

राज्यात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांची एक्स्प्रेस सुसाट
4 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, प्रशासनात उलटेफर
राज्यात काही दिवसांपासून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या होऊ लागल्या आहेत. राज्यात गुरुवारी पुन्हा ४ बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पुणे, नागपूर, गोंदियातील पालिकेच्या आयुक्तपदी नव्या अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मिळाल्या माहितीनुसार, राज्यात प्रशासनाने गुरुवारी आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. या पुणे,नागपूरमधील प्रशासनाचा मोठा उलटफेर करण्यात आला आहे. पुणे विभागाचे आयुक्त आणि क्रीडा आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पुणे विभागाचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची मुंबईत ग्रामविकास विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आलीये.
२००८ सालच्या बॅचचे अधिकारी डॉ. चंदक्रांत पुलकुंडवर यांनी पुणे विभागाच्या आयुक्तपदी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. त्यांना आता मंत्रालयातील ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाची जबाबदारी दिली आहे. त्यानंतर पुणे विभागाच्या आयुक्तपदी शीतल तेली-उगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी या आधी राज्याच्या क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयात सेवा बजावली आहे.
वैद्यकीवर रजेवर असलेले दीपक सिंग यांची पुण्याच्या क्रीडा व युवक सेवा आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विदर्भातील प्रशासनातही बदल करण्यात आले आहेत. गोंदिया जिल्ह्याच्या परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगनांतम एम. यांची नियुक्ती नागपूरच्या पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
कुणाची कुठे नियुक्ती?
डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (IAS:2008)
बदलीचे ठिकाण : सचिव (ग्रामविकास आणि पंचायत राज), ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
शीतल तेली-उगळे (IAS:2009)
बदलीचे ठिकाण - विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे.
दीपक सिंगला (IAS:2012)
बदलीचे ठिकाण : आयुक्त, क्रीडा आणि युवक सेवा, पु
मुरुगनांतम एम. (IAS:2020)
बदलीचे ठिकाण - :अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, नागपूर महानगरपालिका, नागपूर
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.