अंतिम भाव सहा हजार रुपये प्रति टन जाहीर करावा अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केलीय.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावल्यामुळे धाराशिव मधील मराठा तरुण आक्रमक झाले आहेत. धाराशिवमधील सेंटर बिल्डींग परीसरातील चार मजली सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीवर तरुण चढले आणि आंदोलन केले. सलग चार ते पाच तरुणांचे शोले स्टाईल आंदोलन सुरू आहे.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, आबासाहेब पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांचा समावेश असलेले सरकारचे शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल झाले आहे.
विमानतळावरून शिष्टमंडळ अंतरवली सराटीकडे रवाना होऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार असून, या चर्चेनंतर उपोषण सुटणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रायगडच्या अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सुनील आवरे या रुग्णाच्या अंगावर स्लॅब कोसळून जखमी झाल्याची घटना घडली आहे.
बदलापूर जवळील सावरे गावात तणनाशक फवारलेलं गवत खाल्ल्यानं चार दुभत्या म्हशींना विषबाधा झालीये. यात तीन दुभत्या म्हशींचा जागीच मृत्यू झालाय, तर एक म्हैस अत्यवस्थ आहे. देविदास खंबाळे असं बाधित शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे खंबाळे यांचं मोठं आर्थिक नुकसान झालय. वेळेत फोन करूनही पशुवैद्यकीय अधिकारी मदतीसाठी पोहोचले नाहीत, तसच तक्रार देऊनही पोलिसांनी दखल घेतली नाही, असा गंभीर आरोपही शेतकरी खंबाळे यांनी केलाय. निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांमधून होतीय.
५ सप्टेंबर रोजी दिल्लीत होणारा CJP मोर्चा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच गुन्हे मागे घेण्याबाबत सरकारने कोर्टात स्पष्टता दिल्याने CJP ने हा निर्णय घेतला आहे.
समृद्धी महामार्गावरील वैजापूरजवळील दरोडा प्रकरणाची पोलीस अधीक्षकांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात वैजापूर पोलीस ठाण्याचे सुनील खरात आणि विरगाव पोलीस ठाण्याचे गुणवंत थोरात यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांची बदली करून त्यांना मुख्यालयी हलवण्यात आले आहे. ठाणे अंमलदारासह एका पोलीस कर्मचाऱ्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. दरोडा प्रकरणातील तपास आणि पोलिसांच्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे.
जालना -
आंतरवाली सराटीत मराठा बांधवांसाठी तब्बल तीन क्विंटलची दाळबाटी
अंतरवाली सराटी आणि शहापूर येथील मराठा बांधवांनी राज्यभरातून आलेल्या मराठा बांधवांसाठी केली जेवणाची सोय
अंतरवाली सराटीत मनोज जारंगे यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा बांधव दाखल होत आहे
राज्यभरातून आलेले मराठा बांधव उपाशीपोटी राहू नये म्हणून अंतरवाली सराटीमध्ये जेवणाची व्यवस्था केली जात आहे
बुलडाणा -
ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी बुलडाण्यात मूक मोर्चा
शेकडो अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
जळगाव जिल्ह्यातील घटनेचा निषेध ..
ग्रामसभेतील व्हिडिओ चित्रीकरणावर मर्यादा आणण्याची मागणी
रत्नागिरी - ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा रत्नागिरीमध्ये मूक मोर्चा
सुरक्षितता आणि प्रलंबित मागण्या यांसाठी जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी युनियन मार्फत मोर्चा
जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालय असा निघणार मोर्चा
जळगाव येथील ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना सुरक्षितता मिळावी यासाठी मूक मोर्चाचे आयोजन
मूक मोर्चा मध्ये जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी
अहिल्यानगर
अहिल्यानगरच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांचा दुष्काळ?
शिक्षकांच्या २,६५७ रिक्त पदांवरून निलेश लंकेचा जिल्हा परिषदेच्या आवारात उपोषण सुरु
पुणे -
बारामतीमध्ये होणारा दही हंडी उत्सव यंदा रद्द?
