Maharashtra Government: विद्यार्थ्यांना दिलासा! भरती परीक्षा प्रक्रियेत सुधारणा होणार, फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय

Fadnavis Government Big Dicision: भरती प्रक्रियेसाठी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. फडणवीस सरकारने भरती प्रक्रियेसंदर्भात मोठा निर्णय घेतला.
Maharashtra Government: विद्यार्थ्यांना दिलासा! भरती परीक्षा प्रक्रियेत सुधारणा होणार, फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय
Fadnavis Government Big DicisionSaam Tv
Published On
  • महाराष्ट्र भरती परीक्षा पद्धतीत मोठी सुधारणा

  • देवेंद्र फडणवीस यांचा भरती परीक्षा प्रक्रियेबाबत मोठा निर्णय

  • महाराष्ट्रात पेपरफूट रोखण्यासाठी केंद्राचा कठोर कायदा लागू होणार

  • भरती परीक्षांसाठी महाराष्ट्रात 25 हजार सुरक्षित क्लासरूम

  • भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात येणार

भरती परिक्षा पद्धती सुधारणांसाठी फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. भरती परिक्षा पद्धती सुधारणांसाठी राज्यात उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाणार आहे. महसूल स्तरावर विद्यार्थी संवाद होणार आहे. फडणवीस सरकार पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारासंदर्भात केंद्राचा कायदा राज्यात लागू करणार आहे. 25 हजार सुरक्षित क्लासरूम उभारण्यात येणार आहेत. आज विशेष आयोजित बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे निर्देश दिले आहेत.

महाराष्ट्रात विविध सेवाभरतींसाठी होणार्‍या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक, अधिक सुरक्षित आणि सर्वसंमतीने सुधारणांसाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला. या समितीने राज्यात प्रत्येक विभागात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत सर्वंकष सुधारणांबाबत अहवाल सादर करायचा आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा उपस्थित होते, त्यांनीही अनेक उपयुक्त सूचना या बैठकीत केल्या.

Maharashtra Government: विद्यार्थ्यांना दिलासा! भरती परीक्षा प्रक्रियेत सुधारणा होणार, फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय
Government Scheme : गर्भवती महिलांसाठी मोठी खुशखबर! सरकार देत आहे ₹5,000 ते ₹6,000; या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात का?

वर्षा निवासस्थानी आज विशेषत्वाने आयोजित बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे निर्देश दिले. ही उच्चस्तरीय समिती सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेत राहणार असून राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते, माहिती-तंत्रज्ञान विभागाचे सचिव वीरेंद्र सिंग, पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. एन. रामास्वामी आणि नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांचा त्यात समावेश असेल. या समितीने प्रत्येक महसुली विभागात जाऊन विद्यार्थी, शिक्षण संस्थाचालक आणि संबंधित घटकांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घ्यायची आहेत. त्याआधारावर राज्यासाठीचे समग्र धोरण ठरेल.

Maharashtra Government: विद्यार्थ्यांना दिलासा! भरती परीक्षा प्रक्रियेत सुधारणा होणार, फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय
Maharashtra IAS Officer Transfer List: राज्यातील 5 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा कोणत्या अधिकाऱ्यांची कुठे झाली बदली?

अलिकडेच केंद्र सरकारने पेपरफूट आणि परीक्षा गैरव्यवहारासंदर्भात संसदेत एक कायदा केला आहे. महाराष्ट्राचाही स्वतंत्र कायदा आहेच. तथापि संसदेने केलेला कायदा अधिक कठोर असल्याने तो महाराष्ट्रातही लागू करण्यासंदर्भात येणार्‍या पंधरवड्यात प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, असेही निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

Maharashtra Government: विद्यार्थ्यांना दिलासा! भरती परीक्षा प्रक्रियेत सुधारणा होणार, फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय
Maharashtra government : तुकाराम मुंढेंनी मांडला संपूर्ण प्लॅन अन् शिंदेंनी क्षणात दिला आदेश! FDA च्या बैठकीतील 'तो' मोठा निर्णय आला समोर

राज्यात किमान 25 हजार सुरक्षित क्लासरुम उभारण्यात याव्यात, असेही निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत दिले. या विविध परीक्षांमध्ये जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक, शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांचीही समन्वय भूमिका, इतर विविध देशांमधील परीक्षा पद्धती, विद्यमान प्रक्रिया आणि त्यातील विविध संभाव्य सुधारणा अशा अनेक विषयांवर यावेळी सांगोपांग चर्चा झाली. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल आणि इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com