
अजय सोनवणे, साम प्रतिनिधी
नाशिकच्या मालेगाव बाह्य मतदार संघात सलग पाचव्यांदा निवडून येत दादाजी भुसे मतदारसंघाचे दादा बनले आहेत. यावेळी दादाजी दगडू भुसे यांनी शिंदे गट शिवसेनाकडून निवडणूक लढवली. भुसे यांचा १०६००६ मतांनी विजय झाला होता. पाचव्यांदा आमदार होणारे दादाजी भुसे यांची मंत्रिपदासाठी वर्णी लागली असून ते आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आज आपण त्यांचा राजकीय प्रवास जाणून घेणार आहोत.
दादाजी भुसे हे मुळचे मालेगावमधील वडील कै. दगडू भुसे यांचे पुत्र. दादा भुसे यांचे वडील सामाजिक कार्यात सक्रीय होते. त्यातून त्यांच्या मनात राजकारणाचा आवड निर्माण झाली. दादाडी भुसे यांनी इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर ते शासकीय सेवेत रूजू झाले. त्यांची नोकरी ठाणे येथे होती. त्यावेळी दादा भुसे स्व.आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या समाज कार्याने प्रभावित झाले होते. १९९७ आणि ९८ काळात ते नोकरीचा राजीनामा देत मालेगावमध्ये परतले.
मालेगावमध्ये परत आलेल्या दादा भुसे यांनी जाणता राजा मित्र मंडळाची स्थापना केली. त्या माध्यमातून त्यांनी समाज कार्यास सुरुवात केली. त्यावेळी अनेकजण त्यांच्या संपर्कात आले आणि मोठा हिंदुत्ववादी वर्ग सर्वसमान्य व्यक्ती त्यांचीशी जोडला गेला. आधी दाभाडी मतदार संघ असलेला मतदार संघ हा हिरे घराण्याकडे होता. कै.भाऊसाहेब हिरे,पुष्पाताई हिरे,बळीराम हिरे,प्रशांत हिरे यांनी या मतदार संघात नेतृत्व केले आणि मंत्री झाले.
२००० सालापर्यंत जाणता राजाच्या मित्र मंडळाच्या माध्यमातून दादा भुसे यांनी समाजकारणाच्या माध्यमातून आपला जम बसवायला सुरुवात केली होती. त्याचवेळी दाभाडी मतदार संघ हा मालेगाव बाह्य मतदारसंघ म्हणून घोषित झाला. २००१ साली मालेगावमध्ये झालेल्या जातीय दंगलीत दादा भुसे यांचा सहभाग असल्याचा आणि ते व शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेश गवळी यांनी संगमेश्वर भागातील डायमंड मिल जाळल्याचा आरोप त्यांच्यावर झाला.
यासगळ्या प्रकरणानंतर दादा भुसे चर्चेत आले. २००१ नंतर मालेगाव नगर पालिकेचे रुपांतर मालेगाव महापिकेत झाले. त्याचवेळी दादा भुसे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि हिंदू नागरिकांचे मसीहा बनले. महापालिका निवडणूका जाहीर झाल्या, मात्र काहीसे भाजपाच्या तडजोडीत युती होऊ शकली नाही. दादा भुसे यांनी आपल्या सामाजिक कार्यकत्यांच्या जुन्या शिवसैनिकांनासोबत घेत मालेगाव महापालिकेत पहिल्याच वेळी १२ नगरसेवक निवडून आणण्याची किमया केली. त्यानंतर दादा भुसे हे मोठ्या प्रमाणावर दाभाडी म्हणजेच आजच्या मालेगाव बाह्यमध्ये गाजू लागले.
२००४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत दादा भुसे यांना शिवसेनेकडून उमेदवारी न मिळता त्यांनी अपक्ष उमेदवारी केली. ज्यात त्यांना भाजपात नाराज असलेल्या नेत्यांनी मदत केली. पहिल्यांना दाभाडी मतदार संघ म्हणेज( मालेगाव बाह्य मतदार संघात आमदारी मिळवत ते जायंटकिलर ठरले. आमदारकी मिळाल्यानंतर त्यांनी आपले सामाजिक काम सुरुच ठेवले. अनेकांना मदत करणे, त्याकाळच्या शासनाविरोधात आवाज उठवत आंदोलन करणे.
यामुळे दादा भुसे जास्तच लोकांमध्ये लोकप्रिय झाले. तर २००९ साली दादा भुसे पुन्हा विजयी झाले. त्यानंतर २०१४ साली झालेल्या निवडणूकीत दादा भुसे यांनी शिवसेनेत असलेल्या दादा भुसे यानी पुन्हा मोठ्या मताधिक्याने भाजपाच्या पवन ठाकरे यांचा पराभव केला.
यानंतर दादा भुसे यांनी समाज माध्यमातून लोकांसाठी काम जारीच ठेवले होते.२०१९ साली पुन्हा दादा भुसे हे मालेगाव बाह्य मतदारसंघात शिवसेनेतर्फे निवडणुकीला उभे होते त्यावेळी त्यांनी कॉंग्रेसचे डॉ. तुषार शेवाळे यांचा पराभव केला आणि ते पुन्हा निवडून आले. त्यानंतरच्या आलेल्या कोविड काळात मालेगाव हे रेड झोन मध्ये असतांना मंत्री असलेल्या दादा भुसे यांनी अनेक उपक्रम राबविले अनेकांना मदत केली तर प्रसंगी कोविडमधील रुग्णांना स्वत जाऊन भेट देत त्यांची विचारपुस केली.
रात्री अपरात्री स्वत: शहरात फिरून काही गोष्टी जाणून घेतल्या. इतकेच नाही तर थेट शिवसैनिकांच्या मदतीने थेट मुंबईत भाजीपाला पोहचविण्याचे काम केले. यामुळे दादा भुसे यांचे याकाळातील कार्य लोकांपर्यंत पोहचले. याच काळात शिवसेना-भाजपाचे सरकार असतांना दादा भुसे यांना सहकार,ग्रामविकास,कृषी,माजी सैनिक,बंदरे व खनिजकर्म,सार्वजनिक बांधकाम मंत्र अशी पद मिळाली(२०२२ मध्ये शिवसेना वेगळी झाल्यानंतर त्यांना नाशिक जिल्ह्याच पालकमंत्री पद मिळाले.)
कॅबिनेट मंत्री पद मिळाल्यावर त्यांनी मतदार संघात अनेक शासकीय योजना राबविल्या त्यामुळे त्याचा फायदा अनेकांना झाला,त्यात लाडकी बहिण ही योजना प्रभावीपणे राबल्याने त्याचा अधिक फायदा त्यांना २०२४च्या निवडणूकीत झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.