
महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज होत आहे. महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून ते आमदार झाले आहेत. उदय सामंत हे पुन्हा मंत्री होणार असल्यामुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याचसोबत उदय सामंत त्यांच्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याला मंत्रिपद मिळाले आहे.
९० च्या दशकात उदय सामंत यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून राजकारणात एन्ट्री केली. २००४ मध्ये उदय सामंत यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. यावेळी त्यांनी भाजपचे आमदार सुरेंद्र उर्फ बाळ माने यांचा पराभव केला. २००४ ते २०२४ असं सलग ५ वेळा उदय सामंत विधानसभा निवडणुकीत विजयी झाले.
उदय सामंत हे आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. राष्ट्रवादीची साथ सोडत त्यांनी धनुष्यबाण हाती घेतले होते. २००४ आणि २००९ च्या दोन्ही निवडणुका उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवल्या होत्या आणि ते विजयी देखील झाले होते. यानंतर त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. शिवसेना पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरे यांची साथ सोडत ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले.
- २०१३ मध्ये उदय सामंत राज्यमंत्री होते. (नगर विकास, वने, बंदरे, खार जमीन, क्रीडा व युवक कल्याण, माजी सैनिक कल्याण, विधी व न्याय, मत्स्य व्यवसाय व मराठी भाषा )
- २०१३ - पालकमंत्री, रत्नागिरी जिल्हा
२०१६ - अध्यक्ष, अंदाज समिती महाराष्ट्र विधानमंडळ
३१ ऑगस्ट २०१८ - अध्यक्ष, म्हाडा ( महाराष्ट्र )
३० डिसेंबर २०१९ - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री
८ जानेवारी २०२० - पालकमंत्री, सिंधुदुर्ग
९ ऑगस्ट २०२२ - उद्योग मंत्री
२८ सप्टेंबर २०२२ - पालकमंत्री, रत्नागिरी व रायगड जिल्हा
विश्वस्त - अखिल भारतीय नाट्य परिषद, मुंबई
अध्यक्ष - रत्नागिरी जिल्हा नाट्य परिषद
माजी अध्यक्ष - रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.