मालेगावच्या 40.6 अंश सेल्सिअस तापमानामुळे महाराष्ट्रात उष्णतेची लाट वाढली आहे. तापमानामध्ये वाढ झाल्यामुळे पुणेकरांचे मोठे हाल होत आहेत. वायव्येकडील वारे आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या आर्द्रतेमुळे तापमानात (Maharashtra Heat Wave) आणखी वाढ होण्याचा इशारा भारतीय हवामाने दिला आहे. (Latest Weather Update)
राज्य सध्या तीव्र उष्णतेच्या सावटाखाली आहे. अनेक शहरांमध्ये शनिवारी कमाल तापमान 39 ते 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. आयएमडीच्या आकडेवारीनुसार राज्यातील तीन ठिकाणी तापमान 40°C हून अधिक (Heat Wave Update) आहे. मालेगावमध्ये राज्यातील सर्वात जास्त उष्णतेची नोंद झाली आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
तापमानात प्रचंड वाढ
आयएमडी पुणे येथील हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यम उच्च आर्द्रता असल्यामुळे वास्तविक तापमानामध्ये आणखी वाढ होत ( Maharashtra Temprature) आहे.
28 मार्च रोजी तापमानात काही अंशी घसरण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उष्णता आणि आर्द्रतेमुळे तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. हवामान तज्ञांनी अंदाज वर्तविला आहे की, कोरेगाव पार्क येथील तापमान 26 मार्च रोजी 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते.कश्यपी म्हणाले की, उदासीन परिस्थिती कायम राहू ( Maharashtra Temprature Hike) शकते.
पुढील दोन आठवड्यांत तापमान वाढणार
पुढील दोन आठवड्यांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दिवसाचे तापमान 1 ते 2 अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील आर्द्रतेमुळे दक्षिण महाराष्ट्रातील तापमान वाढ होण्याची शक्यता आहे. वायव्येकडे वाऱ्याची दिशा बदलत असल्यामुळे तापमानात वाढ होत आहे, असं हवामान तज्ज्ञ अभिजित मोडक यांनी सांगितलं (Maharashtra Weather) आहे.
दिल्लीत शनिवारी किमान तापमान 16.2 अंश सेल्सिअस होते. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण 77 टक्के होते. कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. IMD शास्त्रज्ञ सुनील कांबळे यांनी म्हैसमाळ येथे महाराष्ट्राच्या नवीन डॉपलर वेदर रडारची घोषणा केली होती. भारतीय हवामान खात्याने हवामान परिस्थितीचा अंदाज वर्तवला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.