बारामतीमध्ये यंदा दही हंडी उत्सव होणार नाही?
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे समस्त बारामतीकरांंचा निर्णय?
उत्सव साजरी न करण्याबाबत अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
दादांच्या निधनामुळे बारामती शहर, तालुका दुःखामध्ये असल्यामुळे बारामती मध्ये यंदा दही हंडी साजरी न करण्याचा निर्णय अशी चर्चा
पुणे -
कर्णकर्कश डीजेविरोधात पुण्यात आणखी एका आंदोलनाचे आयोजन
पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरातील रहिवाशांची डीजे साउंड सिस्टिम विरोधात रॅली
उद्या सकाळी ११ वाजता कात्रज भागात होणार आंदोलन
बेमर्याद आणि कर्कश डी जे साउंड सिस्टिम विरोधात केलं जाणार आंदोलन
काही दिवसांपूर्वी पुण्यातील गुडलक चौकात सुद्धा गणेशोत्सवातील लावणाऱ्या लाऊडस्पिकर हद्दपार करण्याच्या मागणीवरून झालं होतं आंदोलन
लातूर -
लातूर जिल्ह्यात आजपासून हेल्मेट सक्ती
नियम मोडणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात
लातूर जिल्ह्यात दुचाकीस्वारांसाठी आजपासून हेल्मेट वापरण्याची सक्ती
हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाईला सुरुवात झाली
पुणे -
मनसे पदाधिकारी चतुश्रृंगी पोलीस स्टेशनला जमा झाले आहेत
दोन पदाधिकाऱ्यांना अटक झाल्यानंतर मनसे आक्रमक
ठाकरे यांनी काल पॉलिटेक्निकल कॉलेज मधील फोटो काढल्यानंतर त्यांच्यावर झाला होता चतुर्शिंगी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
शहराध्यक्ष इतर पदाधिकारी पोलीस स्टेशनमध्ये
उद्धवसेनेचे जिल्ह्यातील एकमेव नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे हे सात नगरसेवकांसह शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. यासाठी ते मुंबईकडे रवाना झाले आहेत.
नगराध्यक्ष ठोंबरे यांनी समर्थक नगरसेवकांसह शिंदेसेनेत जाण्याचा निर्णय दोन महिन्यांपूर्वीच घेतल्याचे सांगण्यात येते. यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या दोन बैठका झाल्या होत्या. शहराच्या विकासासाठी भरीव निधी आणि विविध विकासकामांबाबत ठोंबरे यांनी काही मागण्या केल्या होत्या. त्यांना शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते.
जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडाव्यात आणि कायदा व सुव्यवस्थेचा व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने १४ ते २५ सप्टेंबर पर्यंत अनंत चतुर्दशीचे गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा वापर करण्यास जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी निर्बंध लागू केले आहेत.
या आदेशाचा भंग करून गणपती विसर्जनाचे मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा वापर करताना आढळून आल्यास अशा व्यक्ती, संस्था, मंडळे यांच्यावर भारतीय न्याय संहितेचे कलम २२३ मधील तरतुदी व प्रचलित कायद्यान्वये शिक्षेस, कायदेशीर कारवाईस पात्र राहतील
शहरात आठ महिन्यात 61 खून आणि 82 खुनाचे प्रयत्न...
पुण्यातील विविध गुन्ह्यांची आकडेवारी पुणे पोलिसांकडून आणण्यात आली समोर
गुन्हेगारीचे प्रमाण आणखी कमी करण्यासाठी उपयोजना सुरू असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती.
खून रोखण्यात पुणे पोलीस आयुक्तांना अपयश
जालन्यातील परतुर तालुक्यातील नागतास धरणात जलसमाधी आंदोलन...
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या तात्काळ मान्य करा आंदोलकांची मागणी...
जोपर्यंत मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत जलसमाधी आंदोलन करणार...
