Delhi Dwarka Sector-13 fire incident : राजधानी दिल्लीमध्ये अंगाचा थरकाप उडवाणारी घटना घडली आहे. इमारतीच्या सातव्या मजल्याला भीषण आग लागली. आगीपासून वाचण्यासाठी सातव्या मजल्यावरून तीन जणांना उडी मारल्याचं समोर आले आहे. या तिघांचाही मृत्यू झाला आहे. यामध्ये वडील आणि दोन मुलांचा समावेश आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली, याचं कारण अद्याप समोर आलेले नाही. अग्निशामन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दिल्लीतील द्वारका सेक्टर-13 मध्ये आज सकाळी एका इमारतीच्या सातव्या मजल्यावर आग लागली. आग इतकी भीषण होती की अनेक लोकांनी घाबरून इमारतीवरून खाली उड्या मारल्या. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. रूग्णालयात उपचारावेळी तीन जणांचा मृत्यू झाला. डीएफएसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आग विझवण्याचे काम अद्याप सुरू आहे. परंतु आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय यश यादव यांनी आग लागल्यानंतर आपल्या दोन मुलांसह इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली होती. रुग्णालयात उपचारादरम्यान तिघांचाही मृत्यू झाला. सकाळी सुमारे १० वाजता एमआरव्ही शाळेजवळील शब्द अपार्टमेंटच्या सातव्या मजल्यावर आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली.
आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशामन दलाकडून आग विझवण्याचे काम सुरू आहे. या आगीमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
राजधानी दिल्लीमध्ये सध्या प्रचंड उकाडा आहे. पावसाने पाठ फिरवल्यामुळे तापमान सातत्याने वाढत आहे. पुढील काही दिवस राजधानीमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत आग लागण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. याच दरम्यान, दिल्लीतील द्वारकामधील शब्द अपार्टमेंटमध्ये भीषण आग लागली. ही आग किती भयावह आहे, हे तिथल्या फोटो आणि व्हिडिओवरून समजू शकते. अपार्टमेंटच्या वरच्या मजल्यावर लागलेली आग वेगाने पसरली आणि तिने खालच्या मजल्यांपर्यंत पोहचली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.