Maharashtra Weather Forecast: राज्यात अवकाळीचं सावट, नागपूरसह 'या' जिल्ह्याला पुढील काही दिवस ऑरेंज अलर्ट

Weather Update Today: 16 ते 19 मार्च या काळात विदर्भात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. याशिवाय विदर्भाच्या काही भागांमध्ये पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Maharashtra Forecast
Maharashtra ForecastYandex
Published On

Maharashtra Forecast News

राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. आता बहुतेक जिल्ह्यांमधून थंडी गायब झाली आहे. दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढत आहे. किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली (Maharashtra Forecast) आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता उकाडा जाणवत आहे. राज्यातील सर्वच प्रमुख शहरांमधील तापमानाचा पारा 35 ते 37 अंशादरम्यान आहे. हवामान विभागाने विदर्भातील काही भागात अवकाळी पाऊस तसंच गारपिटीची (Raifall) शक्यता वर्तवली आहे. (Latest Weather Update)

नागपूर सह भंडारा-गोंदिया जिल्ह्याला हवामान विभागाकडून आज (17 मार्च) ऑरेंज अलर्ट (Weather Update Today) देण्यात आला आहे. नागपुरमध्ये 17 मार्च आणि 19 मार्चला हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. दिवसेंदिवस तापमानाचा पारा वर चढत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ऑरेंज अलर्ट जारी

16 मार्च रोजी पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळलेल्या आहेत. दुपारी अचानक वातावरणात बदल होत नागपूरात वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटसह जोरदार पाऊस (Summer Season) झाला. राज्यात अवकाळीचं सावट कायम आहे. शेतकऱ्यांच्या अगदी तोंडचं पाणी पळालं आहे. आता नागपूर सह भंडारा-गोंदिया जिल्ह्याला पुढील काही दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Maharashtra Forecast
Weather Forecast: देशातील ७ राज्यांना बसणार अवकाळी पाऊस अन् गारपिटीचा तडाखा; महाराष्ट्रात कसं असेल हवामान?

पाऊस पडण्याचा अंदाज

पुढील चार दिवसांत केरळ, माहे, रायलसीमा, तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलमध्ये उष्ण आणि दमट हवामान असण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मध्य भारतातील अनेक भागात वादळ, विजांचा कडकडाट आणि गडगडाटासह पाऊस पडण्याचा (Weather Update) अंदाज आहे.

उत्तर कर्नाटकातील विविध भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 20 मार्चपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला (Maharashtra Weather) आहे. 22 ते 24 मार्च दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी पाऊस, बर्फवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली आहे.

Maharashtra Forecast
Weather Update Maharashtra: राज्यात ऊन-पावसाचा खेळ; एकीकडे उकाडा, तर दुसरीकडे अवकाळाची शक्यता कायम

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com