
यवतमाळ-नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर
पूरामुळे वाहतूक ठप्प, अनेक गावांचा संपर्क तुटला
पुरामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद
संजय राठोड, साम प्रतिनिधी
राज्यात पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले असून नांदेड जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झालाय. जिल्ह्यातील नदी-नाले भरुन वाहून लागले आहेत. यवतमाळमध्येही मुसळधार पाऊस झाला असून नदी नाले दुथडी वाहू लागले आहेत. धनोडा येथील पैनगंगा नदीला पूर आलाय. पैनगंगा नदीला पूर आल्यानं यवतमाळ - नांदेड या दोन जिल्ह्याचा संपर्क तुटलाय. तर वीज कोसळून एका शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घाटंजी तालुक्यात घडलीय.
जिल्ह्यात संततदार पाऊस सुरू असून या पावसामुळे पैनगंगा आणि पूस नदीला पूर आलाय. पूस नदीच्या छत्रपती शिवाजी महाराज पुलावरून पाणी वाहू लागल्यानं पुसद आणि यवतमाळ दरम्यानची वाहतूक ठप्प झालीय. दरम्यान नदीकडच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय. जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आलाय. पैनगंगा नदीसह अरुणावती नदी,खुनी नदीला पूर आलाय.
पैनगंगा नदीला पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनने दिला आहे. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून दोन दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडण्यात आली आहे. पैनगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानं पैनगंगा नदीला पूर आलाय. अरुणावती नदीलादेखील पूर आलाय. मुकिंदपुर शेत शिवारात पुराच्या पाण्याने वेढा घातलाय. बाभुळगांव तालुक्यातील कोटंबा येथे एक व्यक्ती नदीच्या पाण्यात वाहून गेला. अर्जुन ऊईके असं या व्यक्तीचे नाव आहे.
अर्जुन ज्योतीलिंग नदीत गेला वाहून गेला होता. महागांव तालुक्यातील धारमोहा येथील भगवान भेंडे पुराच्या पाण्यात वाहून गेले. त्यांचा मृतदेह सापडलाय. दुसरीकडे मांडवी ते पाटणबोरी येथील खुनी नदीच्या पुलावरून 11 मिटर उंच पाणी वाहत आहे. खुनी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. घाटंजी तालुक्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. कोच्ची येथे ही घटना घडली असून शालिक कवडू अक्कावार असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.