Navneet Rana Threat: भाजप नेत्या नवनीत राणा यांना पुन्हा जिवे मारण्याची धमकी

Bjp Leader Navneet Rana Receives Death Threat: माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांना इंस्टाग्राम रीलद्वारे पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. अमरावतीतील राजापेठ पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल; सायबर पोलिसांनी तपास सुरू केला.
Bjp Leader Navneet Rana
Bjp Leader Navneet Rana Receives Death Threatsaam tv
Published On
Summary
  • नवनीत राणा यांना पुन्हा एकदा जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे.

  • धमकी इस्टाग्रामवरील एका रीलच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

  • याप्रकरणी अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

  • सायबर पोलिसांच्या सहाय्याने इंस्टाग्राम अकाउंट धारकाचा तपास सुरू आहे.

भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा जिवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. नवनीत राणा यांना याआधीही पाकिस्तानातून जिवे मारण्याची धमकी आली होती. आता एका इस्टाग्रामवरील रीलच्या माध्यमातून त्यांना धमकी देण्यात आलीय. (Former MP Navneet Rana Receives Death Threat Again via Instagram Reel)

सोशल मीडियावर रिल्स तयार करून नवनीत राणा यांना गळा कापण्याची आणि जिवे मारण्याची धमकी एका व्यक्तीने दिलीय. याप्रकरणी अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलीय. नवनीत राणा यांचे स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांच्याकडून ही तक्रार दाखल करण्यात आलीय. राजापेठ पोलिसांनी इंस्टाग्राम अकाउंट धारकावर गुन्हा दाखल केलाय. दरम्यान रील बनणाऱ्यानं इंस्टाग्रामवरील धमकी देणारी पोस्ट डिलीट केलीय. दरम्यान राजापेठ पोलीस सायबर पोलिसांच्या माध्यमातून करणार तपास करणार आहे.

Bjp Leader Navneet Rana
Navneet Rana: किसी के हात ना आयेगी... नवनीत राणांचा भरपावसात डान्स; VIDEO

'हिंदू शेरनी हनुमान चालीसा पढने वाली थोडे दिन की मेहमान है. जल्दी उडने वाली है.'

यापूर्वीही अनेकवेळा नवनीत राणा यांना जिवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. मागे एकदा त्यांना पाकिस्तानातून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. नवनीत राणा यांना आलेल्या धमकीच्या संदेशात ‘हिंदू शेरनी हनुमान चालीसा पढने वाली थोडे दिन की मेहमान है. जल्दी उडने वाली है.’ असं म्हटलं होतं. पाकिस्तानातील वेगवेगळ्या फोनवरून या धमक्या आल्या होत्या. त्यानंतर राणा यांच्याकडून ही माहिती पोलिसांना दिली होती. आता पुन्हा एकदा नवनीत राणा यांना धमकी आलीय.

Bjp Leader Navneet Rana
Agriculture Loan: शेतकरी कर्जमाफीवर बोलताना मंत्री बावनकुळे गडबडले, एकाच मिनिटांत दोन परस्परविरोधी वक्तव्ये

२०२४ मध्येही आली होती धमकी

२०२४ मध्येही नवनीत राणा यांना पाकिस्तानमधून धमकी आली होती. त्यांच्या व्हॉटसअ‍ॅप क्रमांकावर क्लिप पाठवून त्याना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून ही धमकी आली होती. आता पुन्हा राणा यांना धमकी आल्यामुळे पोलीस यंत्रणा कामाला लागलीय.नवनीत राणा यांनी ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे झालेल्या नुकसानबाबत डिवचले होते. त्यानंतर त्यांना पाकिस्तानमधून धमकी आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com