बायकोला टीबी, मुलीची फी भरायला पैसे नाही; शिवार हेल्पलाईनवर शेतकऱ्यांचा टाहो, 'या' 5 जिल्ह्यांतून सर्वाधिक कॉल

Farmer Crisis Deepens in Maharashtra: सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रातील ६ हजार ५६१ शेतकऱ्यांनी शिवारा हेल्पलाइनवर संपर्क साधला. पीक नुकसान, कर्जबाजारीपणा आणि पावसाच्या खंडामुळे शेतकरी संकटात असल्याची माहिती डॉ. विनायक हेगाणा यांनी दिली.
MAHARASHTRA FARMER CRISIS
MAHARASHTRA FARMER CRISISsaam tv
Published On: 

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्याच्या उद्देशाने डॉ विनायक हेगाणा यांनी ‘शिवार फाउंडेशन’ ची स्थापना केली. इतकंच नाही तर एका फोनवर शेतकऱ्यांना सल्ला आणि गरज भासल्यास तात्काळ मदत मिळवून देणारा उपक्रम सुद्धा त्यांनी सुरू केला. यासाठी एक हेल्पलाईन नंबर तयार करण्यात आला आणि गेल्या दहा वर्षांमध्ये हजारो शेतकऱ्यांना या उपक्रमाचा फायदाही झाला. शिवार, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या हेल्पलाईनवर मन मोकळं करण्यासाठी तसेच संवाद साधण्यासाठी एका महिन्यात ६ हजार ५६१ शेतकऱ्यांनी फोन केले आहेत.

MAHARASHTRA FARMER CRISIS
उल्हासनगरमधील शिवसेना-भाजपचा वाद पेटला; आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं

मॉन्सून सुरू होण्यापूर्वी हेल्पलाईनवर २ हजार ५६४ फोन आले हा आकडा ऑगस्टमध्ये २ हजार ७८९ तर सप्टेंबरमध्ये यापेक्षा दुप्पट शेतकऱ्यांनी मदतीसाठी संपर्क साधल्याची माहिती शिवार फाउंडेशनचे संस्थापक यांनी दिली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी आलेल्या फोनमध्ये २०.४७ टक्क्यांची वाढ झाल्याचं राज्य सरकारच्या शेतकरी आत्महत्या रोखणाऱ्या कृती दलाचे सदस्य म्हणून कार्यरत हेगाणा यांनी सांगितलं.

MAHARASHTRA FARMER CRISIS
महाराष्ट्रात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; 2 अधिकाऱ्यांची मंत्रालयातच नियुक्ती, कोणाला कुठे जबाबदारी?

डॉ विनायक हेगाणा म्हणाले, शेतकरी अनाथ होत चालला आहे, महापूर ते दुष्काळ हा काळ बघतोय. शेती हाच शेतकऱ्याचा उदरनिर्वाह आहे. ३१ जिल्ह्यांमधून शेतकरी आम्हाला फोन करतात. सरकारी मदत, खाजगी मदत मिळते पण मानसिक पाठबळ देणे, फक्त लढ म्हणा म्हणणारे कोणी पाहिजे म्हणून शिवार हेल्पलाइन सुरू करण्यात आली. ३० ते ३५ दिवस पावसाचा खंड झाला. शेतकऱ्याला पावसाची अपेक्षा होती, शहरात पाऊस पडत होता म्हणून शेतकऱ्याने पेरण्या केल्या. मात्र, १ सप्टेंबरपासून शेतकरी चिंतेत आणि अडचणीत आला असं मत डॉ विनायक यांनी व्यक्त केलं.

सप्टेंबर महिन्यात ६५६१ शेतकऱ्यांनी शिवार हेल्पलाइनवर फोन करून संवाद साधल्याची माहिती सुद्धा डॉ विनायक यांनी दिली. यामध्ये सर्वाधिक शेतकरी हे मराठवाड्यातील नांदेड, बीड, जालना, धाराशिव येथील असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातील हजारो शेतकऱ्यांचे फोन शिवार हेल्पलाइन मागील काही महिन्यांपासून येत आहेत. याचे उदाहरण देताना डॉ विनायक हेगाणा यांनी सांगितले की, "लातूरमधील एका शेतकऱ्याने फोन केला आणि आम्हाला त्यांनी सांगितलं की, महापुरातून मोठं नुकसान झालं. १ लाख रुपयांचे कर्ज घेतले, सोयाबीनची शेती केली. पण २० हजाराचे सुद्धा पीक आले नाही. या शेतकऱ्याचे वडील अपंग आहेत, बायको टी बी आहे, मुलीची फी भरली नाही म्हणून पहिलीच्या वर्गातून तिला काढून टाकलं.

आणखी एक फोन आला जिथे डॉ विनायक सांगतात की, धाराशिवमधून मुलगी म्हणाली शिक्षण भरतीसाठी पुण्यात आले, तीन दिवसांपासून भात खाते आहे, तर हिंगोलीमधील एका १६ वर्षीय मुलाने फोन केला आणि त्याने सांगितले की दादा वडिलांनी आत्महत्या केली, मला शिकायचं आहे मला मदत कराल का? अती संवेदनशील तालुक्यात चारा छावण्या सुरू करा. त्या जनावरांकडे बघून शेतकरी जगतोय. शेतकऱ्यांना विनंती आहे की टोकाची पावले उचलू नका. ८९५५७७१११५ या हेल्पलाइन वर फोन करा आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत असं आश्वासन डॉ विनायक यांनी शेतकऱ्यांना दिलं आहे.

जिल्हानिहाय कॉलची संख्या (सप्टेंबर अखेरीस)

सोलापूर: ५२१

नांदेड: ५८९

नागपूर: ४९३

बीड: ४९३

धाराशिव: ४५८

लातूर: ४४८

परभणी: ३९३

अकोला: ३९३

छत्रपती संभाजीनगर: ३४८

अहिल्यानगर: ३४८

अमरावती: ३४७

यवतमाळ: २२५

जालना: १४८

वर्धा: १४२

हिंगोली: १३६

बुलढाणा: ११९

गोंदिया: ११६

वाशिम: १०४

रत्नागिरी: १०२

कोल्हापूर: ९६

सिंधुदुर्ग: ८८

गडचिरोली: ७९

जळगाव: ६२

नाशिक: ६१

सांगली: ५४

सातारा: ५१

भंडारा: ३४

पुणे: ३२

अमरावती: ३०

धुळे: २९

नंदुरबार: २२

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com