Government Hospital: राज्यातील आरोग्यसेवा 'स्ट्रेचर'वर, शासकीय रुग्णालयांची दुरवस्था; रुग्णांचे हाल

Maharashtra Health Care: राज्यातील आरोग्यसेवेचा प्रश्न गंभीर होत चालल्याचे चित्र समोर आले आहे. शासकीय रुग्णालयांची दुरावस्था झाली आहे. कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने रुग्णांचे हाल होत आहे.
Government Hospital: राज्यातील आरोग्यसेवा 'स्ट्रेचर'वर, शासकीय रुग्णालयांची दुरवस्था; रुग्णांचे हाल
Government HospitalSaam Tv
Published On
  • राज्यातील अनेक शासकीय रुग्णालयांमध्ये कर्मचारी आणि सुविधांचा तुटवडा

  • नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये नातेवाईकांनाच स्ट्रेचर आणि व्हीलचेअर ढकलावी लागत असल्याचे चित्र

  • चांदवड येथील ट्रॉमा केअर सेंटर कोट्यवधी रुपये खर्चून उभारले असले तरी पूर्ण क्षमतेने सुरू नाही

  • पालघरच्या बोईसर रुग्णालयात रुग्णांना जीर्ण आणि भाड्याच्या इमारतीत उपचार घ्यावे लागत आहे

सुप्रीम मसकर, साम टीव्ही

राज्यातील शासकीय रुग्णालयांची अवस्था सध्या स्वतःच 'स्ट्रेचर'वर असल्यासारखी झालीये. कुठे कर्मचाऱ्यांअभावी नातेवाईकांनाच रुग्णांचे स्ट्रेचर आणि व्हीलचेअर ओढावी लागतेय, तर कुठे करोडोंची इमारत असूनही उपचार मिळत नाहीयेत. त्यामुळे राज्यातील आरोग्यसेवाचं वास्तव जाणून घेण्यासाठी साम टिव्हीनं वेगवेगळ्या जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये रिअॅलिटी चेक केलं. आता नागपुरातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील हा व्हिडिओ पाहा...

हीच भीषण परिस्थिती छत्रपती संभाजीनगरच्या प्रसिद्ध 'घाटी रुग्णालयात' पाहायला मिळाली. अपघात विभागातून रुग्णाला दुसऱ्या वॉर्डात नेण्यासाठी कर्मचारीच उपलब्ध नसतात. त्यामुळे हताश झालेले नातेवाईक स्वतःच स्ट्रेचर ओढतात आणि सोबत जड ऑक्सिजन सिलेंडर घेऊन वॉर्डावॉर्डात भटकतायत. मात्र घाटी रुग्णालयात रुग्णसंख्या जास्त असल्यानं काहीवेळा गैरसोय होत असल्याचं डीननं मान्य केलंय.

Government Hospital: राज्यातील आरोग्यसेवा 'स्ट्रेचर'वर, शासकीय रुग्णालयांची दुरवस्था; रुग्णांचे हाल
Hospital Fire : हॉस्पिटलमध्ये अग्नितांडव! ICU वॉर्डात भयंकर आग, १० रुग्णांचा मृत्यू, अनेक जण गंभीर

दुसरीकडे मुंबई-आग्रा महामार्गावरील अपघातातील जखमींचा जीव वाचावा म्हणून १ कोटी ७६ लाख रुपये खर्चून नाशिक चांदवडमध्ये 'ट्रॉमा केअर सेंटर' उभारण्यात आलं. पण गेली 10 वर्ष हे सेंटर पूर्ण क्षमतेने सुरूच झालेलं नाही. बेड आणि मॉनिटर्सचा अभाव असल्याने जखमींना नाशिकला धाव घ्यावी लागते. याच रुग्णालयात एक्स-रे काढण्यासाठी आलेली एक वृद्ध आजी चालता येत नसल्याने जमिनीवर फरफटत बाहेर आली, पण एकाही कर्मचाऱ्यानं स्ट्रेचरद्वारे तिची मदत केली नाही...

Government Hospital: राज्यातील आरोग्यसेवा 'स्ट्रेचर'वर, शासकीय रुग्णालयांची दुरवस्था; रुग्णांचे हाल
मध्य रेल्वेच्या १० स्थानकांवर लवकरच मिळणार आपत्कालीन मेडिकल सुविधा

दरम्यान 'ट्रॉमा केअर सेंटर'चं कामकाज कंत्राटदार कंपनीनं पूर्ण न केल्याचं वैद्यकीय अधीक्षकांनी कबुल केलयं. याहून भयंकर परिस्थिती मुंबईला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यातील बोईसर रुग्णालयाची आहे. बोईसरमधील एकमेव ग्रामीण रुग्णालय हक्काच्या इमारतीअभावी गेल्या अनेक वर्षांपासून एका खाजगी संस्थेच्या 'भाड्याच्या आणि जीर्ण' इमारतीत सुरू आहे.

छत कधी अंगावर पडेल याचा नेम नाही, अशा इमारतीत रुग्ण जीव मुठीत धरून उपचार घेत आहेत. विशेष म्हणजे, 2006 मध्ये मंजूर झालेल्या नवीन इमारतीचे काम 20 वर्षांनंतरही अपूर्णच आहे. अशावेळी जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी नेमकं काय म्हणाले ऐका.

Government Hospital: राज्यातील आरोग्यसेवा 'स्ट्रेचर'वर, शासकीय रुग्णालयांची दुरवस्था; रुग्णांचे हाल
Pune Hospital: पुण्यातील आरोग्य विभाग 'व्हेंटिलेटर'वर, पालिका रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचा तुटवडा; धक्कादायक आकडेवारी समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com