PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! खात्यात २००० रुपये जमा, लगेच तुमचे नाव तपासा

PM Kisan 24th installment : पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात २-२ हजार रुपये जमा झाल्याची अपडेट समोर आली आहे.
PM Kisan Yojana
PM Kisan Yojanasaam tv
Published On: 

PM Kisan 24th Installment: दुष्काळात शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा २४ वा हप्ता जमा व्हायला सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हा हप्ता आज दिनांक ३० ऑक्टोबर रोजी जारी केला आहे. या हप्त्याचा लाभ देशातल्या ९ कोटी ३० लाखांहून जास्त शेतकऱ्यांना मिळणार आहे. या माध्यमातून १९ हजार कोटी रुपयांची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केली जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बनासकांठा येथे १४ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त विकासकामांचं भूमिपूजन केलं. याच कार्यक्रमादरम्यान पीएम किसान योजनेचा २४ वा हप्ता वितरित करण्यात आला. याआधी जून २०२६ मध्ये योजनेचा २३ वा हप्ता जारी करण्यात आला होता.

PM Kisan Yojana
Aadhaar Card : आधार कार्ड जवळ नसेल तरी चिंता नको! अवघ्या 1 मिनिटात मोबाईलवर करा डाउनलोड, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

शेतकऱ्यांना वर्षाला मिळतात ६ हजार रुपये

पीएम किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात फेब्रुवारी २०१९ मध्ये झाली. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी २ हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केली जाते. आतापर्यंत २३ हप्त्यांमधून पात्र शेतकऱ्यांना ४.४७ लाख कोटी रुपयांचं वितरण करण्यात आलं आहे.

PM Kisan Yojana
8th Pay Commission: महागाई भत्ता 63% वर फिटमेंट फॅक्टर किती असेल? कर्मचाऱ्यांच्या पगाराचे गणित समजून घ्या

खात्यात पैसे आले की नाही, तपासण्याची प्रोसेस

१. सर्वात आधी pmkisan.gov.in या वेबसाइटला भेट द्या.

२. होमपेजवरील 'Farmers Corner' पर्याय निवडा.

३. 'Beneficiary List' वर क्लिक करा.

४. राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा.

५. 'Get Report' वर क्लिक केल्यानंतर लाभार्थ्यांची यादी पाहता येईल.

e-KYC महत्त्वाची

पीएम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी e-KYC पूर्ण असणं बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्यांनी अजून e-KYC केलेली नाही, त्यांचा हप्ता अडकू शकतो. यासाठी अधिकृत वेबसाइटवर e-KYC ऑप्शन निवडून आधार क्रमांत आणि आधारशी लिंक असलेल्या मोबाइलवर आलेला OTP टाकावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.