Weather Forecast: देशातील ७ राज्यांना बसणार अवकाळी पाऊस अन् गारपिटीचा तडाखा; महाराष्ट्रात कसं असेल हवामान?

Weather Update Today: सोमवारपासून (११ मार्च) पुढील तीन ते चार दिवस उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.
Weather Forecast 29 February 2024
Weather Forecast 29 February 2024Saam TV
Published On

Weather Forecast 11 March 2024

देशासह अनेक राज्यांवर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट निर्माण झालं आहे. सोमवारपासून (११ मार्च) पुढील तीन ते चार दिवस उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. काही भागात गारपिटीचा इशारा देखील देण्यात आला आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Weather Forecast 29 February 2024
Breaking News: PM मोदींच्या हस्तक्षेपामुळे रशिया-युक्रेनमधील अणुयुद्ध टळलं; अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दावा

वेटर्न डिस्टबर्न्सच्या प्रभावामुळे देशातील हवामानाचे चक्र बदलले असून एकाच वेळी ऊन, पाऊस आणि थंडी पाहायला मिळत आहे. ऐन हिवाळ्यात अनेक राज्यांत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या होत्या. त्यानंतर फेब्रुवारीच्या अखेरीस आणि मार्च महिन्याच्या सुरुवातीलाही अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी (Rain Update) लावली.

महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ या दोन भागांना अवकाळी पावसासह गारपिटीने चांगलंच झोडपून काढलं होतं. या पावसामुळे फळबागांसह रब्बी हंगामातील पिकांचं मोठं नुकसान झालं. गेल्या आठवड्याभरापासून राज्यातून अवकाळी माघार घेतली होती. त्यामुळे तापमानातही वाढ झाली. (Latest Marathi News)

अशातच भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. वायव्य सीमेवरून प्रवेश करणारे पश्चिमी वाऱ्यांचे झोत प्रामुख्याने उत्तर अरबी समुद्रावरुन येत आहेत. यामुळे पुढील चार दिवस उत्तरेकडील राज्यांमध्ये अवकाळी पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यामध्ये ११ ते १३ मार्च या कालावधीत उत्तराखंड या राज्यात हलक्या पावसासह बर्फवृष्टीची शक्यता आहे. तर १२ आणि १३ मार्चला पंजाबमध्ये तर १३ मार्चला हरियाणा, राजधानी दिल्लीसह पश्चिमी उत्तर प्रदेशात अवकाळी पावसाची शक्यता (Rain Alert) वर्तवण्यात आली आहे.

याशिवाय या पुढील ४ दिवसांच्या कालावधीत जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बलुचिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश या राज्यांत देखील पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात मात्र पश्चिमी वाऱ्याचा कोणताही परिणाम होणार नसून पाऊस आणि गारपिटीची शक्यता नाही, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

Weather Forecast 29 February 2024
Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, ११ मार्च २०२४ सोमवार तुमच्यासाठी काय घेऊन आलाय?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com