

महापालिका निवडणुकांआधी महाराष्ट्र पोलिस खात्यात मोठा फेरबदल
माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची डीजीपीपदी नियुक्ती
रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबरला संपणार
महापालिका निवडणुकांआधी महाराष्ट्र पोलीस खात्यात मोठा फेरफदल झालाय. वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक (डीजीपी) म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. महाराष्ट्र सरकारने याबाबतचा औपचारिक आदेश जारी केलाय. सदानंद दाते हे महाराष्ट्राच्या डीजीपी रश्मी शुक्ला यांची जागा घेणार आहेत. दोन दिवसांनी जानेवारीला दाते पदभार स्वीकारणार आहेत. रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर रोजी संपत आहे. (Major Police Reshuffle Ahead Of Civic Polls; Sadanand Date Appointed Maharashtra Dgp)
सदानंद दाते हे १९९० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. दाते यांना त्यांच्या मूळ कॅडरमध्ये परतण्यास केंद्र सरकारने अलीकडेच मान्यता दिलीय. सदानंद दाते यांनी यापूर्वी राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) नेतृत्व केलंय. मुंबईत सह पोलीस आयुक्त (गुन्हे) आणि सह पोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) म्हणून काम केलंय.
एनआयए प्रमुख होण्यापूर्वी, सदानंद दाते यांनी महाराष्ट्रात दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुखाची जबाबदारी संभाळलीय. त्यांनी महाराष्ट्रात अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. ज्यात मीरा-भाईंदर आणि वसई-विरारचे पोलिस आयुक्त, सहआयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) आणि मुंबईतील गुन्हे शाखेचे सहआयुक्त यांचा समावेश आहे. सीबीआयमध्ये उपमहानिरीक्षक आणि केंद्रीय राखीव पोलिस दलात (सीआरपीएफ) महानिरीक्षक म्हणूनही काम केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार डीजीपीचा कार्यकाळ दोन वर्षांचा असतो. रश्मी शुक्ला यांची निवृत्तीच्या फक्त पाच महिने आधी जानेवारी २०२४ मध्ये डीजीपी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि त्यांना ३ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या नियुक्तीनंतर, सदानंद दाते यांचा कार्यकाळ आता २०२७ वर्षाच्या अखेरपर्यंत राहील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.