

महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर
महाराष्ट्रातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर
फडणवीस सरकारने केली मोठी घोषणा
शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा
राज्यात अखेर दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. फडणवीस सरकारने मोठा निर्णय जाहीर केला. राज्यातील २६५ तालुक्यातमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. ट्रिगर 1 लागू झालेल्या तालुक्यात सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. सरकारच्या या निर्णयाचे शेतकरी आणि विरोधाक स्वागत करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यात दुष्काळ फडणवीस सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. म्हणजे ७५ टक्के महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करण्यात आला. दुष्काळ जाहीर झाल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारच्या निर्णयामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. मुख्यमंत्र्यानी राज्यातील दुष्काळ भागांची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या होत्या. राज्यातील परिस्थिती लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेतला.
मुख्यमंत्र्यांनी दुष्काळाच्या विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन,शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगिती, कृषीपंपाच्या चालू वीजबिलात सूट(7.5 हॉर्सपॉवर क्षमतेच्या वीजपंपांचे वीज बिल आधीच माफ, आता त्यावरील वीजपंपांनाही सूट, शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजना अंतर्गत नियमात शिथिलता आणून अधिकाधिक कामे सुरु करणार, आवश्यक त्या ठिकाणी पिण्याचे टँकर्स पुरवले जाणार आहेत.
त्याचसोबत, फडणवीस सरकारने या उपाययोजनांमध्ये टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकर्यांच्या शेतीपंपाची वीजजोडणी खंडित होणार नाही, शेतीवर आश्रित शेतकरी/शेतमजूर यांना अन्नधान्य पुरवणार, जनावरांच्या चार्याची व्यवस्था करणार, जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेणार, पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी पाणी यासाठी आधीच्या आदेशाप्रमाणे नियोजन सुरुच ठेवणार, पंचनाम्याची कार्यवाही तत्काळ पूर्ण करण्याचे सर्व जिल्हाधिकार्यांना आदेश, पिकांची स्थिती दाखवणारे छायाचित्र, जीपीएस संकलित करण्याचे आदेश दिले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.