HSC Result 2026 : बारावीचा निकाल इतका का घसरला? बोर्डाने सांगितलं नेमकं कारण, वाचा

Maharashtra 12th Bord Result : महाराष्ट्र राज्य बारावी परीक्षेचा निकाल ८९.७९% लागला असून गेल्या वर्षाच्या तुलनेत घट झाली आहे. कॉपीमुक्त मोहिम, सीसीटीव्ही देखरेख आणि कडक कारवाईमुळे निकालावर परिणाम झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
MAHARASHTRA HSC RESULT 2026 DECLINES TO 89.79% AMID STRICT ANTI-CHEATING DRIVE
MAHARASHTRA HSC RESULT 2026 DECLINES TO 89.79% AMID STRICT ANTI-CHEATING DRIVESaam Tv
Published On
Summary
  • यंदाचा बारावी निकाल ८९.७९% लागला, गेल्या वर्षापेक्षा घट

  • कॉपीमुक्त मोहिमेमुळे निकालावर थेट परिणाम

  • मुलींनी पुन्हा एकदा मुलांपेक्षा सरशी केली

  • कोकण विभाग अव्वल, लातूर विभाग सर्वात मागे

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल यंदा ८९.७९ टक्के लागला असून गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे २.०९ टक्क्यांनी घट झाली आहे. मागील वर्षी हा निकाल ९१.८८ टक्के होता. यंदा परीक्षेत कॉपीमुक्त मोहिमेची काटेकोर अंमलबजावणी केल्यामुळे निकालात घट झाल्याचे स्पष्ट होत आहे.

राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. यावेळी सचिव डॉ. दीपक माळी, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, बालभारतीच्या संचालक अनुराधा ओक, योजना संचालक कृष्णकुमार पाटील, माध्यमिक सहसंचालक डॉ. श्रीराम पानझाडे आणि कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर उपस्थित होते.

MAHARASHTRA HSC RESULT 2026 DECLINES TO 89.79% AMID STRICT ANTI-CHEATING DRIVE
Mumbai : मुंबईत मोठा घोटाळा! SRA प्रकल्पात आर्थिक गैरव्यवहार; ED आणि SEBI कडे तक्रार दाखल

यंदाच्या परीक्षेदरम्यान कॉपी रोखण्यासाठी राज्यभर विशेष उपाययोजना करण्यात आल्या होत्या. परीक्षा समितीने कॉपी होऊ नये यासाठी प्रयत्न केले. परीक्षेदरम्यान १५ एफआयआर दाखल करण्यात आले, तर सुमारे १०० कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. राज्यभरात एकूण १,९८३ गैरप्रकार समोर आले, ज्यामध्ये २३७ कॉपी आणि १,४६९ सामुदायिक कॉपी प्रकरणांचा समावेश आहे.

MAHARASHTRA HSC RESULT 2026 DECLINES TO 89.79% AMID STRICT ANTI-CHEATING DRIVE
Shocking : “तू मला खूश कर, मी तुला जास्त दिवस सुट्टी देईन,” नामांकित कंपनीच्या बॉसची महिला कर्मचाऱ्याकडे अश्लील मागणी

परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते, ज्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. केंद्रांवरील व्यवस्थाही अधिक सक्षम करण्यात आल्याने पारदर्शकता वाढली. मंडळाकडून प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी सुमारे २ हजार टन कागदाचा वापर करण्यात आला होता.

MAHARASHTRA HSC RESULT 2026 DECLINES TO 89.79% AMID STRICT ANTI-CHEATING DRIVE
Shocking : वहिनीसोबतचं अफेअर पत्नीला समजलं; पतीने प्रेयसीच्या मदतीने केली पत्नीची हत्या, थरारक घटनेने सर्वजण सुन्न

निकालाच्या दृष्टीने कोकण विभागाने यंदाही आघाडी घेतली असून ९४.१४ टक्के निकालासह तो राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. तर लातूर विभागाचा निकाल सर्वांत कमी ८४.१४ टक्के लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली आहे. मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ९३.२५ असून मुलांचा ८६.८० टक्के आहे. म्हणजेच मुलींचा निकाल मुलांच्या तुलनेत ६.३५ टक्क्यांनी जास्त आहे. एकूण १५४ विषयांपैकी २६ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. कॉपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी आणि कडक शिस्तीमुळे यंदाचा निकाल थोडा घसरला असला तरी शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि गुणवत्ता वाढीसाठी हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com