Maharashtra Police Department: राज्यातील अप्पर पोलीस महासंचालक दर्जांच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे झाली बदली?

Maharashtra Police Department Transfers: महाराष्ट्र सरकारने अप्पर पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या आहेत. नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंघल यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी विश्वास नांगरे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Maharashtra Police Department Transfers
MAJOR MAHARASHTRA POLICE RESHUFFLE: VISHWAS NANGARE PATIL APPOINTED AS NAGPUR POLICE COMMISSIONERsaam tv
Published On
Summary
  • राज्य सरकारने अप्पर पोलीस महासंचालक (ADG) दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या

  • नागपूरचे विद्यमान पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंघल यांची बदली करण्यात आली आहे.

  • सोमवारी राज्य सरकारने चार वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले होते.

राज्यातील IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरू असतानाच आता राज्यातील अप्पर पोलीस महासंचालक दर्जांच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारनं प्रशासनात मोठे फेरबदल करत सोमवारी ४ वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले होते. आज मंगळवारी अप्पर पोलीस महासंचालक दर्जांच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.यात नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ.रविंद्र सिंघल यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी विश्वास नागरे पाटील हे नागपूरचे नवे पोलीस आयुक्त असतील.

Attachment
PDF
202606231701304029
Preview
Maharashtra Police Department Transfers
IAS Transferred: राज्यातील १२ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या,कोणाची कुठे झाली बदली?

तर रवींद्र सिंघल यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अपर पोलीस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अपर पोलीस महासंचालक” श्रेणीतील पदावर बदलीने पदस्थापना देण्यात आली आहे.

त्यानुसार पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांनी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण/ न्यायालय यांचे आदेश, निवडणुकीची आदर्श आचार संहिता, कायदा सुव्यवस्था , इत्यादी लक्षात घेऊन पुढील उचित कार्यवाही करण्यात यावी असे आदेश देण्यात आलेत. हा शासन आदेश, महाराष्ट्र पोलीस अवधवनयम याच्या कलम २२न्वे मध्ये निर्दिष्ट सक्षम प्राधिकारी यांच्या मान्यतेने देण्यात आलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com