

दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे हाल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अशातच शेतकऱ्यांना आर्थिक मदती खूप गरज असते. सरकार त्यांच्यासाठी विविध योजनांमार्फत मदत करत असतं. ज्याने त्यांचा दैनंदिन खर्च किंवा शेतीच्या कामासाठी लागणारा खर्च निघेल. त्यातीलच एक योजना म्हणजे शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना २००० रुपयांचा हप्ता दिला जातो. सध्या या योजनेचे पात्र शेतकरी २४ व्या हप्त्याची वाट पाहतायेत. तर हा हप्ता ३० ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. पण हा लाभ मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी पूर्ण असणं महत्त्वाचं आहे.
दिलेल्या माहितीनुसार, पीएम किसान योजनेचा २४वा हप्ता ३० ऑक्टोबर २०२६ रोजी जारी होणार असून, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २००० रुपये जमा होण्याची अपेक्षा आहे. या हप्त्याचा लाभ ९.३४ कोटी पात्र शेतकऱ्यांना मिळणार असल्याचा उल्लेखही करण्यात आला आहे. मात्र, पैसे जमा होण्याची तारीख आणि लाभार्थ्यांची संख्या याबाबत अधिकृत घोषणेची खात्री करणं महत्त्वाचं आहे.
पीएम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढच्या बाबी पूर्ण केलेल्या असणं आवश्यक आहे.
१. ई-केवायसी पूर्ण करा - लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली असावी.
२. आधार-बँक खाते लिंक - बँक खात्याला आधार जोडलेला असावा आणि आवश्यक आधार सीडिंग प्रक्रिया पूर्ण असावी.
३. भू-सत्यापन पूर्ण - जमिनीशी संबंधित पडताळणी पूर्ण झालेली असावी.
४. योजनेची पात्रता - शेतकरी योजनेच्या नियमांनुसार पात्र असणे आवश्यक आहे. यापैकी एखादी प्रक्रिया अपूर्ण असल्यास हप्ता मिळण्यात अडचण येऊ शकते.
सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत म्हणजेच https://pmkisan.gov.in या वेबसाइटला भेट द्या. वेबसाइटवर ‘Know Your Status’ या पर्यायावर क्लिक करा. तुमचा नोंदणी क्रमांक आणि मागितलेली माहिती भरा. आवश्यक तपशील सबमिट करून तुमच्या अर्जाची स्थिती तपासा.
हप्ता जमा होण्याची वाट पाहण्याआधी ई-केवायसी, आधार सीडिंग आणि भू-सत्यापन पूर्ण असल्याची खात्री करा. तसेच हप्त्याची तारीख आणि वितरणाबाबतची माहिती अधिकृत वेबसाइटवर तपासत राहा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.