
बालाजी सुरवसे, साम प्रतिनिधी
शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळणारअसल्याचं म्हणत महायुती सरकार सत्तेत आलं, परंतु अद्याप कर्जमाफीचा निर्णय झालेला नाहीये. गेल्या काही दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारकडून मात्र संभ्रम निर्माण केला जातोय. याचं ताजं उदाहरण म्हणजे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली परस्परविरोधी दोन वक्तव्ये.
धाराशिवमध्ये पत्रकारांशी बोलताना मंत्री महोदय गडबडले. शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार, असा प्रश्न मंत्री बावनकुळे यांना विचारण्यात आला होता. त्यावरून उत्तर देताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे गडबडले आणि परस्परविरोधी विधानं केली.आधी म्हणाले, कर्जमाफीवरून समिती काम करतेय. नंतर म्हणाले समिती स्थापन करणार. त्यानंतर म्हणाले अजून समितीची कार्यकक्षा ठरली नाहीये. आता मंत्री महोदयांच्या या विधानाचा अर्थ सामान्य माणासांने नेमका अर्थ तरी काय घ्यायचा?
आधी म्हणाले समिती काम करतेय?
कधी कधी आपल्याला शेतकऱ्यांची सरकट कर्जमाफी करता आपण शेतात फॉर्म हाऊस बांधतो त्याचे कर्ज असते. तर कधी कधी काही शेतकरी धनाढ्य असतात, ते दोन ते पाच कोटी उत्पन्न कमावत असतात. तयार करण्यात आलेली समिती ज्या शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफीची गरज आहे त्याचा अहवाल त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवून घेत आहे.
तो अहवाल महसूल विभागाकडे येत आहेत. त्यात महसूल आणि कृषी विभाग काम करत आहे. त्यात आमचे सरकार असं ठरवलंय की, ज्यांना गरज आहे त्याच योग्य शेतकऱ्यांना कर्जमाफी दिले जाईल. याकरिता समिती कामाला लागलीय.
या संपूर्ण समितीची कार्यकक्षा ठरवायचीय आहे. कशा प्रकारे समिती काम करणार हे ठरवलं जाईल. या समितीमध्ये काही सनदी अधिकारी, माजी अधिकारी समिती असतील. गरीब आणि गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली गेली पाहिजे यासाठी या समितीची कार्यकक्षा अशी राहणार आहे.
महायुती सरकार सामान्य लोकांचं आणि शेतकऱ्यांचं सरकार आहे, असा दावा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करतात. परंतु अद्याप सरकारनं शेतकरी कर्जमाफीवर कोणताच निर्णय घेतला नाहीये. शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहे. पण त्यात कर्जमाफीवरून संभ्रम निर्माण करणारी मंत्र्यांच्या विधानामुळे सरकार शेतकऱ्यांची थट्टा करतेय का? असा सवाल उपस्थित होतोय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.