Maharashtra HSC Result: १२ वीचा निकाल 'Coming Soon'; रिझल्टबाबत नवी अपडेट आली समोर

Maharashtra HSC Board Result: डिजी लॉकरवर ‘HSC Result Coming Soon अशी सूचना दिसत असल्याने, महाराष्ट्र एचएससी निकाल २०२६ लवकरच अपेक्षित आहे. आपला निकाल कसा तपासायचा हे जाणून घ्या.
Maharashtra HSC Board Result:
Students eagerly await Maharashtra HSC Result 2026 as DigiLocker displays ‘Coming Soon’ notification.Saam tv
Published On
Summary
  • बारावीचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता

  • डिजीलॉकरवर ‘Coming Soon’ नोटिफिकेशन

  • १४ लाखांहून अधिक विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत

बारावीच्या परीक्षेला बसलेल्या १४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. बारावीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात असताना रिझल्टबाबत एक नवी अपडेट समोर आली आहे. राज्यातील सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता होती.

Maharashtra HSC Board Result:
विद्यार्थ्यांना दरमहा 2500 रुपये मिळणार? विद्यार्थ्यांसाठी सरकारची नवी योजना?

त्याचदरम्यान बारावीचा निकाल कधी लागणार याची तारीख लवकरच जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. त्याच कारण म्हणजे डिजीलॉकवर बारावीचा निकाल Coming Soon असा नोटीफिकेशन येत आहे.

निकालाची संभाव्य तारीख आणि वेळ

हाती आलेल्या माहितीनुसार निकाल मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. काही रिपोर्ट्सनुसार १३ मे ते २५ मे दरम्यान निकाल लागू शकतो. बोर्डाचा निकाल साधारणपणे दुपारी १:०० वाजता ऑनलाईन उपलब्ध होणार आहे.

Maharashtra HSC Board Result:
SSC आणि HSC विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! मार्कशीट आणि सर्टिफिकेटबाबत बोर्डाने घेतला मोठा निर्णय

निकाल ऑनलाइन कसा तपासायचा?

निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थी खालील अधिकृत संकेतस्थळांवर त्यांचे गुण पाहू शकतात.

१. mahresult.nic.in

२. hscresult.mkcl.org

३. results.digilocker.gov.in

४. mahahsscboard.in

निकाल पाहण्यासाठी काय आवश्यक आहे?

विद्यार्थ्यांनी आपला निकाल पाहण्यासाठी खालील दोन गोष्टी तयार ठेवाव्यात. हॉल तिकीटवर असलेला आपला बैठक क्रमांक, अर्जावर नोंदवलेले आईचे नाव. दरम्यान महाराष्ट्र बोर्ड एकाच वेळी विज्ञान, कला, वाणिज्य आणि व्यावसायिक शाखांचे निकाल जाहीर करणार आहे. मागील वर्षी विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९७.३५% लागला होता. यावर्षीही निकालाचा टक्का वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बोर्डाच्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे परीक्षांचे निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. शिक्षण मंडळाची बढती आणि बदली दोन वर्षांवरुन चार ते सहा वर्षांवर नेल्याने कर्मचारी संतप्त झालेत. त्यामुळे २८ एप्रिलपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाच्या कर्मचाऱ्यांचा कामबंद आंदोलनाचा इशारा दिलाय.

राज्य शिक्षण कर्मचारी संघटनेला विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेतल्याने विरोध दर्शवण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांकडून राज्यातील नऊ विभागात लाक्षणिक कामबंद आंदोलन सुरू आहे. त्यामुळेच याचा फटका थेट दहावी-बारावीच्या निकालावर होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com