Maharashtra Loksabha Explainer: भाजपसाठी विदर्भाचा 'गड'करी 'वणव्या'मध्ये गारव्यासारखा; काँग्रेससाठी 'मित्र' मनासारखा

BJP vs Congress Fight: यंदाच्या निवडणुकीत विदर्भात भाजपला टक्कर देऊन आपला बालेकिल्ला परत मिळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असेल. यासाठी त्यांना शिवसेना उद्धव ठाकरे गटाची साथ मिळणार आहे.
Maharashtra Lok Sabha Election 2024
Maharashtra Lok Sabha Election 2024 Saam TV
Published On

Maharashtra Lok Sabha Election 2024

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना रंगणार आहे. भाजपने महाराष्ट्रात ४५ हून अधिक जागा जिंकण्याचं ध्येय ठेवलं आहे. यासाठी त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटासोबत महायुती केली आहे.

सध्या जागावाटपावरून तिन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू असली तरी, भाजपने महाराष्ट्रातील आपल्या पहिल्या २० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये विदर्भातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपसाठी विदर्भातील लोकसभा निवडणूक ‘करो किंवा मरो’ची असणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra Lok Sabha Election 2024
Shirur Lok Sabha: शिरुर लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार ठरला; अमोल कोल्हेंविरोधात कुणाला मिळणार उमेदवारी?

विदर्भात लोकसभेच्या एकूण १० जागा

कारण, विदर्भात लोकसभेच्या एकूण १० जागा आहेत. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने तब्बल ८ जागा जिंकल्या होत्या. यामध्ये नागपूर, गडचिरोली-चिमूर, भंडारा-गोंदिया, अकोला या ५ जागांवर भाजपचे खासदार निवडून आले होते. तर शिवसेनेला बुलढाणा, रामटेक, यवतमाळ या तीन जागांवर विजय मिळवता आला होता. (Breaking Marathi News)

काँग्रेसला मात्र, फक्त चंद्रपूर येथील एकाच जागेवर विजय मिळवता आला. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिलेल्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी अमरावती लोकसभेची निवडणूक जिंकली होती. एकेकाळी विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. २००९ साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ५ जागांवर विजय मिळवला होता.

२०१४ साली विदर्भात काँग्रेसचा दारूण पराभव

मात्र, २०१४ साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या याच बालेकिल्ल्याला भाजप-शिवसेना युतीने सुरुंग लावला. लोकसभेच्या १० पैकी १० जागा जिंकत युतीने विदर्भातून काँग्रेसचा सुपडासाफ केला. त्यावेळी भाजपला ६ तर शिवसेनेला ४ जागांवर विजय मिळवता आला होता. पुढे २०१९ साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने लोकसभेची १ जागा मिळवून काहीसा कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. (Lok Sabha Election 2024)

पण, तरी देखील भाजप-सेना युतीला पराभूत करणं काँग्रेसला शक्य झालं नाही. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत विदर्भात भाजपला टक्कर देऊन आपला बालेकिल्ला परत मिळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असेल. यासाठी त्यांना शिवसेना उद्धव ठाकरे गटाची साथ मिळणार आहे. त्यामुळे यंदा विदर्भात सहजासहजी विजय मिळवणं भाजपसाठी सोपं नसेल.

नितीन गडकरी भाजपचे ट्रंप कार्ड

या गोष्टीची आधीच जाणीव असलेल्या भाजपने यंदाच्या निवडणुकीत नितीन गडकरी यांच्या नावाचे ट्रंप कार्ड खेळले. “हायवे मॅन” म्हणून ओळख असलेल्या गडकरींना महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांच्या पहिल्या यादीत उमेदवारी दिली आहे.

राजकीयदृष्ट्या हा प्रदेश पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात विभागलेला आहे. पूर्व विदर्भात नागपूर, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, वर्धा, रामटेक, गडचिरोली-चिमूर यांचा समावेश होतो. तर पश्चिम विदर्भात बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ-वाशीम जिल्ह्यांचा समावेश आहे. सध्या भाजपने विदर्भातील ४ जागांवरील उमेदवार निश्चित केले आहेत.

विदर्भातील जागावाटपावरून भाजप मित्रपक्षात संघर्ष?

यामध्ये नागपूर – नितीन गडकरी, वर्धा – रामदास तडस, अकोला – अनुप धोत्रे आणि चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार यांच्या नावांचा समावेश आहे. पण सध्या त्यांचे विद्यमान खासदार असलेले गडचिरोली व भंडारा – गोंदिया मतदारसंघातील उमेदवार भाजपने जाहीर केले नाही. महायुतीत मोठ्या भावाची भूमिका बजावणारा भाजप जागावाटपावरून वाद असूनही मित्रपक्षांना अधिकच्या जागा देऊन त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न करीत आहे.

विदर्भ हा आमचा सर्वोत्तम डाव असून केंद्र आणि राज्यातील सत्तापरिवर्तनात विदर्भाचा मोठा हातभार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे काँग्रेसने सुद्धा महाराष्ट्र लोकसभेसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. सध्या त्यांची शिवसेना ठाकरे गटासोबत जागावाटपावरून चर्चा सुरू आहे.

विदर्भ जिंकण्यासाठी महाविकास आघाडीची रणनिती

काँग्रेस विदर्भातील ६ जागा लढवण्यास इच्छुक असून त्यांनी उद्धव ठाकरे गटाला ४ सोडण्याची तयारी दर्शवली आहे. भाजपकडे गेलेला बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी सध्या काँग्रेसकडून रणनिती आखली जात आहे. यासाठी त्यांना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची चांगलीच साथ लाभत आहे. त्यामुळे काँग्रेसची ही रणनिती किती यशस्वी ठरणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

दुसरीकडे राष्ट्रवादीत फूट पडली असली, तरी भंडारा-गोंदिया, बुलढाणा आणि अमरावती आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये शरद पवार यांची चांगली ताकद आहे. त्यामुळे विदर्भात किमान आपल्याला लोकसभेच्या ३ जागा मिळाव्यात अशी पवारांची इच्छा आहे.

मात्र, प्रफुल्ल पटेल आणि मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी अजित पवारांसोबत जाणे पसंत केल्याने शरद पवार यांना या जागांवर विजय मिळवणे सोपे नसेल. जर विदर्भात महाविकास आघाडीने ५ किंवा त्याहून अधिक जागांवर विजय मिळवला. तर महाराष्ट्रात ४५ हून अधिक जागा जिंकण्याचं भाजपचं स्वप्न धुळीस मिळू शकतं.

Maharashtra Lok Sabha Election 2024
Madha Lok Sabha: माढा लोकसभेचा तिढा कायम, अफवांवर विश्वास ठेवू नका; रामराजेंचा Whatsapp स्टेटसवरून खुलासा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com