Kharadi Rave Party: जावई खेवलकरांच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ फोल्डर, चाकणकरांच्या आरोपांनंतर सासरे खडसेंचा पारा चढला

Eknath Khadse Responds On Rupali Chakankar Allegation : पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रांजल खेवलकर यांच्यावर गंभीर आरोप केलेत. एकनाथ खडसे यांनी त्यावरून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत याला राजकीय षड्यंत्र म्हटलंय.
Kharadi Rave Party
Eknath Khadse Responds On Rupali Chakankar Allegationsaam tv
Published On
Summary
  • प्रांजल खेवलकर अटकेत असून, त्यांच्यावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे गंभीर आरोप.

  • या आरोपांमुळे एकनाथ खडसे संतप्त; सरकारवर दबाव टाकण्याचा आरोप.

  • महिला आयोगाने प्रकरणात महिलांची तस्करीचा कोन तपासण्याची मागणी केली.

  • खडसे व चाकणकर यांच्यातील संघर्षामुळे राजकीय वातावरण तापले.

पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी धक्कादायक दावा केलाय. याप्रकरणात अटकेत असलेले प्रांजल खेवलकर यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केलेत. रुपाली चाकणकर यांनी जावई यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर सासरे एकनाथ खडसे संतापले आहेत. रुपाली चाकणकर या चेकाळल्या आहेत. रोहिणी खडसे आणि माझं तोंड दाबण्याचे प्रयत्न सरकारकडून होत असल्याचा आरोप खडसे यांनी केलाय.

पुण्यातील खराडी येथे सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकाला होता. या प्रकरणात माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात आता महिला आयोगाची एन्ट्री झाली. या प्रकरणाचा महिलांची तस्करीच्या दृष्टीनेही तपास करावा, असे महिला आयोगानं म्हटले होते.

Kharadi Rave Party
Pune Rave Party Case: मोठी अपडेट! एप्रिल-मे महिन्यातही हॉटेलमध्ये झाली पार्टी; कोण कुठून आलं होतं?

दरम्यान आज पुणे पोलीस आयुक्तांनी महिला आयोगाला अहवाल पाठवल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यावर गंभीर आरोप केलेत. खेवलकरांच्या मोबाईलमध्ये महिलांचे आक्षेपार्ह फोटो आहेत, असा आरोप चाकणकर यांनी केलाय. चाकणकर यांच्या या आरोपानंतर आता एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिलीय.

Kharadi Rave Party
Pune Rave Party:1487 आक्षेपार्ह फोटो अन् ब्लॅकमेलिंग खेवलकरांच्या मोबाईलमध्ये काय-काय आढळलं?

रुपाली चाकणकर या चक्रावल्या आहेत. दोन महिन्यांपासून सरकारवर आम्ही हल्ला करतोय. त्यामुळेच रोहिणी खडसे आणि माझं तोंड दाबण्याचे उद्योग सरकारचे चालू आहेत. माझ्या जावयाने जर असं केलं असेल तर मला लाज वाटेल. तो दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. तो जर दोषी असेल तर त्याला फाशी देखील झाली तरी मी त्याच्या समर्थन काही करणार नाही, असा नालायक प्रकार करणारा जावई मला नकोय.

पण रुपाली चाकणकर यांना हे सगळं सांगण्याचा अधिकार कोणी दिला? रुपाली चाकणकर तुम्ही तपास अधिकारी कधी झाल्या? मानवी तस्करीमध्ये नाशिकचं हानी ट्रॅप प्रकरण येत नाही का? मंत्री हानी ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत. त्याच्यावर तुम्ही बोलत नाहीत का? असा सवाल यावेळी खडसे यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com