Arvind Kejriwal Latest News
Arvind Kejriwal Latest NewsSaam TV

Politics News: अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर विरोधक एकवटले; दिग्गजांकडून भाजपवर टीकेचा भडीमार

Arvind Kejriwal News: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अटकेनंतर देशातील राजकीय वातावरण तापलं असून दिग्गजांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

Arvind Kejriwal Latest News

कथित मद्य घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी (ता. २१) ईडीने अटक केली. दिल्ली उच्च न्यायालायने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर ईडीने तात्काळ त्यांच्यावर कारवाई केली. त्यांच्या अटकेनंतर देशातील राजकीय वातावरण तापलं असून दिग्गजांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ट्विट करत भाजपवर टीकेचा भडीमार केलाय.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

"घाबरलेल्या हुकूमशहाला मृत लोकशाही निर्माण करायची आहे. सर्व संस्था काबीज करणे, पक्ष फोडणे, कंपन्यांकडून पैसे उकळणे, प्रमुख विरोधी पक्षाचे खाते गोठवणे एवढे 'राक्षसी शक्ती'साठी पुरेसे नव्हते, तर आता निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करणे ही सामान्य गोष्ट झाली आहे. 'इंडिया' याला चोख प्रत्युत्तर देईल", अशी खोचक टीका काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केली आहे.

केजरीवाल यांच्या अटकेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. "सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्या असताना विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी केंद्रीय एजन्सीच्या गैरवापर करणे चुकीचे असून मी या घटनेचा तीव्र निषेध करतो", अशी पोस्ट शरद पवार यांनी X अकाउंटवरून केली आहे.

"अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरून भाजपा सत्तेसाठी किती खोलवर झुकणार हे या अटकेवरून दिसून येते. अरविंद केजरीवाल यांच्यावरील या असंवैधानिक कारवाईविरोधात ‘इंडिया आघाडी’ एकजुटीने उभा आहे", असंही शरद पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही केजरीवाल यांच्या अटकेनंतर भाजपवर निशाणा साधला आहे. 'रोज विजयाची बढाई मारणारा अहंकारी भाजप निवडणुकीपूर्वी अवैध मार्गाने विरोधकांना कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपला जर निवडणुकीत विजयाची खात्री असती, तर त्यांनी तपास यंत्रणांचा दुरुपयोग करून काँग्रेसच पक्षाचे खाते गोठवले नसते, असा घणाघात मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे.

दुसरीकडे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी देखील अरविंद केजरीवाल यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपवर टीकेचा भडीमार केला आहे. आपण पुन्हा सत्तेत येणार नाही या भीतीपोटी भाजप विरोधी पक्षांच्या कोणत्याही नेत्यांना जनतेपासून दूर करण्याचा प्रयत्न करतंय. ही अटक एका नव्या जनक्रांतीला जन्म देईल, असं अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे.

Arvind Kejriwal Latest News
Maharashtra Loksabha Explainer: भाजपसाठी विदर्भाचा 'गड'करी 'वणव्या'मध्ये गारव्यासारखा; काँग्रेससाठी 'मित्र' मनासारखा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com