Eknath Shinde Health Update : एकनाथ शिंदे यांना 105 डिग्री सेल्सिअस ताप, अंगभर कणकण; तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितली हेल्थ अपडेट

Eknath Shinde Health Update News : एकनाथ शिंदे यांना 105 डिग्री सेल्सिअस ताप आला आहे. तपासणीनंतर डॉक्टरांनी एकनाथ शिंदे यांची हेल्थ अपडेट सांगितली आहे.
eknath shinde news
Eknath Shinde Health Updatetwitter
Published On

सातारा : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मागील दोन दिवसांपासून साताऱ्यातील दरेगावी मुक्कामाला आहेत. एकनाथ शिंदे दरेगावात गेल्याने महायुतीची बैठक देखील रद्द झाली आहे. त्यामुळे महायुतीत सर्वकाही आलबेल आहे की नाही, यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. याच महायुतीच्या सत्ता स्थापनेच्या चर्चेदरम्यान आता एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर आज डॉक्टरांच्या पथकाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तपासणी केली.

साताऱ्यातील दरेगावात विश्रांतीसाठी आलेल्या एकनाथ शिंदे यांची काल अचानक तब्येत बिघडली आहे. एकनाथ शिंदे यांना ताप आणि कणकणी आहे. त्यानंतर आज डॉक्टरांनी एकनाथ शिंदे यांची तपासणी केली. एकनाथ शिंदे यांना १०५ डिग्री सेल्सिअस ताप आहे. आजारी असल्याने शिंदे दिवसभर घराबाहेर देखील पडले नाहीत. ृ

eknath shinde news
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी अखेर यॉर्कर टाकला; दिल्लीच्या नेत्यांचं टेन्शन वाढलं, VIDEO

'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ताप, सर्दी आणि घशाचं इन्फेक्शन आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना सलाईन लावण्यात आली आहे. त्यांना एक दोन दिवसांत बरे वाटेल. तशी आम्हाला खात्री आहे. कालपासून त्यांची तब्येत बरी नव्हती. आज त्यांची तब्येत बरी आहे. त्यांनी आमच्यासोबत चर्चा केली. ते उद्या मुंबईत जाण्याची शक्यता आहे', अशी माहिती डॉक्टर आर. एम. पार्टे यांनी दिली. त्यांच्यावर चार जणांचे डॉक्टरांचे पथक उपचार करत आहेत.

eknath shinde news
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी आराम करणार

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडल्याने ते कुणाला भेटणार नसल्याची माहिती आहे. त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे ते आराम करत आहेत. त्यामुळे दरे गावात येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला त्यांना भेटू दिले जात नाही. मात्रे, दरे येथे त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांबरोबरच काही लाडक्या बहिणी सुद्धा आल्या. या लाडक्या बहिणी मुख्यमंत्री शिंदे यांची विचारपूस करण्यासाठी पोहोचल्या.

eknath shinde news
Eknath Shinde Village: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं 'दरेगाव' कुठंय?

'मी कराडहून आले. लाडके मुख्यमंत्री शिंदे हे दरे गावात आल्याची माहिती कळाली. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी आलो, असे लाडक्या बहिणींनी सांगितलं. तसेच काही कार्यकर्ते देखील आले आहेत. मात्र, एकनाथ शिंदे यांना कोणालाही भेटू दिले जात नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com