अल निनो कमकवूत झाल्यामुळे त्याचा हवामानात प्रभाव पडणार आहे. या प्रभावामुळे अनेक देशातील तापमानाचा पारा वाढणार आहे. भारतातील हवामानही बदलणार आहे. या बदलाचा हवामानाचा पर्जन्यमानावर देखील परिणाम होणार आहे. यावर्षी मार्च ते मे दरम्यान अल निनोचा परिणाम ६० टक्के जावणार असून एप्रिल ते जून दरम्यान हे सामान्य असेल.(Latest News)
एप्रिल ते जूनच्या दरम्यान अल निनो राहणार असल्याची माहिती जागतिक हवामान संघटनेने दिलीय. मागील वर्षी आलेल्या अल निनोचा प्रभाव आतापर्यंत जाणवत आहे. सर्वात जास्त शक्तीशाली पाच अल निनोपैकी एक होता. जागतिक हवामान संघटनेने सांगितले की, या वर्षाच्या शेवटीपर्यंत ला नीला बनू शकतो, परंतु अद्याप याबाबत कोणतीच अपडेट नाहीये.
(साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दरम्यान अल निनो सरासरी दर दोन ते सात वर्षाच्या दरम्यान येत असतं. याचा परिणाम ९ ते १२ महिन्यात राहत असतो. तर अल निनो वातावरणाचा असा एक पॅटर्न आहे जो मध्य आणि पूर्वी प्रशांत महासागरात होत असतो. यात समुद्राचे तापमान सामान्य होत असतो. शास्त्रज्ञांच्या मते, विषुववृत्त रेषेभोवती प्रशांत महासागरातील सध्याचा अल निनो एप्रिल २०२४ पर्यंत नाहीसा होऊ शकतो.
तर जुलैमध्ये ला निना येऊ शकते. कमी वेळेत सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२४ च्या दरम्यान ला निना येण्याची ७० टक्के शक्यता. दरम्यान भारतातील सरासरी पर्जन्यमानावर सकारात्मक परिणाम होईल. उत्तर प्रदेश, झारखंड आणि बिहार यांसारख्या राज्यांमध्ये पुन्हा पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. मागील ला निना ३ वर्षे टिकल्यानंतर मार्च २०२३ मध्ये संपल होता. त्यामुळे त्यावर्षी चांगला पाऊस झाला.
मागील वर्ष तापामान वाढलं
भारतातील हवामान आणि वादळाचा पॅटर्न बदलू शकतो. यामुळे वातावरणात बदल होऊ शकतो. त्याचा परिणाम अल निनो पडत आहे. वाढत्या तापमानामुळे मागील वर्षातील प्रत्येक महिन्यातील तापमान वाढ झाली दिसली. यामुळे मागील वर्ष आतापर्यंत सर्वात उष्ण वर्ष ठरलं. अल निनोने वाढत्या तापमानाला अधिक वाढवलंय. यात ग्रीन हाऊस वायूचे उत्सर्जन वाढू लागल्याने उष्णता वाढू लागलीय.
इक्केटर लाइनच्या जवळपास प्रशांत महासागरच्या परिसरात याचा परिणाम दिसत असल्याची माहिती जागतिक हवामान संघटनेनेचे सरचिटणीस सेलेस्टे साउलो यांनी दिली. समुद्र पृष्ठभागाचे तापमान १० महिन्यांपासून सतत वाढत आहे. यात मागील वर्षी जानेवारीमध्ये समुद्री तापळीवरील तापमानाने रिकॉर्ड तोडलाय. ही चिंतादायक बाब असून मात्र याला अल निनो जबाबदार नाहीये.
अल निनो देखील चालू राहू शकतो यामुळे जगभरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढू शकते. ते कमकुवत झाले तरीही ते उबदार असतील. गेल्या वर्षी नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत ते कमालीच्या पातळीवर होते. त्यामुळे विषुववृत्त रेषेच्या आसपासच्या भागात समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यपेक्षा २ अंश सेल्सिअस जास्त होते, असं सेलेस्टे साउलो म्हणाले.
दरम्यान हवामान बदलामुळे नैसर्गिक आपत्तींमध्ये वाढ होऊ शकते. पुढील तीन महिन्याचे कमाल तापमान सामान्यपेक्षा अधिक असेल. यावर्षी हवामानाच्या या बदलेल्या पॅटर्नमुळे नैसर्गिक आपत्ती वाढू शकते. अल निनोमुळे हॉर्न ऑफ आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेत पाऊस आणि पूर येतो. तर दक्षिण पूर्व आशिया,ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत उष्ण हवामान आढळते. दुष्काळ पडण्याची शक्यता वाढते. हवामान आणि अल निनोशी संबंधित अत्यंत हवामानाच्या घटनांबद्दलच्या पूर्व चेतावणीमुळे असंख्य जीव वाचले आहेत. यामुळे WMO हे काम भविष्यातही सुरू ठेवेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.