Weather Update Maharashtra: राज्यात ऊन-पावसाचा खेळ; एकीकडे उकाडा, तर दुसरीकडे अवकाळाची शक्यता कायम

IMD Weather Update Today (7 March 2023): राज्यात तापमानात वाढ होत आहे. त्यामुळं उकाडा कायम असल्याचं चित्र आहे.
Weather Update Today: Beed, Hingoli, Parabhani, Ladakh, Jammu and Kashmir
Weather Update Today: Beed, Hingoli, Parabhani, Ladakh, Jammu and KashmirYandex
Published On

Latest Weather Forecast News

राज्यात वातावरणात बदल होतोय. मागील महिन्या अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) आणि काहीसं थंड वातावरण होतं. आता मात्र कमाल तापमानात पुन्हा वाढ होत आहे. त्यामुळं राज्यात उन्हाच्या झळा वाढू लागल्या (Summer) आहे. किमान तापमानाचा पारा वाढत आहे. त्यामुळं थंडी कमी झाली आहे. आज हवामान विभागाने राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे. (Latest Weather Update)

देशासह महाराष्ट्रातही आज पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 24 तासात हिंगोली, बीड, परभणी, अमरावती या भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता (Weather Update) आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तीव्र ऊन आणि उकाडा कायम

राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यानंतर किमान तापमानात अचानक घट झाली आहे. निफाड येथे तापमानाचा पारा ७ अंशांच्या खाली घसरला होता. दुपारच्या वेळी तीव्र ऊन आणि उकाडा कायम असल्याचं चित्र (Latest Weather Forecast) आहे.

बुधवारी किमान तापमानात वाढ झाली होती. पारा पुन्हा वर सरकला होता. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ९.८ अंश तापमान नोंदवलं गेलं होतं. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद (Maharashtra Weather) झाली. सोलापूरमध्ये ३८.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

Weather Update Today: Beed, Hingoli, Parabhani, Ladakh, Jammu and Kashmir
Weather Pattern: पुढील ३ महिन्यात कसं असेल हवामान; कोणत्या राज्यात आहे कमी पाऊस होण्याची शक्यता

मुसळधार पाऊस आणि जोरदार हिमवृष्टी

अनेक ठिकाणी कमाल तापमान ३५ अंशांपेक्षा जास्त (Weather Update) आहे. पूर्व विदर्भापासून कर्नाटक ते दक्षिण तमिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. विदर्भ, मराठवाड्यात हवामान अंशतः ढगाळ आहे. हवामान विभागाने आज तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता वर्तविली आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळं तापमानात घट झाली आहे. दिल्ली, उत्तर प्रदेशामध्ये पावसाची शक्यता नाही. मात्र वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम हिमालयीन प्रदेशावर होणार आहे. त्यामुळं आज लडाख, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार हिमवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली गेली (Weather Update Today) आहे.

Weather Update Today: Beed, Hingoli, Parabhani, Ladakh, Jammu and Kashmir
Weather Forecast: वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे 'या' भागात मुसळधार पावसासह गारपीटीची शक्यता; वाचा वेदर रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com