Weather Forecast: दिवसा उन्हाचा कडाका अन् रात्री अवकाळीचा तडाखा; पुढील ४८ तासांत 'या' भागात कोसळणार पाऊस

Weather Update Today: भारतीय हवामान खात्याने पुढील ४८ तासांत देशातील अनेक राज्यांना अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.
Maharashtra Weather Update
Maharashtra Weather UpdateSaam TV

Weather Update 22 March 2024

मार्च महिना संपत आला तरी देखील अवकाळी पावसाचं संकट काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. देशातील अनेक राज्यांना दिवसा उन्हाचा कडाका अन् रात्री अवकाळी पावसाचा तडाखा बसत आहे. या पावसामुळे फळबागा तसेच शेतीपिकाचं मोठं नुकसान झालं आहे. अवकाळीचं संकट कधी दूर होईल, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. अशातच हवामान खात्याने पुढील ४८ तासांत देशातील अनेक राज्यांना अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra Weather Update
Politics News: अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर विरोधक एकवटले; दिग्गजांकडून भाजपवर टीकेचा भडीमार

अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या पूर्वोत्तर आणि पूर्व भारतीय राज्यांमध्ये आज शुक्रवारी वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. (Breaking Marathi News)

आजपासून २२ मार्च ते २४ मार्चपर्यंत जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हलका पाऊस किंवा बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय २३ मार्च दरम्यान अरुणाचल प्रदेशात मुसळधार पाऊस (Heavy Rain) आणि हिमवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पंजाबमध्ये, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात काही भागात ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. त्याचबरोबर गंगेच्या पश्चिम बंगालमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळमध्ये देखील हलक्या पावसाची शक्यता आहे. स्कायमेट हवामानानुसार, ईशान्य भारतात काही मुसळधार पावसासह विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि गारपीट होऊ शकते. पश्चिम हिमालयाच्या वरच्या भागात हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास मराठवाडा आणि विदर्भात शुक्रवार आणि शनिवारी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, चंद्रपूर गोंदिया आणि वाशिममध्ये पुढील दोन ते तीन दिवसांत हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

Maharashtra Weather Update
HIV विरोधात तज्ज्ञांना मोठं यश; मुळापासून आजारावर मात करता येणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com