12th Result Announcement Date : मोठी बातमी! बारावीचा निकाल शनिवारी जाहीर होणार, कुठे आणि कसा पाहता येणार?

HSC Result: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. बारावीचा निकाल शनिवारी म्हणजे २ मे रोजी जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजता निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे.
बारावीचा निकाल शनिवारी
12 th board.jpg12 th board Result
Published On

Summary:

  • बारावीचा निकाल २ मे रोजी जाहीर होणार

  • सकाळी ११ वाजता बोर्डाची पत्रकार परिषद

  • दुपारी १ वाजता ऑनलाइन पाहता येणार निकाल

बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. निकालाची सर्व विद्यार्थी आणि पालक वाट पाहत होते. त्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. बारावीचा निकाल शनिवारी म्हणजे येत्या २ मे रोजी जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. यंदा राज्यातील सुमारे १५ लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल २ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्या दिवशी सकाळी ११ वाजता राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत विभागनिहाय निकाल जाहीर करण्यात येणार आहे. यानंतर दुपारी १ वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाइन पाहता येणार आहे. mahahsscboard.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल.

बारावीचा निकाल शनिवारी
SSC- HSC Result: दहावी- बारावीचा निकाल कुठे अन् कसा पाहावा? अधिकृत वेबसाइटची यादी वाचा

यावर्षी पुणे, मुंबई, नागपूर यासह एकूण ९ विभागीय मंडळांमार्फत बारावीची परीक्षा पार पडली होती. या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या १५,३२,४८७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामध्ये ८,२०,२२९ मुलं आणि ७,१२,२४० मुलींचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे यावर्षी १८ तृतीयपंथी विद्यार्थ्यांनीही परीक्षा दिली होती.

बारावीचा निकाल शनिवारी
Maharashtra HSC Result: १२ वीचा निकाल 'Coming Soon'; रिझल्टबाबत नवी अपडेट आली समोर

दरम्यान, मागच्या वर्षी बारावीचा निकाल चांगला लागला होता. विज्ञान शाखेचा निकाल ९७.३५ टक्के तर कला आणि वाणिज्य शाखांचा निकाल ९२.६८ टक्के लागला होता. यंदाही विज्ञान, कला, वाणिज्य आणि व्यावसायिक शाखांचा निकाल एकाच वेळी जाहीर केला जाणार आहे.

निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे -

- https://results.digilocker.gov.in

- https://mahahsscboard.in

- https://hscresult.mkcl.org

बारावीचा निकाल शनिवारी
SSC HSC Result 2026: दहावी-बारावीचा निकाल लांबणीवर जाण्याची शक्यता; महत्त्वाची अपडेट आली समोर

कसा पाहाल निकाल?

- सर्वात आधी hscresult.mkcl.org, mahahsscboard.in किंवा mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

- होम पेजवर असलेल्या ‘HSC Examination Result 2026’ यावर क्लिक करा.

- त्यानंतर तुमचा सीट नंबर आणि आईचे नाव टाका.

- ‘View Result’ बटणावर क्लिक करा. स्क्रिनवर तुमचा निकाल दिसेल.

- गुणपत्रिका डाऊनलोड करून त्याची प्रिंट आऊट काढून घ्या.

बारावीचा निकाल शनिवारी
HSC SSC Result 2026: महाराष्ट्र बोर्डाचे महत्त्वाचे पाऊल! दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदाच घेतला 'हा' निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com