राज्यामध्ये यावर्षी खूपच चांगला पाऊस झाला. परतीच्या पावसाने देखील राज्यातील अनेक जिल्ह्यांना मोठा दिलासा दिला. कारण राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त असणाऱ्या मराठवाड्यासह राज्यातील पाणी टेन्शन मिटलं आहे. राज्यातील सर्व विभागांमधील धरणांमध्ये एकूण ८६ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या पाणीसाठ्यामध्ये तब्बल १६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागच्यावर्षी या दिवशी धरणांमध्ये ७० टक्के पाणीसाठा होता.
मिळालेल्या माहितीनुसार, यंदा राज्यातील कोकण विभागामधील धरणांमुळे सर्वाधिक पाणीसाठा जमा झाला आहे. कोकण विभागामध्ये ९४ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. तर दुष्काळग्रस्त मराठवाड्यातही ७३ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मराठवाड्यातील नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. राज्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये जोरदार पाऊस झाला. या पावसाने सरासरी ओलांडून आतापर्यंत १०३ टक्के पावासाची नोंद झाली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊसही चांगला झाला आणि धरणांमधील पाणीसाठ्यातही चांगली वाढ झाली.
महत्वाचे म्हणजे मान्सून दाखल झाल्यानंतर पहिले काही दिवस म्हणावा तसा पाऊस झाला नाही. पण त्यानंतर पावसाने जोर पकडला. जुलै आणि ऑगस्टसह सप्टेंबर महिन्यामध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत गेली. सध्या राज्यात परतीचा पाऊस सुरू आहे. या पावसामुळे देखील धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे यावर्षी राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही.
नागपूर - ८७.७५ टक्के
अमरावती - ८९.९२ टक्के
संभाजीनगर - ७३.५५ टक्के
नाशिक - ८१.४८ टक्के
पुणे - ९०.६८ टक्के
कोकण - ९४.२१ टक्के
अमरावती - १५५.९ मिमी
नाशिक - ११७.८ मिमी
नागपूर - २०२.४ मिमी
संभाजीनगर - २२२.७ मिमी
पुणे -१२५.३ मिमी
कोकण - ३४९.६ मिमी
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.