Cabinet Decision : राज्य सरकारचा मोठा निर्णय, पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात १०००० रूपयांची वाढ

CM Devendra Fadnavis Cabinet Decision News : महाराष्ट्र सरकारने पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात १०,००० रुपयांची वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis
Published On

Maharashtra Government Cabinet Decision News : देवेंद्र फडणवीस सरकारने विद्यार्थ्यांच्या विद्यावेतन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आला आहे. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात भरघोस वाढ करण्यात आली आहे. पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात १०००० रूपयांची वाढ करण्यात आली आहे. बीएससी नर्सिंग आणि व्यवसायोपचार अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनाही विद्यावेतनात वाढ मिळणार आहे. या निर्णयामुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आज मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले ३ महत्त्वाचे निर्णय कोणते?

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा. आगामी विधिमंडळ अधिवेशनात विधेयक आणणार (सामाजिक न्याय विभाग)

राज्यातील शासकीय भौतिकोपचार आणि व्यवसायोपचार पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात ६२५० रुपयांची वाढ, पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात १०,००० ची वाढ, तर बी.एस्‍सी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही मिळणार ८,००० विद्यावेतन (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग)

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या दृष्टीने उपाय. विविध प्रकारच्या दरांमध्ये सुधारणा (राज्य उत्पादन शुल्क विभाग)

Devendra Fadnavis
Akkalkot Accident : पुण्यावरून देव दर्शनला जाताना सोलापूरमध्ये अपघात, ३ जणांचा जागीच मृत्यू, १५ जखमी

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पुस्तकाचे प्रकाशन -

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोदींच्या ११ वर्षांच्या ११ कार्यकाळाबद्दल प्रकाश टाकला. केंद्रातील मोदी सरकारच्या कार्यकाळाला ११ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने फडणवीस यांच्याकडून पुस्तक प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात मोदींच्या ११ वर्षाचा कार्याचा आढावा असेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विकासाच्या नव्या वाटचालाची सुरूवात झाली आहे. एनडीए सरकारपेक्षा जास्त निधी मोदी सरकारने महाराष्ट्राला दिला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Devendra Fadnavis
Delhi Fire : इमारतीला भीषण आग, सातव्या मजल्यावरून २ मुलांसोबत बापाने टाकली उडी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com