सातारा–लातूर राष्ट्रीय महामार्ग पुसेगावबाहेरून नेण्याच्या प्रस्तावाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवत आज व्यापारी आणि ग्रामस्थ बाजारपेठ बंद ठेवून या बंदमध्ये सहभागी झाले आहेत.
पुसेगाव हे परिसराचे प्रमुख धार्मिक व व्यापारी केंद्र असल्याने बाह्यवळण रस्त्यामुळे स्थानिकांच्या व्यवसायावर आणि विकासावर विपरीत परिणाम होईल. अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
महामार्ग गावाच्या मुख्य भागातूनच न्यावा, या मागणीसाठी सर्वपक्षीय ग्रामस्थ व व्यापारी एकवटले असून प्रशासनाने हा निर्णय बदलून स्थानिकांच्या हिताचा निर्णय घ्यावा, अशी एकमुखी मागणी करण्यात आली आहे.
नागपुरातील आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त कार्यालयासमोर सुरू असलेले आदिवासी विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन आज नवव्या दिवशीही सुरूच आहे. भंडारा, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यातील विद्यार्थी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनावर ठाम आहेत.
दरम्यान, आदिवासी मंत्री अशोक उईके यांच्या मध्यस्थीनंतर स्थगित करण्यात आलेल्या आंदोलनाला आज १८ दिवस पूर्ण झाले आहेत. ...
मात्र, मागण्यांवर अद्याप ठोस निर्णय न झाल्याने विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलनाची भूमिका घेतली आहे.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,मंत्री उदय सामंत, मंत्री शंभूराजे देसाई दुपारी दोन वाजता अंतरवाली सराटीत दाखल होणार...
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस , चौथ्या दिवशी सरकारच शिष्ट मंडळ जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत...
सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर काही तोडगा निघतो का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे...
खासदार सुप्रिया सुळे या पुणे महापालिकेत आयुक्त नवलकिशोर राम यांची भेट घेण्यासाठी महानगरपालिकेत दाखल
पुणे शहरातील विविध समस्या आणि कचरा डेपो संदर्भात चर्चा केली जाणार
लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला आपले मत मांडण्याचा आणि प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. मात्र, विरोधी आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत खासदार राहुल गांधी यांच्यावरील एफआयआरच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष चंदूशेठ कदम यांच्या नेतृत्वाखाली झाशीची राणी लक्ष्मीबाई चौक, जे. एम. रोड, शिवाजीनगर येथे हे आंदोलन झाले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत राहुल गांधी यांच्यावरील गुन्हा मागे घेण्याची मागणी केली.
श्याम संतोष अग्रवाल असे तरुणाचे नाव
आयआयटी खरगपूर येथून पूर्ण करून जापान मध्ये इंटरशिप सुरू होती
बारा दिवसानंतर मृतदेह भारतात दाखल होणार
संभाजीनगर मध्ये अंतिम संस्कार पार पडणार
पुण्याच्या खेड तालुक्यातील राजगुरुनगरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. बहिणीशी पत्नी बोलत नसल्याच्या रागातून माजी सैनिक पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आईला उठवण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय मुलावरही हल्ला करून त्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न करण्यात आला.
काल अमित ठाकरे यांच्यासह 20 ते 25 जणांवर पुण्यातील चतुर्शिंगी पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आला होता गुन्हा दाखल
तर पुणे पोलिसांनी रात्री उशिरा दोघांना केली अटक
प्रशांत कनोजिया, विक्रांत भिलारे अशी अटक झालेल्या दोन मनसैनिकांची नाव
पावसाळ्या दरम्यान तीन महिने मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया जल वाहतूक होती बंद
तीन महिन्यांच्या कालावधीनंतर अखेर आजपासून जलवाहतूक सुरू होणार
समुद्रमार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह पर्यटकांमध्ये आनंदाच वातावरण
प्रतीवर्षी 15 लाखांहून अधिक प्रवाशी करतात या जलवाहतूकीचा वापर
पावसाळी समुद्र खवळलेला असतो या दरम्यान अपघाताची खबरदारी म्हणून जलवाहतूक होती 3 महिने बंद
प्रकृती खालावलेल्या दोन्ही महिलांना पाण्याबाहेर आणण्यात आले.
