

राज्यातील सहा बड्या अधिकाऱ्यांचा बदल्या
प्रशासनातील ६ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
बदल्यांमध्ये IAS तुकाराम मुंढे यांच्याही नावाचा समावेश
राज्यातील सहा बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्याच्या प्रशासनाने रात्री आठ वाजता बदल्यांचे आदेश जारी केले. काही दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस प्रमुखांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज मंगळवारी ६ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांच्या यादीत अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याही नावाचे समावेश आहे. तुकाराम मुंढे यांची बदली पुन्हा एकदा झाल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सत्तेची सूत्रे हाती घेतल्यापासून बदल्यांचा धडाका लावला आहे. कॅबिनेट बैठकीच्या दिवशी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी होतात. या आठवड्यात देखील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. ६ वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची बदली झाली आहे.
कुणाची कुठे नियुक्ती झाली?
संजय खंदारे - वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालयातील मुंबई विभागातील सचिव, अन्न व औषध प्रशासन विषयाचा अतिरिक्त कार्यभार पुढील आदेश होईपर्यंत त्यांच्याकडे सोपवण्यात आलाय. धीरज कुमार यांच्याकडून हा कार्यभार स्वीकारावा लागणार आहे.
तुकाराम मुंढे यांची मुंबईतील अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती श्रीधर डुबे यांच्या जागी झाली.
कान्हुराज बगाटे यांची नियुक्ती महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना रुबल प्रखेर-अगरवाल यांच्याकडून कार्यभार स्वीकारावा लागणार आहे.
बाबासाहेब बेलदार यांची धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
श्रीधर डुबे यांची मुंबई महानगर क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आर एस चव्हाण यांची हापकीन जीव औषध निर्माण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.