Police Officers Promotion: राज्यातील १५० पेक्षा अधिक पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश; वाचा संपूर्ण लिस्ट

Police Officers Promotion Orders Check List: महाराष्ट्र गृह मंत्रालयाने एसीपी, डीवायएसपी आणि एसडीपीओसह विविध पदांच्या १५० हून अधिक पोलिस अधिकाऱ्यांना पदोन्नतीचे आदेश जारी केले आहेत. संपूर्ण यादी आणि विभागीय तपशील जाणून घ्या.
Police Officers Promotion: राज्यातील १५० पेक्षा अधिक पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश; वाचा संपूर्ण लिस्ट
Published On
Summary

राज्यातील १५० हून अधिक पोलीस अधिकाऱ्यांना पदोन्नती.

सहाय्यक पोलीस आयुक्त, उपअधीक्षक व उपविभागीय अधिकाऱ्यांचा समावेश.

गृहमंत्रालयाकडून पदोन्नतीचे अधिकृत आदेश जारी.

IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांनंतर पोलीस खात्यात मोठा फेरबदल.

अक्षय बडवे, साम प्रतिनिधी

राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर आता राज्यातील १५० पेक्षा अधिक पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नती करण्यात आलीय. सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस उपअधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी पदासाठी असलेल्या पदावर पदोन्नती करण्यात आलीय. गृहमंत्रालयाने त्याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

मुंबई, ठाणे, पुणे, सोलापूर शहरातील अनेक अधिकाऱ्यांची पदोन्नती झालीय. तसेच राज्यातील ३५ सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या सुद्धा झाल्या आहेत. राज्यातील बड्या अधिकाऱ्यांच्या बदली आणि पदोन्नतीचे आदेश गृहविभागाने दिले आहेत.महाराष्ट्र पोलीस अधिनियम (1951 चा 22) याच्या कलम 22 न तरतुदींनुसार पदोन्नती करण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com