शेतकऱ्यांना ५ हजाराची रक्कम कधी मिळणार? उपमुख्यमंत्री शिंदेंची नांदेडमधून मोठी घोषणा

Diwali Relief for Farmers: महाराष्ट्र सरकारने दिवाळीपूर्वी दुष्काळग्रस्त पात्र शेतकऱ्यांसाठी ५,००० रुपयांच्या आगाऊ मदतीला मंजुरी दिलीय. पैसे मिळण्याची पद्धत, पात्रतेचे निकष जाणून घ्या.
Diwali Relief for Farmers
Eknath Shinde announces Rs 5,000 advance assistance for farmerssaam tv
Published On: 
Summary
  • एकनाथ शिंदे यांची नांदेडमधून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

  • पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी DBT द्वारे रक्कम जमा करण्याचे नियोजन.

  • राज्यातील ३०४ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील शेतकऱ्यांना लाभ मिळणार.

यंदा राज्यात पावसाने ओढ दिल्यामुळे दुष्काळ परिस्थिती निर्माण झालीय. जनावरांच्य चारा-पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय.पाऊस कमी झाल्यामुळे शेतातील पिके करपून गेली आहेत. त्यात तोंडावर दिवाळीचा सण आलाय. शेतकऱ्यांची स्थिती पाहून सरकारनं दुष्काळ जाहीर केलाय. दिवाळी सारखा सण दुखात जाऊ नये, यासाठी सरकारनं अग्रिम ५ हजारांची मदत देण्याची घोषणा केलीय. मात्र ही रक्कम कधी मिळेल याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे.

नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले एकनाथ शिंदेंनी शेतकऱ्यांच्या मदतीबाबत मोठी घोषणा केलीय. राज्यात दुष्काळाचा संकट मोठं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्री आमदार खासदार शेतकऱ्यांच्या बांधावर गेले . दुष्काळ जाहीर केला. दुष्काळाचे जे लाभ आहे , नुकसान भरपाई आहे, बारा प्रकारचे देय आहे , शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ नये, यासाठी सरकारने पाच हजाराची तातडीची मदत जाहीर केलेली आहे. साडेसात हजार कोटीचं नियोजन केलेले आहे. पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रक्रियेतून जात आहे. लवकरात लवकर पैसे मिळतील, दिवाळी पूर्वी मिळतील असं नियोजन केल्याचं शिंदेंनी केलीय.

Diwali Relief for Farmers
Maharashtra News Live Update: आमदार जितेंद्र आव्हाड आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच मंचावर..

पाच हजार रुपये हे तात्काळ मिळणार आहे, विरोधी पक्ष काय म्हणतो पाच हजाराने काय होणार, पाच हजार रुपये हे तातडीचे आहेत. आणखीची मदत आहे ज्याप्रमाणे पंचनामे झाले. ज्या तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला, त्यासर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना भरघोस मदत करणार आहे. आमचे सरकार कुठेही हात आखडता घेणार नाही. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचं पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले आहे. केंद्रदेखील महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या मागे उभं राहील त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही.

Diwali Relief for Farmers
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! खात्यात २००० रुपये जमा, लगेच तुमचे नाव तपासा

दरम्यान शनिवारपासून राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये ही रक्कम पाठवली जातेय. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या खात्यात ही मदत जमा झाल्याची माहिती समोर आलीय. पण तुमच्या खात्यात अजूनही ५ हजार रुपये जमा झाले नसतील तर काय करायचं? ही रक्कम सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने जमा केली जाणार आहे.

सरकारकडून सुरुवातीला हा निधी तहसील कार्यालयाकडे पाठवला जाणार असून, त्यानंतर शेतकऱ्यांच्या फार्मर आयडीशी लिंक असलेल्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. याशिवाय, या मदतीच्या रकमेतून कोणत्याही प्रकारची कपात करू नये, अशा सूचनाही सरकारकडून बँकांना देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना मिळणारी संपूर्ण ५ हजार रुपयांची रक्कम काढता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.