News Rules For Bullock Cart Race : बैलगाडा शर्यतीच्या (bailgada sharyat) आयोजनाबाबत महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन आयुक्तालयाने नवीन मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक काढले आहे. सुमारे 17 पानाच्या परिपत्रकात बैलगाडा शर्यतीसाठीच्या आयाेजनासाठी जवळपास 100 पेक्षा जास्त अटी आणि सूचना नमूद करण्यात आल्या आहेत. (Maharashtra News)
बैलगाडा शर्यतीला सर्वाेच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर प्राणी मित्रांनी काही गाेष्टींवर नाराजी व्यक्त केली हाेती. त्यानंतर सरकारने बैलगाडी शर्यतीसाठी नवी नियमावली तयारी केली. नव्या नियमावलीनूसार गावचे संस्कृती परंपरेनुसारचे धार्मिक सण उत्सव, यात्रा यासाठीच बैलगाडा शर्यतींना परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे आगामी काळात नेत्यांच्या वाढदिवसांसह अन्य सार्वजनिक कार्यक्रमांना बैलगाडा शर्यतीचे आयाेजन (new rules for bailgada sharyat) करता येणार नाही.
दरम्यान या नियमामुळे आगामी काळातील निवडणूका डोळ्यासमोर ठेवुन बैलगाडा शर्यतीचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्याचा प्लॅन राजकीय नेत्यांचा फसला गेला. बैलगाडा शर्यतीच्या आडुन राजकारणाची पोळी भाजणा-या भाऊ, दादा, काका अशी बिरुदावली मिरवणा-यांवर बैलगाडा शर्यत आयाेजनाचा चाप बसणार आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.