Maharashtra Government has approved a 6-lane elevated highway from Hadapsar to Yavat : हडपसरजवळ नेहमीच वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. पुण्यातून बाहेर निघण्यासाठी हडपसरमध्ये सर्वाधिक वेळ लागतो. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाचा सामना करावा लागतो. अर्धा तास ते एक तासांचा वेळ हपसर ते लोणी काळभोर या परिसरातून बाहेर पडण्यासाठी जातो. आता हा प्रश्न कायमचा संपणार नाही. येथील वाहतूककोंडी पाहून सरकारने सहा पदरी उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. हडपसर ते यवत या दरम्यान सहा पदरी उड्डाणपूलाला राज्य सरकारकडून मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी कायमची संपणार आहे.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हडपसरजवळ होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या अडचणीवर कायमचा तोडगा काढण्यात आला आहे. फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाने हडपसर ते यवत दरम्यान २५ किलोमीटर लांबीच्या सहा पदरी उड्डाणपुलाच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी ५,२६२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (MSIDC) याची अंमलबजावणी करणार आहे. हा उड्डाणपूल बिल्ड-ऑपरेट-ट्रान्सफर (BOT) तत्त्वावर विकसित केला जाणार आहे.
पुणे-सोलापूर महामार्ग हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ चा भाग असून, हडपसर ते यवत हा विभाग गेल्या काही वर्षांत झपाट्याने शहरीकरण झालेला आहे. यामुळे या मार्गावर दररोज हजारो प्रवासी वाहतूक कोंडीला सामोरे जातात. दररोज सकाळी आणि सायंकाळी मांजरी फाटा, कदमवाक वस्ती, लोणी काळभोर, थेऊर फाटा आणि उरळी कांचन येथे वाहतूक कोंडी होतेच. यावरच कायमस्वरूपी उपाय म्हणून हा उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हा उड्डाणपूल केवळ वाहतूक कोंडी कमी करणार नाही, तर प्रवासाचा वेळही कमी करेल. याशिवाय, या प्रकल्पांतर्गत विद्यमान पुणे-सोलापूर महामार्गालाही सहा पदरी विस्तारित केले जाणार आहे. या संपूर्ण मार्गावर वाहतूक अधिक गतिमान आणि सुरक्षित होईल. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपसचिव प्रज्ञा वाल्के यांनी जारी केलेल्या शासकीय ठरावात या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. हडपसर येथील बस डेपो येथे आधीच एक दुहेरी उड्डाणपूल आहे. मात्र, त्यापलीकडे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर आहे. या नव्या उड्डाणपुलामुळे मांजरी फाटा, लोणी काळभोर आणि उरळी कांचन येथील कोंडी कमी होण्यास मदत होईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर पुणे आणि सोलापूर दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.