

Maharashtra Sting energy drink ban near schools : राज्यातील शाळकरी मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शाळा आणि महाविद्यालयीन परिसराच्या ५०० मीटरच्या आत 'स्टिंग' या एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर तातडीने बंदी घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी या पेयाच्या दुष्परिणामांकडे लक्ष वेधणारा प्रश्न उपस्थित केला होता. यावर गंभीर दखल घेत विधानसभा नरहरी झिरवळ यांनी प्रशासनाला हे कडक पाऊल उचलण्याचे आदेश दिले आहेत. लवकरच सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील आणि नियमांची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. (Maharashtra Government Bans Sale of Sting Energy Drink Within 500 Metres of Schools to Protect Students' Health)
मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये एनर्जी ड्रिंकचा वापर झपाट्याने वाढत आहे. आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. त्यामुळे, शाळांजवळ 'स्टिंग'च्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचे पालन होत आहे की नाही हे सुनिश्चित करण्यासाठी देखरेखही वाढवली जाईल, अशी माहिती सरकारकडून विधानसभेत देण्यात आली.
अन्न नियामक संस्था एफएसएसएआयने (FSSAI) एनर्जी ड्रिंक कंपन्यांवर कारवाई सुरू केली असतानाच महाराष्ट्र सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १ जुलै रोजी एफएसएसएआयने रेड बुल, पेप्सिकोचे ॲड्रेनालाईन रश, रिलायन्सचे कॅम्पा एनर्जी गोल्ड बूस्ट, स्टिंग, हेल एनर्जी आणि कोका-कोला-समर्थित मॉन्स्टर एनर्जी या सहा प्रमुख ब्रँड्सना नोटिसा बजावल्या आहेत. या कंपन्यांवर फसवे उत्पादन ब्रँडिंग आणि ग्राहकांना दिशाभूल करणारे दावे केल्याचा आरोप आहे. आज स्टिंगवरून विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर सरकारकडून यावर बंदी घातल्याचा निर्णय जारी केला.
स्टिंग दारूपेक्षाही घातक
स्टिंग एनर्जी ड्रिंकमुळे आरोग्यावर दुष्परिणाम होतायत. नियमात बसत असले तरी मुलांना याची सवय लागते. लहान मुले, गरोदर महिलांसाठी पिण्यासाठी योग्य नसल्याचे लिहिले आहे. लहान मुलांना याची विक्री होवू नये. दारूपेक्षाही हे घातक आहे असे विक्रम पाचपुते म्हणाले. यावर नरहरी झिरवाळ म्हणाले की, स्टिंग हे शाळेच्या आवारात हे विकले जातंय हे मान्य. शाळांच्या ५०० मीटरच्या आत अंमली पदार्थांसह यावर बंदी घालू. राज्यात तीन लॅब आहेत.२२ पीपीपी तत्त्वावर लॅब सुरू करत आहोत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.