Bharatshet Gogawale Profile : अखेर तो दिवस आला! भरत गोगावलेंना मंत्रि‍पदाची लॉटरी, फडणवीस सरकारमध्ये कोणतं खातं मिळणार?

Bharatshet Gogawale Profile in Marathi : शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंना मंत्रि‍पदाची लॉटरी लागली आहे. त्यांना फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद मिळणार असल्याचं निश्चित झालं आहे.
अखेर तो दिवस आला! भरत गोगावलेंना मंत्रि‍पदाची लॉटरी, फडणवीस सरकारमध्ये कोणतं खातं मिळणार?
Bharatshet Gogawale ProfileSaam tv
Published On

Bharat Gogawale cabinet minister of maharashtra : भरत गोगावले हे महाड मतदारसंघातून शिवसेनेकडून विधानसभेवर चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. सरपंच ते आमदारपदापर्यंत मजल मारणारे भरत गोगावले यांना फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले आहे. भरत गोगावले यांना २०१९ आणि २०२२ मध्ये मंत्रिपदाने हुलकावणी दिली होती. ठाकरे आणि शिंदेंच्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळाले नव्हते. आता ते मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांच्याकडे एसटी महामंडळाचे अध्यक्षपद आहे. सरपंच म्हणून भरत गोगावले यांच्या राजकीय करिअरला सुरूवात झाली होती. आता ते मंत्रिपदाची शपथ घेत आहेत.

भरत गोगावले यांनी गावातून राजकीय करिअरला सुरूवात केली होती. पिंपळवाडी गावाच्या सरपंचपदी गोगावले यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यावेळी राज्यात काँग्रेसचे सरकार होते. 1992 मध्ये गोगावले यांनी पंचायत समिती पदासाठी काँग्रेसकडून तिकीटही मागितले होते. पण गोगावलेंना तिकीट नाकारण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला होता.

अखेर तो दिवस आला! भरत गोगावलेंना मंत्रि‍पदाची लॉटरी, फडणवीस सरकारमध्ये कोणतं खातं मिळणार?
Radhakrishna Vikhe Patil Profile: विधानसभा सदस्य ते गृहनिर्माण मंत्री, असा आहे राधाकृष्ण विखे-पाटील यांचा राजकीय प्रवास

काँग्रेसने तिकीट नाकारल्यानंतर भरत गोगावले यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. भरत गोगावले यांनी शिवसेनेकडून दोन वेळा जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली अन् जिंकली होता. त्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेने कात टाकली होती. त्याचवेळी भरत गोगेवाल यांनी रायगडमधून आपला ठसा उमटवला.

२००९ मध्ये शिवसेनेने भरत गोगावले यांना महाड विधानसभा मतदारसंघातून विधानसभेचे तिकीट दिले होते. त्यावेळी भरत गोगेवाल यांनी दणदणीत विजय मिळवला होता. २०१४, २०१९ आणि २०२४ मध्येही भरत गोगावले यांनी महाडमध्ये एकतर्फी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले होते.

अखेर तो दिवस आला! भरत गोगावलेंना मंत्रि‍पदाची लॉटरी, फडणवीस सरकारमध्ये कोणतं खातं मिळणार?
Uday Samant Profile: ५ वेळा आमदार... पालकमंत्री ते उद्योगमंत्री; उदय सामंत यांचा राजकीय प्रवास

२०१९ मध्ये उद्धव ठाकरेंच्या मविआ सरकारमध्ये भरत गोगावले यांना मंत्रिपद मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. पण एनसीपीमुळे गोगावलेंचं तिकीट कापण्यात आले होते. त्यानंतर गोगावले नाराज झाले होते. भरत गोगेवाले यांनी शिसेना फूटीत मोलाची भूमिका बजावली होती. गुवाहटीमधून भरत गोगेवाल यांना शिंदेंनी प्रतोद म्हणून नियुक्त करण्यात आले होते. शिंदेंनी सरकार स्थापन केल्यानंतरही गोगावलेंना मंत्रिपदाने हुलकावणी दिली होती.

अखेर तो दिवस आला! भरत गोगावलेंना मंत्रि‍पदाची लॉटरी, फडणवीस सरकारमध्ये कोणतं खातं मिळणार?
Chandrakant Patil Profile : मिल कामगाराचा मुलगा, अभविप कार्यकर्ता ते कॅबिनेट मंत्री, वाचा चंद्रकांत पाटलांची राजकीय कारकीर्द

नाराजी दूर करण्यासाठी शिंदेंनी गोगावले यांच्याकडे एसटी महामंडळाचे अध्यक्षपद दिले होते. आता पुन्हा एकदा महायुतीची सत्ता स्थापन झाली. शिंदेंनी भरत गोगावले यांना मंत्रिपद दिलेय. आज ते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पण त्याआधीच रायगडच्या पालकमंत्रिपदावरून पुन्हा एकदा तटकरे कुटुंबासोबत कुटता आल्याचे दिसतेय. गोगावले यांनी शपथविधीआधीच रायगडच्या पालकमंत्रिपदावर दावा ठोकलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com