मात्र, मच्छीमारांचे जलसमाधी आंदोलन थांबवण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.
मागण्या पूर्ण होईपर्यंत पाण्याबाहेर येणार नाही ठाम .
शासनाने मागण्या मान्य करेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, अशी भूमिका मच्छीमारांनी घेतली आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणीपुरवठा योजनेत किमान ३०० कोटी रुपयांची अतिरिक्त कामे वाढणार असून, त्याचा आर्थिक भार महापालिकेलाच उचलावा लागणार असल्याची माहिती मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी दिली आहे. २७४० कोटी रुपयांच्या या योजनेत आतापर्यंत सुमारे २ हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. जॅकवेल, कॉफर डॅम, रस्ते दुरुस्ती, वाढीव जलवाहिन्या आणि अंदाजपत्रकापेक्षा ९ टक्के अधिक दराने निविदा मंजूर झाल्यामुळे अतिरिक्त खर्च वाढला आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणीपुरवठा योजनेत किमान ३०० कोटी रुपयांची अतिरिक्त कामे वाढणार असून, त्याचा आर्थिक भार महापालिकेलाच उचलावा लागणार असल्याची माहिती मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी दिली आहे.
२७४० कोटी रुपयांच्या या योजनेत आतापर्यंत सुमारे २ हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत.
- राहुल गांधी यांना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचे दिले जाणार निमंत्रण
- कुंभमेळा मंत्र्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलीय निमंत्रण देण्याची जबाबदारी
- पंतप्रधान, राष्ट्रपती, देश पातळीवरील मंत्री आणि नेत्यांना दिलं जाणार निमंत्रण
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील आठवडी बाजार परिसरातील एका दुकानाला मध्यरात्री रात्री अचानक आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, दुकानातील साहित्याचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून ताप, खोकला, अशक्तपणा आणि डिहायड्रेशनचा त्रास होत असल्याने राळेगणसिद्धी येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. किडनीच्या तपासणीसाठी सोमवारी त्यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, डॉ. गौतम भन्साळी यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
अंगावर साधी साडी....पायात स्लीपर....आणि मनात दोन मुलींच्या भविष्याची चिंता...
अशा परिस्थितीत एका ४७ वर्षीय आईने चक्क मॅरेथॉनमध्ये तरुणींनाही मागे टाकत अनवाणी धावत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
अंबाजोगाईच्या रमाबाई रणवीर यांच्या या जिद्दीची आणि संघर्षाची कहाणी सध्या सर्वांच्याच कौतुकाचा विषय ठरली आहे.
- सराईत घरफोडी करणाऱ्या टोळीचा नाशिक पोलिसांकडून पर्दाफाश
- शहर आणि परिसरात मागील वर्षभरात भरदिवसा तब्बल ३२ घरफोडीच्या घटना
- मौल्यवान ऐवज लुटून फरार होणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अंबड पोलिसांनी बेड्या ठोकल्या
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य प्रकरणी गुन्हा दाखल
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणारी चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणी डेक्कन पोलिसांकडून दोघां विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मुख्यमंत्री महोदयांनी पंढरपूर कॉरीडोर बाधित लोकांसाठी विशेष पुनर्वसन धोरण मंजूर केलं आहे
लोकांच्या मागणीच्या विचार करूनच पुढे जाण्याचा सूचना आम्हाला देण्यात आल्या आहेत
बऱ्याच घरं गमावणाऱ्या बाधित लोकांची मागणी होती की घराच्या ऐवजी घरं देण्यात यावे
मुख्यमंत्र्यानी ही मागणी मान्य केली आहे
आजपासून पुण्यात रिक्षा भाडेवाढ
आजपासून पुण्यात रिक्षा प्रवास महागला
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील रिक्षा प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज १ सप्टेंबरपासून रिक्षांच्या भाड्यात वाढ लागू झाली आहे.
जालना जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट....
रात्री उशिरा जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली...
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.