मुंबई: राज्य सरकारकडून आज 5 ऑक्टोबर रोजी तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांसह नागपूर विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये संजय खंडारे, संजय यादव आणि वैष्णवी बी या तीन IAS अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
संजय खंदारे यांची वन विभागात बदली
1996 च्या बॅचचे IAS अधिकारी संजय खंदारे हे पर्यटन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते. त्यांची आता वन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
संजय यादव यांच्याकडे पर्यटन विभागाची जबाबदारी
2009च्या बॅचचे IAS अधिकारी संजय यादव हे समग्र शिक्षा अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांची आता पर्यटन विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
वैष्णवी बी. यांची नागपूरमध्ये नियुक्ती
2019च्या बॅचच्या IAS अधिकारी वैष्णवी बी यांची नागपूर विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या तीनही अधिकाऱ्यांच्या बदलीचे पत्रक राज्य सरकारने प्रसिद्ध केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.