Akkalkot Accident : पुण्यावरून देव दर्शनला जाताना सोलापूरमध्ये अपघात, ३ जणांचा जागीच मृत्यू, १५ जखमी

Akkalkot Accident News : पुण्यावरून अक्कलकोटकडे देवदर्शनासाठी निघालेल्या ट्रॅव्हल्स बसला सोलापूरमध्ये अपघात झाला. कर्जाळा गावाजवळ उभ्या ट्रकला जोरात धडक दिल्याने ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आणि १५ हून अधिक जण जखमी झाले. जखमींना अक्कलकोट व सोलापूर सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक आहे.
Pune to Akkalkot pilgrimage bus accident in Solapur
A tragic accident occurred near Valsang on the Solapur-Akkalkot highway where a bus carrying devotees from Pune to Akkalkot hit a parked truck. Three people died on the spot, and over 15 were injured. The injured were rushed to nearby hospitals, and police are investigating the crash.Saam TV News Marathi
Published On

विश्वभूषण लिमये, सोलापूर प्रतिनिधी

Pune to Akkalkot pilgrimage bus accident in Solapur, 3 dead on spot : पुण्याहून देवदर्शनासाठी निघालेल्या ट्रॅव्हल्सला सोलापूरमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजतेय. ट्रॅव्हल्समध्ये जवळपास ३५ भाविक असल्याचा अंदाज आहे. त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५ ते २० जण जखमी असल्याची माहिती मिळत आहे. जखमींना जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यामधील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहितीही समोर आली आहे.

सोलापूर अक्कलकोट महामार्गावर ट्रक आणि बसचा आज सकाळी भीषण अपघात झाला. यामध्ये तीन जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघाताची भीषणता पाहता मृताचा आकडा आणखी वाढू शकतो. वळसंग जवळील कर्जाळा येथील उभ्या असलेल्या ट्रकला ट्रॅव्हल्स बसने जोरात धडक दिल्यामुळे अपघात झाला. हा अपघात इतका भयंकर होता ३ जणांचा जागीच मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले आहेत.

Pune to Akkalkot pilgrimage bus accident in Solapur
Delhi Fire : इमारतीला भीषण आग, सातव्या मजल्यावरून २ मुलांसोबत बापाने टाकली उडी

सोलापूरहून अक्कलकोटला जात असणाऱ्या ट्रॅव्हल्सने ट्रकला जोरात धडक दिली. प्रत्यक्षदर्शीने सांगितलेल्या माहितीनुसार, ट्रॅव्हल्स बस भरधाव वेगात होती. बसने ट्रकला धडक दिल्यामुळे बसच्या डाव्या बाजूचे मोठे नुकसान झाले. पुण्यावरून अक्कलकोट कडे देवदर्शनला जात असताना हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. पोलिसही तात्काळ घटनास्थळावर दाखल झाले. जखमींना तात्काळ उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तर तिन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी रूग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

Pune to Akkalkot pilgrimage bus accident in Solapur
Pune-Solapur Highway : ट्रॅफिकची कटकट दूर होणार; हडपसरमधून झटक्यात पुण्याच्या बाहेर पडणार, यवतपर्यंत नवा उड्डाणपूल

पुण्यावरून अक्कलकोटकडे जाणाऱ्या या ट्रॅव्हल्स बसमध्ये अंदाजे ३० ते ३५ भाविक होते, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या भीषण अपघातात अनेक भाविक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाकडून जखमींना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर जखमींना अक्कलकोट आणि सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात करण्यात दाखल करण्यात आले. अपघातानंतर सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर वाहतूककोंडी झाली होती, पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला सारून वाहतूक सुरळीत केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com