Maharashtra Cabinet Expansion: महायुती सरकारच्या मंत्र्यांचा शपथ सोहळा संपन्न, सरकारनं साधलं जातीय समीकरणं

Mahayuti Cabinet Expansion In Nagpur: महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूर येथील राजभवनात पार पडला. या सोहळ्याला मोठी गर्दी जमा झाली होती. यामुळे राजभवनाच्या परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
Mahayuti  Cabinet Expansion In Nagpur
Maharashtra Cabinet ExpansionSaam Tv
Published On

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज झाला. मिळालेल्या माहितीनुसार,आज महायुतीचे 39 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहिली मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राधाकृष्णन विखे-पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपचे 19, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी 10 मंत्र्यांचा समावेश आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूरमध्ये सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. मोठा थाटात हा सोहळा पार पडला.

३३ वर्षांनंतर नागपुरात शपथविधी

महाराष्ट्रात तीन दशकांनंतर राज्य सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी मुंबईऐवजी नागपुरात झाला. नागपुरात दुपारी ४ वाजता पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. महाराष्ट्रात यापूर्वी १९९१ मध्ये नागपुरात शपथविधी सोहळा पार पडला होता. त्यानंतर आता शपथविधी पार पडला.

महायुतीत असलेल्या पक्षांचे नेते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. नागपुरात नव्या मंत्र्यांचा शपथ ग्रहण सोहळा पार पडला. ज्यामध्ये भाजपचे सर्वाधिक 19, राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 तर शिवसेना शिंदे गटाच्या 10 आमदारांचा समावेश आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गृह मंत्रि‍पद भाजपकडेच राहणार असल्याची माहिती आहे. गृहमंत्रालयासोबतच महसूल, शिक्षण आणि पाटबंधारे ही खाती भाजपकडे राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा भाजपने जिंकल्या. भाजपचे 132 उमेदवार जिंकलेत. तर शिवसेना शिंदे गटाने 57 आणि अजित पवार गटाने 41 जागा मिळाल्या आहेत. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे शिवसेना शिंदे गटाला नगर विकास मंत्रालयासोबत गृहनिर्माण, उद्योग, आरोग्य, वाहतूक, पर्यटन, आयटी आणि मराठी भाषा ही खाती मिळण्याची शक्यता.

Mahayuti  Cabinet Expansion In Nagpur
Bharatshet Gogawale Profile : अखेर तो दिवस आला! भरत गोगावलेंना मंत्रि‍पदाची लॉटरी, फडणवीस सरकारमध्ये कोणतं खातं मिळणार?

फडणवीस सरकारमधील चार लाडक्या बहिणी

मागील महायुती सरकारने राज्यातील लाडक्या बहिणीसाठी कल्याणकारी योजना सुरू केली होती. मात्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात बहिणींची संख्या कमी दिसली. तिन्ही पक्ष मिळून चार महिला आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात पंकजा मुंडे ,माधुरी पिसाळ, मेघना बोर्डीकर, अदिती तटकरे यांचा समावेश आहे.

भाजपच्या कोट्यातून 19 मंत्री

चंद्रशेखर बावनकुळे- कामठी-विदर्भ-ओबीसी

गिरीश महाजन- जामनेर- उत्तर महाराष्ट्र- गुर्जर ओबीसी

चंद्रकांत पाटील- कोथरूड-पश्चिम महाराष्ट्र- मराठा

जयकुमार रावल-धुळे शहादा- राजपूत

पंकजा मुंडे -MLC बीड-मराठवाडा- बंजारा समाज -OBC

पंकज भोयर- आरवी-विदर्भ- कुणबी मराठा

राधाकृष्ण विखे पाटील- शिर्डी- पश्चिम महाराष्ट्र- मराठा

मंगल प्रभात लोढा- मलबार हिल- मारवाडी

शिवेंद्रराजे भोसले- सातारा- पश्चिम महाराष्ट्र-मराठा

मेघना बोर्डीकर- जिंतूर-मराठवाडा- मराठा

नितेश राणे- कणकवली-कोकण - मराठा

माधुरी पिसाळ - पुणे - पश्चिम महाराष्ट्र - ओबीसी

गणेश नाईक- नवी मुंबई- ठाणे-ओबीसी

आशिष शेलार- मराठा- मुंबई वांद्रे

संजय सावकारे-भुसावळ-उत्तर महाराष्ट्र -SC

आकाश फुंडकर-विदर्भ- कुणबी मराठा ओबीसी

जयकुमार गोरे- मान खटाव- पश्चिम महाराष्ट्र माळी- ओबीसी

अतुल सावे- औरंगाबाद पूर्व-मराठवाडा -ओबीसी माळी

अशोक भुईके-विदर्भ आदिवासी

Mahayuti  Cabinet Expansion In Nagpur
Dadaji Bhuse Profile: भुसे असे बनले मालेगाव बाह्य मतदार संघाचे 'दादा'; असा आहे दादाजी भुसे यांचा राजकीय प्रवास

शिवसेनेचे 10 मंत्री

संजय सिरसाट-औरंगाबाद पश्चिम मराठवाडा- अनुसूचित जाती

उदय सामंत- रत्नागिरी-कोकण-कायस्थ ब्राह्मण

शंभूराजे देसाई- पाटण - पश्चिम महाराष्ट्र- मराठा

गुलाबराव पाटील -उत्तर महाराष्ट्र गुर्जर-ओबीसी

भरत गोगावले- महाड - कोकण - ओबीसी मराठा कुणबी

संजय राठोड - डिग्रस-विदर्भ - ओबीसी बंजारा

आशिष जैस्वाल- रामटेक -विदर्भ - ओबीसी बनिया

प्रताप सरनाईक-ठाणे- माजिवडा - मराठा

योगेश कदम-दापोली-कोकण - मराठा

प्रकाश आबिटकर- राधानगरी-पश्चिम महाराष्ट्र- मराठा

Mahayuti  Cabinet Expansion In Nagpur
Chhagan Bhujbal: छगन भुजबळ खरंच नाराज? भुजबळांची भेट घेत गिरीश महाजनांनी सांगितलं खरं कारण

राष्ट्रवादीचे 10 मंत्री

अदिती तटकरे-श्रीवर्धन-कोकण - ओबीसी

नरहरी झिरवाळ- दिंडोरी-उत्तर महाराष्ट्र -आदिवासी समाज

बाबासाहेब पाटील- अहमदपूर - मराठवाडा- मराठा

हसन मुश्रीफ-कागल- पश्चिम महाराष्ट्र - मुस्लिम अल्पसंख्याक मुस्लिम चेहरा

दत्ता भरणे - इंदापूर- पश्चिम महाराष्ट्र - धनगर समाज

धनंजय मुंडे - परळी- मराठवाडा -बंजारा ओबीसी

अनिल पाटील- अमळनेर-उत्तर महाराष्ट्र - मराठा

मकरंद पाटील - सातारा - पश्चिम महाराष्ट्र - मराठा

माणिकराव कोकाटे- सिन्नर-उत्तर महाराष्ट्र - मराठा

नागपूर पोलिसांचे ढिसाळ नियोजन

नागपूरमधील राजभवनात मोठा थाटात संपन्न झालेल्या शपथविधी सोहळ्यात मात्र पोलिसांचं ढिसाळ नियोजन पाहायला मिळालं. शपथविधीला मोठी गर्दी झाल्याने अनेक मंत्र्यांना ट्रफिकचा फटका बसलाय. राज भावना स्वर प्रचंड गर्दी असल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा भावी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतःची गाडी सोडून दुसऱ्याच्या वाहनातून राजभवनाच्या आत प्रवेश करावा लागला. राजभवनाच्या गेटवरच अनेक मंत्र्यांच्या गाड्या अडकल्या होत्या. राजभवन परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com